व्हावे लहानाहनि लहान | WHAVE LAHANAHUNI LAHAN

Book Image : व्हावे लहानाहनि लहान  - WHAVE LAHANAHUNI LAHAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

महावीर जोशी - MAHAVIR JOSHI

No Information available about महावीर जोशी - MAHAVIR JOSHI

Add Infomation AboutMAHAVIR JOSHI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
।। व्हावे लहानाहुनि लहान ॥। । बत्तीस ॥। ।। व्हावे लहानाहुनि लहान ।। 1 तेहतीस ॥। फुलावर उडती फुलपाखरे... रॅगीबेरंगी कपडे घातलेली मुलं हुंदडताना अगदी फुलपाखरांयारखी दिसायची. फुलपाखरू अगदी नाजूक नाजूक असतं. पाळण्यातल्या बाळासारखं. त्याचं अलगद उडणं. फुलावर जाऊन बसणं, पानाआड दडणं हे सगळं अगदी आपल्यासारखंच असतं. हिरव्यागार पानावर बसलेलं फुलपाखरू जेव्हा' बघायचो तेव्हा आम्ही खूप नाचायचो. पकडायला धावायची. पण ते सापडेल तर शपथ वृत्तीनं चंचल आणि मनानं निर्मळ असलेलं फुलपाखरू लहानपणीचं खास वेड होतं. पानांची सळसळ होताना ते उडून जेव्हा अलगद दुसरीकडं बसतं तेव्हा आपलेच डोळे पानापानावर उतरून चालू लागल्यासारखं वाटतं. फुलापाखरांना धरून कधी ठेवू नये. हात कधी लावू नये, मोकळ्या आकाशात उडू द्यावं. पंख पसरून खेळू द्यावं. आपण खेळत असताना कुणी:अडथळा आणला तर आपण रडतो, ओरडतो. अडथळा दूर करतो. फुलपाखराला बोलता येत नाही. रडता येत नाही. तुमच्यासारखा हट धरता येत नाही. फुलपाखरत तुमचा दोस्त झालं पाहिजे असं लहानपणी जोशी मास्तरानं सांगितलं होतं. एकदा काय झालं मास्तरानं रघू नावाच्या मुलाला फुलपाखराचा पंख उपटताना पाहिलं! मास्तर भडकले, तडकले. लाल झाले. रागाच्या भरात रघूच्या पाठीत एक धपकाही ठेवून दिला. जोशी मास्तर मराठी शिकवायचे. रघूनं फुलपाखराचा पंख तोडलेला त्यांना सहन झाला नाही. नाकाचा ग्रेंडा उडवीत आणि भुवयांना ताणीत त्यांनी मराठीचं पुस्तक काढलं. कविता वाचून दाखवू लागले. कविता होती- “धरू नका ही बरे, फुलावर उडती फुलपाखरे, हात लावता पंखही तुटतील, दोरा बांधून पायही तुटतील, घरी कशी मग सांगा जातील, दूर तयांची घरे!” किती छान आहे नाही कविता/ अगदी फुलपाखरासारखीच सुंदर, देखणी. जोशी मास्तरानं त्या दिवशी आमच्या वर्गातील छोट्या रघूला खूप खूप शिकवलं. वागायचं कसं, बोलायचं कसं. लहानपणीचा अल्लड, खोडकर रघू आठवला की अजून हसायला येतं. झाडावरची खडूळी असो अथवा पाण्यातला खेकडा, ही रघूची खेळणी. खेकडा पकडून तो गरागरा फिरवायचा. पाण्यात आपटायचा. आता रघूकडं पाहिलं तर तसं वाटत नाही. जोशी मास्तरासारखचं तोही मुलांना शिकवीत असतो. समुद्र म्हणजे काय, प्राणी म्हणजे काय? पण लहानपण ते लहानपणच. फुलपाखरासारखं. रंगीबेरंगी अल्लड, खोडकर, सर्वांनाच हवहवंसं वाटणारं अगदी पाळण्यातल्या छकुल्यासारखं. तान्हल्यासारखं? थेंब थेंब पावसात उन्हात, सावलीत फुलपाखरत पहावं. ते सावलीत निराळ दिसतं. उन्हात आणि उन्हाळ्यात मजेत हसतं. कधी ठिपक्या ठिपक्यांचा झगा घालून दिवसभर नाचतं तर कधी इंद्रथनुच्या रंगाचं रूपच घेऊन आलेलं असतं. असं वाटतं की, आकाशातील इंद्रधनुच फूुलपाखरावर उतरलाय. आपल्याला जसं घर असतं तसं त्याला असतं का? ते खातं काय, पितं काय? झोपत कधी, उठतं कधी असले प्रश्न लहानपणी रघूला सतवायचे नाहीत पण तुम्हाला नक्कीच फुलपाखराला पाहून मनात येत असतील? छे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now