साधना : जनवरी 2017 | SADHANA : JAN 2017
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
84
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विनोद एस० - VINOD SHIRSATH
No Information available about विनोद एस० - VINOD SHIRSATH
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शद
प्रश्न - एकीकडे स्वच्छदवाद, दुसरीकडे कलेसाठी
कला की जीवनासाठी- असे वाद झडत असतानाच्या
काळात आपण कथा लिहायला सुरुवात केलीत, ती थेट
वास्तववादी. वास्तवाचं हे प्रखर भान कुठून, कसं
लिखाणात आलं?
- माझं वाचन काही फार विस्तृत नाही; पण
किशोरावस्थेत मराठी साहित्याची ओळख झाली ती हरी
नारायण आपटे, साने गुरुजी, नाथमाधव, बाबूराव
अर्नाळकर इत्यादिकांची पुस्तकं; आणि चांदोबा, नंतर
अधे-मधे थोडे खांडेकर-फडके आदी वाचून. पण ते
वाचताना हे असं नाही, असं नसतं असं वाटायचं.
आसपास दिसायचं तेही कथा-कादंबऱ्यांसारखं नसायचं.
शाळेत निबंध लिहिण्यासाठी शिक्षक विषय द्यायचे तेव्हा
सांगायचे, या विषयावर मनात जे येतं ते जसंच्या तसं लिहा.
कोणाची नक्कल करू नका. ते मनात ठसलं होतं. त्यातून
बाहेर जगात जे आणि जसं दिसतं ते मांडण्याची भूमिका
घडत गेली.
प्रश्न - आपल्या लिखाणावर कोणते प्रभाव आहेत?
- घरात महर्षी व्यास, वाल्मीकी वगैरे होते, ते
लहानपणी वाचले. तसे इंग्रजीतील डिकन्स, टॉलस्टॉय,
डोस्टोवस्की, अलेक्झांडर पुष्कीन, आर्थर कॉनन डायल,
सार्त्र, कामू आदी बहुधा पूर्ण न समजता थोडे-थोडे वाचले
होते. पण पहिल्या कादंबरीवर- मुंबई दिनांक 'वरदेखील
यातल्या कुणाचा प्रभाव होता, असं मी म्हणणार नाही.
प्रश्न - मुंबई दिनांक'चा फॉर्म कसा ठरवलात?
- फॉर्मचा जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता
वाटली नाही. फॉर्मच्या प्रयोगाने वाचक दुरावतात. जसे
सुचते तसे लिहायचे. ओढून-ताणून फॉर्मचा आविर्भाव
घेतला की कृत्रिमता येते. 'मुंबई दिनांक अशी सहजच
कागदावर उतरली.
प्रश्न - कलावाद व जीवनवाद यांच्यापेक्षा वास्तववाद
आपल्या लिखाणाची प्रेरणा ठरला, असे वाटते का?
- वास्तववाद मला अधिक भावला. जीवनेच्छा ही
आदिम प्रेरणा आहे. अगदी अमिबापासून ते माणसापर्यंत ही
प्रेरणा जबरदस्त असते. वंशसातत्याची सनातन ओढ...
तिचं मला कायमच आश्चर्य आणि आकर्षण वाटत आलं
आहे. त्यामुळे वास्तव कितीही भयाण असलं तरी
जगण्याची धडपड चालूच असते, हे टिपण्याचा प्रयत्न
केला.
प्रश्न - अरुण साधू म्हटलं की, मुंबई दिनांक आणि
( साधना । १४ जानेवारी २०१७
सिंहासन'चा उल्लेख होतो. किंबहुना, राजकीय कादंबरीचा
मानदंड त्यांनी मराठीत घातला, असं म्हटलं जातं. काय
कारण?
- मराठी माणसांचा महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर,
मराठी वाचनसंस्कृती ऐन भरात असताना मुंबई दिनांक',
सिंहासन या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचे विषय
मराठी कादंबरीसाठी नवे होते आणि आज एवढ्या वर्षांनंतर
महाराष्ट्रातलं राजकारणही त्याच वळणांनी जाताना दिसतं...
वाचकांना ते भिडत असावं.
प्रश्न - बहिष्कृत, त्रिशंकू, शोधयात्रा' या तुमच्या
पुढच्या कादंबऱ्या नाही रे* वर्गाचं जगणं चितारणाऱ्या.
त्रिशंकू तर तुम्हाला स्वतःला भावलेली. पण तुम्हाला
त्रिशंकू कार म्हटलं गेलं नाही...
- त्रिशंकू १९८० मध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा अनेकांना
आवडली. तिच्यावर हिंदीत लेख छापून आले. पण एकाही
मराठी वृत्तपत्राने त्यावर लिहिले नाही. एकही समीक्षात्मक
लिखाण प्रसिद्ध झालं नाही. मराठी समीक्षकांकडूनच तिची
अशी उपेक्षा झाली, तिथे आणखी काय अपेक्षा ठेवणार?
प्रश्न - मुखवटा' ही त्यानंतर १८-२० वर्षांनी
आलेली; त्रिशंकूप्रमाणेच श्रेष्ठ म्हणावी अशी. एका अर्थानं
सामाजिक, खूप मोठा पट असलेली, तुम्हाला वेगळी
ओळख देणारी महाकादंबरी. पण तुम्हाला मुखवटा कार
असंही म्हटलं जात नाही...
- मुखवटा बाबतीतही तेच घडलं. कादंबरी १९९९
मध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा प्रतिष्ठित नियतकालिकांनी
तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जाणकार समीक्षकांनी तर
तेव्हा आणि नंतरही कधी दखल घेतली नाही. तिची पुढे
चार-पाच पुनर्मुद्रणे झाली. पण इतर कादंबर््यांइतकी ती
चर्चिली गेली नाही, हे खरं. 'मुखवटा'ला वाचकांचा
प्रतिसाद मात्र समाधानकारक होता. पत्रे येत ती कार्डावर
किंवा इनलँण्डवर नव्हे, तर॒ ८-१० पानी. इंटरनेटच्या
प्रसारानंतर हे प्रमाण वाढलं. पण मला वाटतं, विसाव्या
शतकाअखेरीस संगणकीय-डिजिटल क्रांतीचा बऱ्यापैकी
प्रसार होऊन तरुणांचं वाचनावरून लक्ष उडू लागलं होतं.
त्याचं धक्का देणारं प्रत्यंतर त्या वेळी आलं.
प्रश्न - मुखवटा मध्ये आत्मकथन किती आहे?
- वाचकांना कथाविषयाला लेखकाच्या
आत्मचरित्राशी जोडण्याची सवय असते. मला ते पटत
नाही. प्रत्यक्ष अनुभव ही दुय्यम बाब आहे. हे खरं की,
'मुखवटा'चं मुख्य कथाविश्व ज्या भौगोलिक प्रदेशात उभं
User Reviews
No Reviews | Add Yours...