टीचर | TEACHER

Book Image : टीचर  - TEACHER

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सिल्विया एश्टन वार्नर - SYLVIA ASHTON WARNER

No Information available about सिल्विया एश्टन वार्नर - SYLVIA ASHTON WARNER

Add Infomation AboutSYLVIA ASHTON WARNER

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोणत्याही वर्गातून कोणत्याही मुलाला शिपायाकरवी बोलावण्यात येत असे. आलेल्या पाहुण्याने २-३ मिनिटे त्या विद्यार्थ्याशी बोलावे, प्रश्‍न विचारावे अशी अपेक्षा. एकदा एका पाहुण्याने विद्यार्थ्याला “तू वर्तमानपत्र वाचतोस का ?' असे विचारले. त्याने होय सांगितल्यावर आजची विशेष बातमी काय ?' असा पुढचा प्रश्न केला. रेड्डी व गिरी हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत,' असे शांतपणे त्वश्ति उत्तर विद्यार्थ्याकडून आले. या विद्यार्थ्याला राजकीय बातम्यात रस आहे हे ऐकून पाहुण्यांना आश्‍चर्य वाटले. त्यानंतर या दोघांपैकी कोण निवडून येईल १ असा प्रश्‍न. 'गिरी. ' विद्युतवेगाने प्रत्युत्तर. या मुलाला राजकीय मत आहे, या आश्चर्याने पाहुण्याने त्याला पुढचा प्रश्‍न विचारला, “गिरी निवडून यावेत असे तुला का वाटते ?*' यावर शांतपणे तो विद्यार्थी म्हणाला, “ रेड्डींच्या मानाने गिरी हे बरेच म्हातारे गृहस्थ आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीच्या कारकिर्दीत ते दगावल्यास शाळेला सुट्टी मिळण्याची शक्यता जास्त आहे.*' या उत्तरावर आम्हा सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. शाळेला सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना आनंद होतो, शाळा सुटल्यावर शाळेतून मुले आनंदाने ओरडत बाहेर पडतात. हा शिक्षण व्यवस्थेला शाप आहे. हा शापाचा चेंडू शेवटी शिक्षकांच्या प्रांगणात येऊन पडतो. शिकविणे आनंददायी नाही ) म्हणून शिक्षण आनंददायी नाही. यातच या शापाचं मूळ दडलंय. मुद्दाम कोणीच वाईट शिकवत नसतं. प्रत्येक जण आपापल्यापरीनं प्रामाणिकपणे शिकवत असतो. _ क्षुणालाच अस बाटत नाही की आपल्या शिकविण्यामुळं मुलांनी नाराज व्हावं. जे घडाबस वाटत तस प्रत्यक्षात घडत नाही हे खरं. शिक्षण आनंदी होण्यासाठी उत्तम दर्जाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणं हे आवश्यक आहे. यातील 'उत्तम दर्जा' हा शब्द महत्त्वाचा आहे. दिवस घालायचे म्हणून असे सरकारी चालीवरील प्रशिक्षण वर्ग हे फारसे उपयोगी पडत नाहीत. गुणवत्ता ही नेहमीच मर्यादित असते. ही मर्यादित गुणवत्ता एकत्र करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, ऑडिओ -व्हिडिओ कॅसेटद्वारे, स्वयअध्ययनाच्या पद्धतीने प्रशिक्षण करावे. या प्रशिक्षणातून शिकावे कसे' हे शिकवावे. हे तंत्र प्रशिक्षणार्थीना अवगत व्हावे अशी अपेक्षा आहे. शिकणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. 'शिकावे कसे' हे शिकल्यास सतत शिकण्याच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होईल. उ शिकविण्यातील आनंद नेहमीचे मिळावा म्हणून शिक्षकाने काय करावे ? यासाठी खाली काही उपक्रम दिले आहेत. १) शिक्षण व आपल्या आवडीच्या अन्य विषयांवरील पुस्तकांचे नियमित, भरपूर वाचन करावे. व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, अधिवेशने यांसारख्या टीचर-२८ कार्यक्रमात श्रोते किंवा व्याख्याते म्हणून सहभाग घ्यावा. २) एखाद्या चांगल्या पुस्तकाचे चर्चेसह सामूहिक वाचन करावे. चांगल्या शिक्षकांना व संस्थांना भेटी द्याव्यात. ३) एखाद्या गुणी शिक्षकाचे त्यांच्या परवानगीने पाठ पहावे. हे पाठ काही तुमच्या विषयासंबंधी तर काही इतर विषयांतील असावेत. ४) दोन-तीन गुणी शिक्षकांना बोलावून आपला स्वत:चा पाठ पाहण्यास विनंती करावी. आपले गुण व विशेषत: दोष समजावून सांगण्याबद्दल आग्रही असावे. स्वत:चे दोष व टीका जे ऐकण्यास तयार असतात, त्यांच्यात सुधारणा झपाट्याने होते. ५) शिक्षणामध्ये दरवर्षी किमान एक प्रयोग करण्यासाठी घ्यावा. त्याचे मूल्यमापन करावे. लोकांकडून आलेल्या सूचना व टीका यांतून खूप काही शिकता येते. वर्षामध्ये प्रत्येक उपक्रम किमान एकवेळ केलेली असावा. शिक्षकाने स्वत:मध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न कशासाठी व का करावा ? हा प्रश्‍न अगदी योग्य आहे. मुख्याध्यापकांना बरे वाटेल, शाळेचा निकाल वाढेल यासाठी मुळीच करू नका, तुमच्यात होणाऱ्या बदलामुळे तुम्ही आनंदी होणार्‌ आहात, तुमची गुणवत्ता वाढणार आहे. शाळेची घंटा झाल्यावर तुम्ही घरी येता. तेव्हा मिळालेला आनंद व गुणवत्ता हे शाळेतच स॒हत नाही. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाच अविभाज्य अंग असतं. त्यामुळे ते तुमच्याबरोबर सतत असतं. त्याचे फायदे तुमच्या व्यक्तिगत जीवनात पदोपदी मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आणखीन आनंदी होता आणि पर्यायानं तुमचं अध्यापनही आनंदी होतं. शिक्षण चांगलं होतं, शिक्षणाचं भलं होतं. शिक्षणाचं चांगभलं. सिल्व्हियाच्या टीचर या मराठीतील पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनोविकास प्रकाशन चे अरविद पाटकर यांचा मी आभारी आहे. त्याच प्रमाणे ही प्रस्तावना लिहिण्याच्या कार्यात मदत केल्याबद्दल सर्वश्री राहल व शेखर महाडिक या बंधूंना विशेष धन्यवाद. प्रस्तावना ब पुस्तकावरील प्रतिक्रिया जाणून घेण्यास मला नक्कीच आनंद होईल. पु.ग. वैद्य किशोरमित्र ४४/५६, नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर, पुणे-४११०५२ दूरध्वनी - २५४६९४६८ टातीक्षा| । ४ 951934 दल ॥6ाशिनी,७०ा २९-टीचर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now