सत्य कोणतं आणि जादू कुठली ? | SATYA KOTNE ANI JADU KUTHLI ?

Book Image : सत्य कोणतं आणि जादू कुठली ? - SATYA KOTNE ANI JADU KUTHLI ?

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रिचर्ड डोकिंस - RICHARD DAWKINS

No Information available about रिचर्ड डोकिंस - RICHARD DAWKINS

Add Infomation AboutRICHARD DAWKINS

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कुठल्याही, लोणकढया थापेवर आपण विश्वास ठेवावा. कल्पनेला मर्यादा नाहीत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ! प्रत्यक्षात अशक्यकोटीतील अशा कितीतरी गोष्टी कल्पनेत असतात. पऱ्या आणि राक्षस; अप्सरा आणि खवीस...! नव्या कल्पनांबद्दल स्वागतशील असतानाच भोळसटपणे सगळ्यावरच विश्वासून चालणार नाही. काटेकोर पुराव्याबद्दल आग्रही असलं पाहिजे आपण. मॉडेल (प्रतिमान) : कमाल कल्पनाशक्तीची आपल्या इंद्रियांपल्याडची सृष्टी जाणण्याची शाखज्ञांची एक वेगळीच तऱ्हा आहे. काय असेल याचा अंदाज बांधून एक मॉडेल गृहीत धरलं जातं. अमुक अमुक तऱ्हेची काहीतरी रचना असेल असं समजलं जातं. यावरून अपेक्षित परिणामांचे आडाखे बांधले जातात. थोडं गणित मांडून सदरहू रचनेनुसार काय असण्याची, दिसण्याची, ऐकू येण्याची शक्यता आहे हे ठरवलं जातं. (हे दिसणं, ऐकणं हे थेट इंद्रियांद्रारे असेल वा यंत्राद्वारे असेल.) अखेर जे अपेक्षित आहे तेच घडतंय ना, जसंच्या तसंच घडतंय ना, हे तपासलं जातं. “मॉडेल* म्हणजे काही दरवेळी पुठ्याचं किंवा लाकडाचंच काही असेल असं नाही. कागदावर केलेली गणिती आकडेमोड हीसुद्धा एक मांडलेला अंदाज, म्हणजेच “मॉडेल', असू शकते. आजकाल कॉम्प्यूटरच्या साहाय्याने त्रिमिती मॉडेल आपण पडद्यावर पाहू शकतो. या मूळ मॉडेलवरून काही भाकीतं वर्तवली जातात. मग ती तपासली जातात. गरजेप्रमाणे मॉडेलमध्ये बदल केले जातात, सुधारणा केल्या जातात. भाकीतं चुकली तर ते मॉडेल बाद ठरवून नव्या मॉडेलचा शोध सुरु होतो. जर ती बरोबर आली तर आपलं मॉडेल योग्य आहे असं आपण म्हणतो. अधिक काटेकोरपणे बोलायचं, तर आपलं मॉडेल योग्य आहे, सत्य परिस्थितीचं यथार्थ दर्शन आहे, असं आपण “समजू लागतो. सत्याच्या अधिकाधिक निकट पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो. एका उदाहरणानी हे अधिक स्पष्ट होईल. अनुवंशिक गुण, जीन्सद्वारे आणि त्यातही हे जीन्स बनलेले असतात त्या डी.एन.ए.च्या रेणूद्वारे वाहून नेले जातात हे आपल्याला माहीत शैक्षणिक संदर्भ अंक - ११२ ७४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now