आपले शरीर | AAPLE SHAREER

Book Image : आपले शरीर   - AAPLE SHAREER

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रमेश बिजलानी - Ramesh Bijlani

No Information available about रमेश बिजलानी - Ramesh Bijlani

Add Infomation AboutRamesh Bijlani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रक्ताच्या हालचालीमागची शक्ती एका अद्‌भुत पंपापासून येत असते - हृदयापासून येत असते. हृदयाची डावी व उजवी बाजू म्हणजे दोन पंप असतात. उजवी बाजू हृद्याकडून फुफूसाकडे रक्ताला ढकलते. फुफुसामधून रक्त हृदयाच्या डाव्या बाजूकडे येते. हृदयाची डावी बाजू शरीराच्या सर्व भागांकडे रक्त ढकलते. शरीराच्या सर्व भागांकडून परत येणारे रक्त हृदयाच्या उजव्या भागाकडे परत येते व इथून फुफुसांकडे ढकलले जाते. अशा प्रकारे जाते. अशा प्रकारे हे चक्र चालू रहाते हृदयाच्या डाव्या बाजूकडून शरीराच्या सर्व अवयवांकडे ढकलले जाणारे रक्त हे फुफुसांकडून नुकतेच परतलेले असते - म्हणजेच रक्ताला प्राणवायू मिळालेला असतो ब त्यातला कर्ब-द्वी-प्राणिल वायू नष्ट झालेला असतो. हे डाव्या बाजूने ढकललेले रक्त सर्व अवयवांना प्राणवायू पुरवते व त्याचबरोबर कर्ब-द्वी-प्राणिल वायू गोळा करते. मग रक्त हृदयाच्या उजव्याबाजूकडे येते. उजवीबाजू रक्ताला फुफ़ुसांकडे धाडते. तिथे त्यात नवा प्राणवायू मिसळतो व काही कर्ब-द्वी-प्राणिल वायू काढून घेतला जातो अशा प्रकारे चक्र चालू राहते पण आपण सर्व जण सतत हवेतील प्राणवायू घेऊन का सोडत राहिलो तर एक दिवस हवेतील सर्व प्राणवायू संपून नाही का जाणार? खरे म्हणजे ही गोष्ट केंव्हाच घडली असती! पण तसे झाले नाही.याला कारण आहेत आपले हिरवे मित्र - झाडे. झाडे स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कर्ब-द्वी-प्राणिल वायू घेतात व प्राणवायू हवेत सोडतात. आपण आपल्या अन्नाचे ज्वलन करण्यासाठी प्राणवायू घेतो व कर्ब-द्वी-प्राणिल वायू हवेत सोडतो. अशा प्रकारे हे चक्र चालू रहाते. 14




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now