गमतीदार भूते | GAMTIDAR BHUTE

Book Image : गमतीदार भूते  - GAMTIDAR BHUTE

More Information About Authors :

गीता आयंगर - GEETA AAYANGAR

No Information available about गीता आयंगर - GEETA AAYANGAR

Add Infomation AboutGEETA AAYANGAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टिप्पू आजोबा बसले होते तिकडे हरी गेला आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना खेटून उभा राहिला लागलीच आजोबा ओरडले-“माझ्या मानेवर कोणाचा श्‍वास येतोय?” त्यांनी पटदिशी मागे वळून पाहिले. पण अर्थातच त्यांना काही दिसले नाही. अगदी हरीच्या डोळ्याला डोळा लावून पाहत असतानाही. हरी एक पाऊल मागे सरकला “हे कोणता खेळ खेळतायत ते पाहिलंस का?” प्रिया म्हणाली. “आपल्या ल्यूडोसारखाच दिसतोय.”” तो एक जाड पुठठयाचा मोठा चौकोनी तुकडा होता. त्याच्यावर पंचवीस चौरस काढले. 'होते. प्रत्येक बाजूच्या मध्यभागी आणि आकृतीच्या मध्यभागी असलेल्या चौरसांवर एकेक फुली मारलेली होती. ती मुले नाण्याऐवजी बटणे वापरतं होती. त्यांचे फासे म्हणजे चार कवड्या होत्या. उघड्या बाजूला उडणारी प्रत्येक कवडी म्हणजे एक गुण आणि चारीही उपड्या पडल्या तर आठ गुण अशा प्रकारे ते खेळत होते. आपल्या बाजूच्या चौरसावरून सुरुवात करून चक्राकार फिरून मध्यभागी असलेल्या चौरसावर पोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ल्यूडोप्रमाणेच दुसर्‍याच्या मालकीच्या जागेवर पडून त्याला पुन्हा सुरुवात करायला लावायच्या प्रयत्नात प्रत्येकजण होता “आजोबा जिंकतायत;,”' हरी म्हणाला तेवढ्यात टिप्पू आपल्या जागेत घुसणार हे पाहताच कुप्पू ओरडला, “तू खोटं खेळतोयस. तुंला तीनच पडले होते; चार नाही. मी पाहिलंय.” “नाही. मला चारच पडले होते,” टिप्पू दणक्यात म्हणाला, “नाही का रे थंबू?” “होय,” थंबू म्हणाला. “नाही,” अप्पू ओरडला, “टिप्पू खोटं खेळतोय.” आणि मारामारी सुरू झाली. काही वेळ सगळ्यांचेच हात आणि पाय वेगाने काम करत होते. तेवढ्यात कुप्पूचा एक गुद्दा जोरात लागल्याने थंबू एकदम मोठ्याने रडू लागला - ताबडतोब दिवाणखान्याच्या दोन्ही बाजूंच्या खोल्यांतून आणि आतल्या बोळकांडीतून दहा एक तरी माणसे डोकावू लागली “इतके लोक!” प्रिया आश्चर्याने म्हणाली, “इतका वेळ हे सगळे कुठं होते?” मारामारीत गुंतलेल्या त्या चारी मुलांकडे येत एक वयस्क बाई तक्रारीच्या सुरात म्हणाली,” ही मुलं नेहमीच मारामाऱ्या करतात बाई!”' ती तशी येतांना दिसताच टिप्पूने स्वतःची सुटका करून घेतली आणि दिवाणखान्याच्य! बाहेर थेट पुढच्या दरवाजातून त्याने सूंबाल्या केला. उरलेले तिघे तितक्याच वेगाने त्याच्या पाठोपाठ पळाले. आता ती मुले काय करतात ते पाहायला हरी आणि प्रेयाही त्यांच्या पाठोपाठ पळाली “हे सगळे किती चपळ आहेत, नाही?” दम खात हरी उद्गारला 14




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now