डेनिस ची गोष्ठ -4 | DENNIS CHI GOSTH - PART 4

DENNIS CHI GOSTH - PART 4  by पुस्तक समूह - Pustak Samuhविक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY

No Information available about विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY

Add Infomation AboutVICTOR DRAGUNSKY

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
असली तर तो शिटीसुद्धा वाजवील ! होय ना वान्या? तो शिटी वाजवील आणि सर्वांना त्याचा हेवा वाटेल . पोलीससाहेब , तुम्हालासुद्धा त्याचा हेवा वाटेल ना! पोलीस गप्प बसला . ती म्हणाली: “ इकडे ये मुला, सोनुल्या तू माझा ! पकड चाक! घट्ट पकड! एखाद्या लहान बाळाला गोडीगुलाबी दाखवतात , तशी ती मला वागवत होती . निळ्या चेहऱ्याच्या माणसासमोर तिने मला बसवले . त्या माणसाच्या अंगाला पेट्रोलचा जोरदार भपकारा येत होता . त्याने चाकावर स्वतच्या हातादोजारी माझा हात ठेवला आणि मोठ्ट्या , काळ्या पडलेल्या नखांची त्यांची बोटे जाडजूड असल्याचे मला आढळले . त्याने पावंडा दाबला, तरफा खेचल्या आणि त्या भयानक जागेपासून आम्ही तिघे दूर जाऊ लागलो . भोवती सर्व हिरवेगार होते - गवत , भोजाची सडपातळ झाडे - आणि वाऱ्या- बरोबर पानांचा गंध दरवळत होता . जण्‌ मध्यंतरी काही घडलेच नव्हते आम्ही मुकाटपणे प्रवास करत होतो . जरी मी हातात चाक धरले होते, तरी कोणताही. खेळ मी खेळत नव्हतो . माझी इच्छा नव्हती निळ्या चेहऱ्याचा माणूस अचानक त्याच्या मदतनीस मुलीला म्हणाला : “ ह्या पोराचा बाप किती ह्यर आहे बघ! प्रत्येकजण असा धोका नाही पत्करत ... परक्या- च्या मुलीचा जीव त्यानं वाचवला ! मोटार आपटून घेतली! मोटार तर पत्र्याची ... ती. दुम्स्त करता येईल ! पण पोरीचा जीव वाचवायला धडपडला , है जास्त महत्त्वाचं ! ... त्यापायी स्वत:च्या मुलाला त्यानं श्रोक्यात घातलं ! मोठ्या मनाचा माणूस आहे ... फार थोर मनाचा । अश्या लोकांचा युद्धभाघाड्ीवर आम्ही फार फार आदर केला... त्याने माझ्या नाकावर बोट ठेवले आणि दाराच्या घंटीचे बटण दाबावे तसे दाबले: ' ट रर-र-र ! माझ्या बाबांबद्दल तो असे चांगले गब्द बोलला, तेव्हा मी त्याचा जाड अंगठा जोरात पिळला आणि रडू लागलो. सादोवाया रस्त्यावरील मोठी वाहतुक वान्या दीखोवची एक सायकल होती . खूप खूप जुती , पण तरीही ती होती हे महत्त्वाचे . पूर्वी ही सायकल वान्याच्या बाबांची होती, पण जेव्हा सायकल मोडली, तेव्हा वान्याचे बाबा त्याला म्हणाले : “ ट्रे बघ वान्या , सबंध दिवसभर उंडारण्यापेक्षा ही घे तुला सायकल , तिला दुम्स्त कर आणि तुला स्वतःची सायकल होईल . तक्ली ती अजून धडधाकट आहे . जेव्हा मी तिला विकत घेतली होती , तेव्हा ती नवीकोरी होती. वान्याला ह्या सायकलबद्दल झालेल्या आनंदाचे वर्णन करणे अद्क्य आहे . त्याने ती आमच्या आवाराच्या पार टोकाला नेऊन उभी केली व निष्कारण उंडारणे अजिबात बंद केले- उलट तो आख्खा दिवस त्या सायकलच्या दृरुस्तीमध्ये गुंतला . आमचा वान्या वंगणाने माखून निघायचा . सायकलच्या ठोकाठोकीत त्याची सर्व बोटे जखमांनी भरून गेली होती . पण तरीही त्याला त्याच्या दुसस्तीकामात यश येत होते, कारण त्यांना पाचवीच्या वर्गात यंत्रशाळेत धातूकाम शिकवतात आणि वान्याला नेहमी त्या विषयात “ उत्तम '' दोरा मिळायचा . मीसुद्धा वान्याला त्याच्या दुम्स्तीमध्ये मदत करत होतो आणि दररोज तो मला म्हणायचा : “जरा थांब, देनीस . जेव्हा ही सायकल मी पूर्ण दुरुस्त करीन, तेव्हा तुला तिच्यावरून फिरवीन . तू मागं कॅरीयरवर बसशील आणि आपण दोघं सबंध मॉस्कोभर भटक मी त्याला आणखी मदत करत होतो, कारण त्याची-माझी मैत्री होती, जरी मी फक्त दुसरीत होतो आणि तो पाचवीत होता . कँरीयर अधिक सुंदर बनावी म्हणून मी मुख्यतः झटत होतो . मी कॅरीयरला चारदा काळ्या रंगाचे हात मारले होते, कारण ती जणू खास माझ्या मालकीची होती असे मला वाटत होते . माझी ती कॅरीयर तृव्या ' वोल्गा ' मोटारीसारखी चमकत होती. वान्याच्या कमरपट्ट्याला पकडून, त्या कॅरीयरवर बसून आम्ही दोघे सबंध जगभर कसे भटक, ह्याच्या नसत्या कल्पनेने मी फ॒ुलारत होतो दोवटी एके दिवशी वान्याने सायकल सरळ उभी केली, तिच्या धावांमध्ये हवा भरली स्वच्छ चिंधीने तिला पुसून काढले , पिंपाच्या पाण्यात स्वतःचे हात स्वच्छ धुतले , विजारीच्या खालच्या टोकांना कपडे वाळत घालायचे चिमटे लावले . आमचा सणाचा क्षण जवळ आल्याचे मला समजले . वान्या सायकलवर बंसला आणि पावटे मारू लागला . प्रथम त्याने सावकाशपणे आवारात फेरी मारली . चाके छान फिरत होती . जमिनीवर त्यांच्या मंद घासण्याचा आवाज ऐक येत होता . वान्या जोराने पावंडे मारू लागला . चाकांमधल्या काड्या चमकत होत्या . तो नागमोडी वळणे घेऊ लागला , इंग्रजी आठाच्या आकड्यात साग्रकल फिरवू लागला . एखाद्या चाचणी वैमानिकाप्रमाणे वान्या सायकलचा प्रत्येक भाग तपासून पाहात होता . वेगात साग्रकल दामटून एकदम ब्रेक लावून जागच्या जागी थांबवत होता . विमानाचा मेकॅनिक स्वतःच्या वैमा- निकाला हवेत पाहात असतो, त्याप्रमाणे मी उभा राहन वान्याच्या सायकलवरील करामती पाहात होतो . तो छान चालवत होता ह्याचा मला आनंद वाटत होता , पण मीसुद्धा त्याहून जास्त सफाईने सायकल चालवू शकेन अशी माझी खात्री होती . निदान त्याच्यापेक्षा वाईट नक्कीच नव्हे . पण ती सायकल माझी नव्हती , वान्याची होती , तेव्हा ह्यावर फार चर्चा करण्यात अर्थ नाही . खु्याल त्याला हवी तज्ली ती सायकल चालवू दे . सायकलची चमक बघायला छान वाटत होते आणि ती सायकल जुनी होती ह्यावर विश्वास ठेवणे अवघड होते . कोणत्याही नव्या सायकलपेक्षा ती जास्त छान होती . विदेषत: तिची कॅरीयर . तिच्याकडे डोळे भरून पहात असताना छातीत आनंद मावत नव्हता. वाल्या “सुमारे अर्धा तास सायकलवरून फिरत होता . माझ्याबद्दल तो पूर्ण विसरून गेला २०्ऱे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now