विश्वाची रचना | VISHWACHI RACHNA

Book Image : विश्वाची रचना  - VISHWACHI RACHNA

More Information About Authors :

जयंत नारलीकर - JAYANT NARLIKAR

No Information available about जयंत नारलीकर - JAYANT NARLIKAR

Add Infomation AboutJAYANT NARLIKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विश्व सतत प्रसरण पावत अनंतात विलीन होईल असे. सांगतात. ह्या दोन पर्यायात आणि पहिल्या पर्यायात एक महत्वाचा फरक आहे अवकाशातल्या भूमितीतला, तो प्रथम समजावून घेवू आपण राहतो ती पृथ्वी गोल आहे. जर आपण पृथ्वीतलावर एखाद्या दिशेने निघालो आणि आपला मार्ग सरळ ठेवला तर पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणाकरून निघण्याच्या ठिकाणी येऊ. असेच जर आपण अंतराळात सरळमार्गाने निघालो तर विश्वाला वळसा घालून परत येऊ का ? जर असे शक्‍य होईल तर विश्वाची भूमिती गोलाकार म्हटली पाहिजे. फरक इतकाच की पृथ्वीतलावर दोनच मिती असतात तर अंतराळात तीन. असे विश्व सीमा नसलेले तरी परिमित आकारचे असणार. अशी भूमिती असलेले विश्व प्रसरण आणि आकुंचन दोन्ही दशांतून जाणार . ह्या भूमितीची प्रमेये युक्लिडच्या प्रमेया पेक्षा वेगळी असतील. एका उदाहरणाद्वारे हा फरक स्पष्ट होईल. युक्लिडच्या त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० अंश भरते. सपाट जागेवर काढलेल्या त्रिकोणाला हा नियम लागू पडतो. जर्‌ आपण गोल पृष्ठभागावर त्रिकोण काढला तर त्याच्या कोनांची बेरीज १८० अंशापेक्षा जास्त भरेल. हा त्रिकोण कसा काढायचा ? जर आ, ब, क हे तीन बिंदू एखाद्या चेंडूवर अंकित केले तर शाईत बुडवून एक रबरी पट्टा अ, ब, च्या दरम्यान ताणावा. त्या पट्ट्याचे चिन्ह चेंडूवर उमटेल. हाच प्रकार ब, क आणि क, अ बाबतीत करून पहावा म्हणजे अब क त्रिकोण चेंडूवर तयार होईल. याचे तीन कोन मोजून पहावे त्यांची बेरीज १८० अंशापेक्षा जास्त भरेल. त्या उलट खोगिरीच्या पृष्ठभागावर हा प्रयोग केला तर तीन कोनांची बेरीज १८० अंशापेक्षा कमी भरेल. चेंडू. खोगीर आणि सपाट पृष्ठ भाग ह्या दोनमितीच्या उदाहरणा प्रमाणे तीन मितीतली उदाहरणे विश्वाला लागू होतात. खोगीर आणि सपाट क्षेत्र ह्यांची तीनमितीतली उदाहरणे सतत प्रसरण पावणाऱ्या विश्वाला लागू पडतात. विश्वाचे पुढे आकुंचन होईल का ते सतत प्रसरणशील राहील हे ठरते विश्वाच्या घनते वरून. जर घनता एका ठराविक मर्यादे पलिकडे असेल तर विश्वाचे आकुंचन होईल, एरव्ही सतत पसरण चालू असेल. ही घनतेची मर्यादा पाण्याच्या घनतेच्या दश कोटी कोटी कोटी कोटी अंशाहून कमी आहे. विश्वाची वास्तविक घनता किती आहे हे अद्याप माहीत नाही कारण अदृश्य स्वरूपात विश्वात - दृश्य पदार्थांहून पुष्कळ अधिक पदार्थ आहेत याची जाणीव खगोलशासतरज्ञांना येत आहे. भविष्याबद्दल अटकळी बांधण्यापेक्षा भूतकालाची छाननी कित्येकदा अधिक २४ विश्वाची रचना फायद्याची ठरते. फ्रीडमनच्या तीनही प्रकारच्या प्रतिकृती हे दर्शवतात की विश्वाचा उगम एका सुक्ष्म स्वरूपात पण स्फोटकरूपाने झाला आणि आजचे प्रसरणशील विश्व म्हणजे त्या स्फोटाचे पडसाद आहेत. हा स्फोट कसा होता ? त्यानंतर विश्वाची रचना कशी होती ? कालांतराने ती कशी बदलत गेली ? त्या आदिकाळाचे काही अवशेष आज आहेत का ? इत्यादी प्रश्‍न मनात उभे राहतात. सध्याच्या सीमित ज्ञानाच्या मर्यादेत त्यांची उत्तरे शोधणे चालू आहे. आदिकाळातला एक महत्वाचा अवशेष, म्हणजे आज सर्वत्र दिसणारे सूक्ष्मतरंगांचे प्रारण. हे प्रारण सापडले १९६५ मध्ये अनपेक्षितरीत्या ! बेल टेलिफोन लॅबॉरेटरीतले दोन शाखरज्ञ आकाशगंगेचे वेध घेण्यासाठी सूक्ष्मतरंगांचा अँटेना उभारत होते. आर्नी पेझियास आणि रॉबर्ट विल्सन हे ते शाखरज्ञ . अँण्टेनाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी सात सेंटीमीटर वेव्हलेंग्थवर वेगवेगळ्या दिशांचे वेध घ्यायला सुरवात केली तो त्यांना एक आश्चर्यकारक शोध लागला. आकाशातील सर्व दिशांतून समप्रमाणात प्रारण येत होते ! सामान्यत: प्रारण ख्त्रोतांकडून अपेक्षित असते आणि प्रारणाच्या तीव्रतेवरून आपण खोताची दिशा ठरवू शकतो. पेंझियास आणि विल्सनला तसे करता येत नव्हते कारण प्रारणात उच्चनीच तीव्रता नव्हती - सर्व दिशा सारख्याच होत्या. तेव्हा त्या प्रारणाचा उगम कशात असणार ? विश्वरचनाशास्त्र आणि महास्फोटाच्या सिध्दांताची माहिती नसल्याने हा प्रश्‍न त्या दोघांपुढे उपस्थित झाला होता. वास्तविक त्यापूर्वी दोनदशके आधी जॉर्ज गॅमॉ नावाच्या शासज्ञाने महास्फोटानजीकच्या क्षणांची . . . पहिल्या काही मिनिटांची . . . माहिती मिळवायचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नांवरून असे प्रारण आज अवशेषाच्या रूपात असावे हा निष्कर्ष काढला होता. क्रमशः: ह्या निष्कर्षाचा आणि पेंझियास - विल्सन यांच्या शोधाचा मेळ बसवला गेला. गॅमॉने केलेल्या संशोधनाची थोडक्यात माहिती करून घेणे योग्य ठरेल. महास्फोटा नंतर विश्व अतितप्त अवस्थेत असणार आणि त्यावेळी अणुगर्भांची परस्पर जोडणी होऊन आज विश्वात दिसणारी मूलतत्वे तयार झाली असणार हा गॅमॉचा अंदाज होता. तो अंशत: खरा ठरला. हायड्रोजन, ड्यूटीरियम, हिलियम सारंखी छोटी मूलतत्वे पुरातन काळाच्या अतितप्त विश्वात बनली होती हे म्हणायला जागा आहे. परंतु कार्बन, ऑक्सिजनपासून लोखंड, यूरेनियम सारख्या प्रचंड अणुगर्भाची रचना त्यावेळी न होता नंतर तार्‍यांमध्ये झाली असे आज दिसून येते. गॅमॉच्या गणितात आधुनिक, म्हणजे गेल्या वीस वर्षातले अणुगर्भशासातले . विश्वाची रचना २५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now