स्वामी आणि त्याचे दोस्त | SWAMI ANI TYACHE DOST

SWAMI ANI TYACHE DOST  by अशोक जैन - ASHOK JAINआर० के० नारायण - R. K. NARAYANपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अशोक जैन - ASHOK JAIN

No Information available about अशोक जैन - ASHOK JAIN

Add Infomation AboutASHOK JAIN

आर० के० नारायण - R. K. NARAYAN

No Information available about आर० के० नारायण - R. K. NARAYAN

Add Infomation AboutR. K. NARAYAN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
28 स्वामी आणि'त्याचे दोस्त व तिला सुटे पैसे दिले. पाकिटात डोकावीत ते म्हणाले, “उरलेला महिना मी कसा काढणार कोण जाणे !” त्यांनी खणाचे कुलुप लावले. आरशासमोर फेटा ठाकठीक केला. भरपूर तपकीर नाकात कोंबली, आपल्या रुमालानं नाक साफ करीत ते बाहेर पडले. स्वामिनाथननं सुटकेचा निश्वास टाकला. रस्त्यावरच्या दरवाज्यावरूनच वडिलांनी कडी लावून घ्या असं फर्मान सोडलं. कडी लावल्याचे आवाज स्वामिनाथनला ऐकू आले. खिडकीतून त्यानं वडिलांना कोपऱ्यावर ळताना पाहिलं व मग तो तेथून उठला. त्याची आई स्वयंपाकघरात आचाऱ्याला दुपारच्या कॉफीबद्दल सूचना देत होती. आजी तिच्या गादीवर उदून बसली होती. त्याला पाहताच ती म्हणाली, “इकडं ये रे बाळा.” “अं हं. मला आता वेळ नाही.” “ये ना.मी तुला तीन पै देईन” आजी आर्जव करीत म्हणाली. स्वामिनाथननं तिकडं दुर्लक्ष केलं व तो बाहेर जायला निघाला. “तू कुठं निघालास ?” आईनं विचारलं. “मला जायलाच हवं,' चेहरा गंभीर करत स्वामीनाथन म्हणाला. “उन्हात भटकणार आहेस का?” “मुळीच नाही, त्यानं ताडकन उत्तर दिलं “वाटेल तसं उनाडपण॑ भटकून ताप येईल.” “नाही आई, मी उगाच भटकणार नाही. “सुटीच्या दिवशी घरात रहायला तुला बाबांनी सांगितलंय ना?” “हो. पण माझ्या चित्रकलेच्या गुरुजीनी मला भेटायला बोलावलंय. मला वाटतं तरी सुद्धा मी जाऊ नये. मग तो कडवटपणं म्हणाला, “चित्रकलेच्या परीक्षेत मी नापास झालो तर तुला आनंदच होईल ञै ग्रोव्ह स्ट्रीटवरून स्वामिनाथन पळत सुटला, तो उजवीकडं वळून, अबू गल्लीतून मार्ग काढीत एका मळकट घरापुढं उभा राहिला. त्यानं हलकेच शिटी वाजवली. क्षणभर तो थांबला आणि त्यानं पुन्हा शिटी वाजवली. दरवाजाच्या कडीचा आवाज झाला, दरवाजा थोडा किलकिला झाला आणि मणीचं डोकं दिसू लागलं. तो म्हणाला, “अरे मूर्खा, माझी मावशी आहे घरात, तेव्हा आत येऊ नकोस. तिकडं जाऊन माझी वाट बघ. स्वामीनाथन तेथून दूर जाऊन एका झाडाखाली वाट पाहत थांबला. सूर्याचं रखरखीत ऊन अंग भाजून काढत होतं. रस्ता जवळ जवळ निर्मनुष्य होता. गयरशजवळ एक गाढव उं होतं व आपलीच सावली पाहत होतं. एक गाय केळीचं हिरवंगार पान चघळत होती त्याच वेळी मणि त्याच्या घरातून गुपचूप बाहेर पडला. 3 राजमचे वडील लॉले एक्स्टेशनवर राहायचे. (मालगुडी सर्कलच्या एकेकाळी सुपरिटेंडिंग इंजिनिअर असलेल्या सर फ्रेडरिक लॉले यांचं नाव त्या भागाला दिलेलं होतं). तिथं सुमारे पन्नास टुमदार बंगले होते आणि बहुतेक सरकारी अधिकारी त्यातून राहत होते. न पुढून काही अंतरावरून तिरुचरापल्लीकडं जाणारा ट्रंक रोड - मुख्य रस्ता -




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now