कहाणी वर्तमानपत्राची | KAHANI VARTMANPATRACHI

KAHANI VARTMANPATRACHI  by चंचल सरकार - CHANCHAL SARKARदिनकर गोयल - DINKAR GOYALपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

चंचल सरकार - CHANCHAL SARKAR

No Information available about चंचल सरकार - CHANCHAL SARKAR

Add Infomation AboutCHANCHAL SARKAR

दिनकर गोयल - DINKAR GOYAL

No Information available about दिनकर गोयल - DINKAR GOYAL

Add Infomation AboutDINKAR GOYAL

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भि जेवढं वर्तमानपत्र मोठं तेवढी त्याची यंत्रणा विस्तृत असते. उपवृत्तसंपादक, विज्ञानसंपादक, छायाचित्र संपादक असेही अधिकारी असतात. पण हे सगळे धागे शेवटी जाऊन पोचतात संपादकाशी. त्याचं काम नेत्याचं आणि सूत्रधाराचं असतं. वाद्यवृंदाचा जसा संचालक तसा वर्तमानपत्राचा संपादक ही तुलना त्यातल्या त्यात जवळची. वाद्यवृंदाच्या प्रत्येक वादकाला संचालक सूचना देतो. त्याप्रमाणे तो त्यांचे स्वतःचे वाद्य स्वतंत्र वाजवतो आणि ते योग्य स्वरमेळामध्ये बसतं. संपादकाला तर काचेची खोली हवीच. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये संपादकाची भूमिका वेगवेगळी असते. एकाद्या वर्तमानपत्रात तो मुख्यतः लिहिणारा माणूस असतो. विषय ठरवायचा, लिहायचे, संपादकीय पाठवायचे आणि मग संपादकीय पानाचे काम पाहायचे. बाकीच्या गोष्टी सहकाऱ्यांवर सोडायच्या अर्थात त्याचं नियंत्रण असणारच. किंवा तो फक्त नियोजनकर्ता असेल आणि त्याचा बहुतेक वेळ आणि कल्पनाशक्ती बातमी कशी आणवयाची, ती प्रसिध्द कशी करायची, तसेच महत्वाच्या विषयावर कसं मतप्रदर्शन व्हायला हवं हे ठरविण्यातच खर्च होईल. तो कदाचित एक ओळ ही लिहिणार नाही. ऐकून नवलच वाटेल, पण जगातले काही उत्तम तडफदार संपादक नुसत्या कल्पना डोक्यात घोळवत असतात आणि इतरांना लेखनप्रवृत्त करतात. मात्र भारतीय संपादक सहसा संपादकीय किंवा स्तंभलेखन पसंत करतात, ते नियोजनास फार वेळ देत नाहीत. काही देशांमध्ये नियोजनकोशल्य असणाऱ्या संपादकांस पसंती असते. भारतातही काही संपादक या बाबतीत अनुकूलता दाखवू लागले आहेत. झ 29




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now