एकचित्र विचार करूया | THINKING TOGETHER

Book Image : एकचित्र विचार करूया  - THINKING TOGETHER

More Information About Authors :

अनुजा हर्डीकर - ANUJA HARDIKAR

No Information available about अनुजा हर्डीकर - ANUJA HARDIKAR

Add Infomation AboutANUJA HARDIKAR

अहिल्या चारी - AHILYA CHARI

No Information available about अहिल्या चारी - AHILYA CHARI

Add Infomation AboutAHILYA CHARI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाटून घेण्यातील आनंद त्या संध्याकाळच्या फिरत्या शाळे '* संदर्भात त्या बाईंनी दिलेले व्याख्यान ऐकून असलम आणि त्याचा खास मित्र अर्जुन फारच प्रेरित झाले. अतिशय उत्साहाने ऐकलेल्या गोष्टींवर ते चर्चा करत होते आणि घरी येईस्तोवर त्यांनी त्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे निश्चितही केले. त्या संध्याकाळी शाळेत आलेल्या शिक्षिका शहरातील गरिबांच्या दुःखी जीवनाबद्दल सांगत होत्या आणि त्यांच्या हलाखीच्या आयुष्याची या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना कल्पना आहे का, याचा अंदाज घेत होत्या. त्या शिक्षिका शहरातील बांधकाम मजुरांविषयी सांगत होत्या. इमारती, कार्यालये, दुकाने बांधणारे, कष्टकरी महिला, पुरुष. अनेक दूरदूरच्या गावांतून हे कामगार उदरनिर्वाहासाठी शहरात येतात. त्यांना रोजंदारीवर पैसे मिळतात. म्हणजे, आजारी असल्याने जर ते कामाला जाऊ शकले नाहीत, तर त्यांना त्या दिवसाचे वेतन मिळत नाही. हे पुरुष मुख्यत्वे चिनाई, झिलई, सुतारकामासारखी कौशल्याची कामे करतात; तर त्यांच्या बायका बिटा, सिमेंट, माती, लाद्या अशा बांधकामाला आवश्यक सामानाची ने-आण करतात. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरणाऱ्या त्यांच्या मुलांची ठराविक अशी शाळा नसते. ते आजूबाजूला खेळत राहतात, एकमेकांशी भांडतात किंवा आईवडलांची लहानमोठी कामे करतात. तेजस्वी डोळ्यांची मुले, जी शाळेत जाणे अपेक्षित आहे - त्यांचे कळकट, मळलेले रूप पाहणे हे खरे दुःख आहे. म्हणून काही लोकांनी एकत्रित येऊन, स्वयंसेवकांच्या मदतीने ह्या मुलांना शिक्षण द्यायचे ठरवले. काही वर्षांपूर्वी अतिशय लहान स्वरूपात ही चळवळ सुरू झाली आणि हळूहळू ती लोकांच्या नजरेत आली. सकाळच्या वेळेत कोणत्याही एका इमारतीमध्ये सुरुवातीला वर्ग भरत आणि वर्गासाठी कामचलाऊ सामान वापरले जाई. हळूहळू त्या मुलांच्या पालकांना यामध्ये रस वाटू लागला आणि त्यांनी शाळेची मागणी केली. म्हणूनच शाळेत आलेल्या त्या बाई विविध शाळांमधून शिक्षक आणि माध्यमिक विद्यार्थी-स्वयंसेवक शोधत होत्या. २८ । एकत्रित विचार करू या ऐकल्यावर असलमं आणि अर्जुनने त्यांना मदत करायचे ठरवले. त्या बाईंनी दिलेल्या पत्त्यावर येत्या शनिवारी त्यांना भेटण्यासाठी त्यांनी आईची परवानगी घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या भूगोलाच्या सरांना - मॅथ्यू सरांना - पाहून त्यांना आनंद झाला. त्या कामचलाऊ शाळेमध्ये फेरफटका मारल्यावर जे ऐकले आणि पाहिले, ते पाहून त्यांना धक्का बसला. हातात पाट्या किंवा जुनी पुस्तके घेऊन जमिनीवर बसलेली साधारण चाळीस मुले, वय वर्षे तीनपासून बारापर्यंत एका खोलीत एकत्र बसली होती. पण सर्वच शिकायला उत्सुक आणि चौकस होती. मॅथ्यू सरही हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी काहींना कलेमध्ये मदत केली. अर्जुनही त्यांच्यासोबत काम करू लागला. असलमने दुसर्‍या कोपऱ्यात बसलेल्या मुलांना अंकगणित शिकवायला सुरुवात केली. तीन तास त्या शाळेत कसे गेले कळलेच नाही. घरी येताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज आलेले होते. प्रथमच त्यांचा अशा वंचित मुलांशी संपर्क आला होता. आपल्याकडे जे आहे, आपण जे जाणतो ते इतरांपर्यंत पोहोचवणे किती सुखाचे! आता ते शनिवारची वाट पाहू लागले. त्यांच्यासाठी शनिवार आठवड्यातला सर्वांत महत्त्वाचा दिवस झाला. ह्या मुलांच्या आयुष्यात समरस झाल्याने त्यांचे जीवन अधिक समृद्ध कसे होऊ शकते याचा वेगळ्या पद्धतीने विचार होऊ लागला. त्यांच्या डोक्यातील कल्पना ते मॅथ्यू सरांना सांगितल्या आणि वर्गातील इतर मुलांकडे मदत मागण्याविषयी आणि गरीब मुलांच्या दुःखाविषयी बोलण्याची परवानगी त्यांनी मुख्याध्यापकांकडे मागितली. परिणामी, २६ जानेवारीला ह्या शिकणाऱ्या मुलांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कपडे आणि जमलेल्या पैशांतून काही भेटवस्तू आणि मिठाई दिली. त्या दिवशी इतर मोठी मुलेही शाळेत आली. त्यांनी गाणी आणि वेगवेगळे खेळ शिकवले. आनंद वाटल्याने मिळणारे समाधान त्यांनी अनुभवले. फक्त पैसा, पुस्तके, कपडे आणि इतर भेटवस्तू देणे एबढेच नव्हे; तर. आपला बेळ, शक्‍ती, प्रेम हे सारे त्यांच्यात वाटून त्यांना आनंदी झालेले पाहायचे आपल्याला असते. एकत्रित विचार करू या । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now