गो गो गोष्टी | GO GO GOSHTI

Book Image : गो गो गोष्टी  - GO GO GOSHTI

More Information About Authors :

गोविन्द गोडबोले - GOVIND GODBOLE

No Information available about गोविन्द गोडबोले - GOVIND GODBOLE

Add Infomation AboutGOVIND GODBOLE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“भोलूचं प्रौढशिक्षण” गुरगुर वनात सर्व प्राण्यांच्या तोंडी एकच विषय होता तो म्हणजे जंगलात निघालेली रात्रीची शाळा रात्रीच्या या शाळेबद्दल सर्वानाच कौतूक वाटत होतं. तिथं कोण शिकवणार ? काय शिकवणार ?' कसं शिकवणार . . . सारेच प्रश्‍न . . हे प्रश्‍न कमी पडले म्हणून की काय आणखी काही प्राण्यानी. आणखी काही प्रश्‍न निर्माण केले . . . सगळ्या पशुपक्षांच्या मुलांसाठी सकाळी आणि दुपारी शाळा असताना ही र॒त्रीची शाळा कशासाठी? . . . ह्या शाळेत विद्यार्थी कोण? . . . प्रश्‍न इतके झाले की, बबलू अस्वल, किटू लांडगा आणि छोटू ससा धीटपणानं शेवटी शाळा काढणाऱ्या. भोलू कोल्होबाकडं गेलेच. भोलूनं त्याचं स्वगत केलं. 'या. . . या. . . आज गरीबाच्या गुहेकडे कसे काय पाय वळले आपले ?' तुझ्या रात्रीच्या शाळेमुळे छोटू म्हणाला हं... हे... त्याला रात्रीची शाळा नाही म्हणायचं मग? उ हे आहे प्रौढ शिक्षण केंद्र' 'पण हे कशासाठी ?* चांगला प्रश्‍न विचारलात . . . बसा सांगतो . . . आपल्या या जंगलांत प्राणी किती आहेत ?.. . . 'किती तरी! 'पक्षी किती आहेत ?' खूप आहेत. शिकलेले किती आहेत?' फार थोडे !' मग त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे प्रौढ शिक्षण केंद्र काढलंय, न शिकलेल्यांसाठी पण त्यांना शिकवणारा मास्तर कोण?” ' मास्तर नाही म्हणायचं मास्तर नाही. म्हणायचे ? मग?”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now