चला नाटक करू | CHALA NATAK KARU

Book Image : चला नाटक करू  - CHALA NATAK KARU

More Information About Authors :

उमा आनंद - UMA ANAND

No Information available about उमा आनंद - UMA ANAND

Add Infomation AboutUMA ANAND

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
28 त जिव्हाळ्याचे असले पाहिजे. नाहीतर ते प्रयोग पाहायला येणार नाहीत. त्यांनंतर सगळया भूमिका करायला नटनटी आहेत की' नाही, हे पाहिलं पाहिजे.” “ म्हणजे पात्रं जमवली पाहिजेत.” अनूने पुस्ती जोडली. “कग संच एकत्र करून दिग्दर्शक निवडला पाहिजे. त्यानंतर नाट्यवाचन. ' बरीचशी नाटके वाचून मग निर्णय पक्षा करता येतो. आपल्याला आवडतील त्या प ग न्टांनी आलटून पालटून वाचून पहाव्यात. अर्थात अखेरचा निर्णय ढा “नायक किंवा नायिवेपेक्षा दिग्दर्शक महत्त्वाचा असतो १” दीपकला प्रश्‍न पडला. “ हे पाहा सगळेच एक संघ म्हणून काम करतात. सगळेच महत्वाचे. दिग्दर्शक संघाचा नायक असतो एवढंच. पात्रांनी स्टेजवर कशा हालचाली करायच्या ते तो ठरवतो. तसंच त्यांना आपापल्या भमिका उत्तम वठवायला मदत करतो.” भापणही दिग्दर्शकच व्हावे की काय, असा प्रश्‍न दीपकच्या डोक्यात घोळू लागला. “दिग्दर्शकाला नाटकातदेखील काम करता येतं १” त्यानं विचारलं. “ करायला लागलेच तर. पण त्यानें स्वतः भूमिका न करणेच इष्ट. कितीतरी गोष्टी. त्याला करायच्या असतात. इतरांना मागदर्शन करायचे, प्रकाश आणि ध्वनि- योजना ठाकठीक आहे की नाही हे पाहायचे, पोशाख नीट आहेत की नाही. सेट्स न्यवस्थित आहेत की नाही यावर लक्ष ठेवायचे, एक ना दोन, अशा हजार भानगडी _ असतात दीपकने सुस्कारा सोडला. संघनायक होण्याचा मान खराचं, पण. नाटकात काम न करणाऱ्या नायकाला कितपत गंमत येत असेल ! “ दिग्दर्शकानंतर कोण महत्त्वाचा १” त्याने सवाल केला. “रंगमंच व्यवस्थापक. म्हणजेच स्टेजमॅनेजर.” मामांचे अनपेक्षित उत्तर आले. “ तालमी. ठरविणे, नटमंडळी नदःला पाठ करताहेत की नाही यावर देखरेख ठेवणे, पोशाख आणि सेट्स तयार आहेत की नाही हे. पाहणे, थिएटर भाड्याने घेणे, तिकीट- कू 29 विक्रीची व्यवस्था करणे--असंख्य कामे स्टेजमॅनेजर करतो. संघाचा तो खराखुरा व्यवस्थापकच म्हणा ना. अतिशय निषः्स्तार्थी असतो हं हा प्राणी. स्वतः स्टेजवर कधीच येत नाही; त्यामुळे तो किती महत्त्वाचा इसम आहे याची फारशी कुणाला ॥ कल्पनाच येत नाही.” काही झालं तरी आपण स्टेजमॅनेजर तर॑ नक्कीच व्हायचं नाही, दीपकने मनाशीच ठरवले पण मग नाटक बसवतात कसं १” पारोने पुन्हा प्रश्‍न केला. “एकदा पात्रयोजना ठरली की तालमी छुरू होतात. जर नाटक मोठे असेल तर एका वळला काही प्रवेशच करता येतात. बहुतेक नाटकांचे तीन भाग किंवा असतात. एका अंकात बरेचसे प्रवेश असू शकतात. नट जर हुषार आणि मेहनती असतील; तर लत्रकर लवकर नकला पाठ होतात. नंतर दिग्दर्शकाने सांगितलेल्या मूव्हस, म्हणजेच कोणत्या वेळेला कुठून कुठे जायचं ते अंगवळणी पाडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अवघड प्रवेशांच्या पुन्हा पुन्हा तालमी केल्या जातात. नटाच्या अंगात खूप सहनशक्ती असावी लागते. स्वतःची. भूमिका वठवण्यासाठी आणि इतरांना त्यांच्या अभिनयात मदत करण्यासाठी नट होणं हवे वाटलं होतं तितक सोप नसल्याचं दीपकला उमजं लागलं होतं “सर्वांत महत्त्वाचा नट कोण!” त्याने विचारले उ _ “चांगल्या टीममध्ये, हा कमी महत्त्वाचा, हा जास्त महत्त्वाचा असा. भेद नसतोच मुळी. जरी काही भूमिका अधिक मोठ्या आणि अवघड असल्या, तरी रंगभमीवर यंणारी प्रत्येक व्यक्ती सारख्याच महत्त्वाची. ज्याच्या अंगात जास्त कलागुण असतील त्याला अधिक चांगल्या भूमिका मिळतात. पण साध्या निरोप्याचचं काम करणारा, किंवा बाजारातल्या गर्दीत उभा असलेला नटयुद्धा नाटकाचा बोजवारा उडवू शंकतो त्याच्या कामाकडेही लक्ष पुरवणे आवश्यक असतं. आणि बरं का दीपक “प्रेममामा हसून म्हणाले” दुय्यम भूमिका करणाऱ्यांकडे लक्ष पुरवणारे ते खरे हाडाचे नट.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now