पिठोरी अमावास्या | PITHORI AMAVASYA

Book Image : पिठोरी अमावास्या  - PITHORI AMAVASYA

More Information About Authors :

कुसुमावती देशपांडे - Kusumavati Deshpande

No Information available about कुसुमावती देशपांडे - Kusumavati Deshpande

Add Infomation AboutKusumavati Deshpande

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ओढीने आनंदला. पण लक्ष्मणदादाला केवढी चिंता पडली... ' बरोबर एक बंदा रुपया घेऊन तो घरून निघाला होता. तो पेटीतून काढतांना हात पुढेमागे झाला. वाटले की बंदा रुपया कशाला? आठ-बारा आणेच घेऊन जावे. पण व्याह्याघरी जायचे, तर असावा _ असेही वाटले. मग. अभिमानाने त्याने तो रुपया हाती _ घेतला. कमरेभोवती धोतर आवळले होते, त्याच्या टोकाला नीट बांधला. खोचून दिला. यामुळे सालभरासाठी राखून ठेवलेली शिल्लक बरीच घटली होती. पण अशा वेळी कोणा गड्याचा हात सैल सुटत नाही? दहेगावपासून पुलगाव दहा मैल तर दूर. झपाझप पावलांनी तो दोन अडीच तासात येऊन पोचला. पुलगाव नाका आला. एक लहानसे चहाचे दुकान दिसले. तिथे पाय घुटमळला. दहेगावच्या मानाने पुलगाव शहरवजाच वाटणार. ते लहानसेच दुकान केवढे मोठे वाटले! समोर अंगणात दोनचार बाकडी. अन्‌ दोन तिपाई टेबले. ती किती अगत्याने बोलावीत होती. तो तेथे बसलाच. एक सिंगल मागविला. पळभर राजेशाही सुखात बुडला. मग झाली पारीच्या पोरांची आठवण. जवळच 10 एक हलवाई होता. समोर एका लोखंडी थाळीत पेढे आणि अमृत्यांची चळद लावलेली होती. लक्ष्मणनें खाडदिशी तिथून चार आण्याची मिठाई घेतली. आज तीन वर्षांनी पिठोरीच्या सणासाठी बहिणीला न्यायला आला होता तो. मग मुलांना खाऊ नको कां? पुडा बांधून घेतांना तो केवढातरी समाधानी दिसत होता! हौशीने पैसा खर्च करणे खरोखर आनंदाचे असते तर... पण खंडू आणि नमी समोर खाऊ खात बसले अन्‌ इकठहे त्याच्या मनात वेगळीच विचारमालिका सुरू झाली. मुलांना आगगाडीनेच तर घेऊन जायचे होते. खंडू झाला होता पाच वर्षांचा; नमीला तिसरे संपून चौथे लागलेले. दोघां मिळून एक तर तिकीट काढायला पाहिजे! आणि पार्वती...आणि तो स्वतः...आणि खिशात तर केवळ दहा आणि चिल्लर भरलेली! व्याह्यांकडे जायचे यासाठी बंदा रुपया कनवटीस घेऊन तो निघाला. आणि तरीही वाटखर्चासाठी पैसे नाहीत अशी पाळी आली. लक्ष्मणदादाचे मन भोवंडून गेले. एरवी एवढा बोलघेवडा तो. पण बाबाजी, पार्वतीचा नवरा महादू _ आणि तो जेवायला बसले, तसे त्याला काही सुचेना. 11




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now