लहान गावाची महान गोष्ट | LAHAN GAVACHI MAHAN GOSHT

Book Image : लहान गावाची महान गोष्ट  - LAHAN GAVACHI MAHAN GOSHT

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शुभु पटवा - SHUBHU PATWA

No Information available about शुभु पटवा - SHUBHU PATWA

Add Infomation AboutSHUBHU PATWA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ब... च पाणी हेच जीवन. पाण्याविना सगळंच शून्य मग बदलत्या * पाण्याबरोबर त्याची महतीही कशी बदलली ? ह्याचा दोष कुणावर आहे ? हरखूच्या मनात प्रश्‍न उभा राहिला. पण त्याच्यापाशी त्याचं उत्तर मात्र नाही. शोधावी लागतील उत्तरं या आणि अशाच काही प्रश्नांची. सोडवायला हवीत ही कोडी. हे पाणी, ही भूमी, ही जंगलं म्हणजे आपल्य पूर्वजांकडून आपल्याकडे आलेला ठेवा आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं होतं आपलं ? ही नातीगोती कशामुळे बदलली ? हरखूला काही केल्या उलगडा होत नाही. माती, पाणी, जंगल, झाडं गवत, पशुपक्षी, सगळ्यांमध्ये पूर्वी काही तरी एकसूत्रता होती. परस्परांच्या गरजा सारे भागवू शकत अशी एकवाक्यता होती. एखाद्याला कसलीशी उणीव असली की बाकीचे सारे मिळून ती भरून काढीत. मग हे सारं विस्कळीत तरी कशामुळे झालं ? हरखूला पुन्हा वर्तमान पत्रातली ती बातमी आठवली. रेताड वाळवंटी प्रदेशात पाऊस फारच कमी होतो. शेतीही फारच थोडी होते. पण तेथे पशुधन मात्र जास्त प्रमाणात आहे. त्यातूनही गोधन जास्त. शेळ्यामेंढ्या जास्त. हे कसं काय ? उ हा ताळमेळ काही वेगळ्याच प्रकारचा म्हणायचा. शेती नाही, पाऊस नाही, पण पशुधन विपुल. काय चरून जिवंत राहातं पशुधन ? हा काही जादूचा खेळ किंवा मायावी प्रकार नव्हे. एक जगावेगळा ताळमेळ आहे. ह्याचा तोल ढळला की संकटंच संकटं. पशुधन आहे आणि त्यासाठी वेरणही आहे. कमी पाणी लागणारी ही हिरवळ, तिची सुकत जाणारी पाती थोड्याशाही पावसाने पुन्हा तरारणार, हिरवीगार होणार. नवीन अंकुर फुटणार सूर्याची धगधगती आग वाटणारं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now