सत्यालाप | SATYAPALAP

SATYAPALAP  by पुस्तक समूह - Pustak Samuhप्रियदर्शनी कर्वे - PRIYDARSHINI KARVEप्रियदर्शी कर्वे - PRIYADARSHI KARVE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रियदर्शनी कर्वे - PRIYDARSHINI KARVE

No Information available about प्रियदर्शनी कर्वे - PRIYDARSHINI KARVE

Add Infomation AboutPRIYDARSHINI KARVE

प्रियदर्शी कर्वे - PRIYADARSHI KARVE

No Information available about प्रियदर्शी कर्वे - PRIYADARSHI KARVE

Add Infomation AboutPRIYADARSHI KARVE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशा आशयाची एक पोस्ट कधी ना कधी पाहिली असेल. “द वायर” या इ-वार्तापत्राने या पोस्टमधील सत्यापलापाचा बुरखा फाडला आहे. या पोस्टनुसार मकॅलेने २ फेब्रुवारी १८३५ या तारखेला लंडनमध्ये ब्रिटिश संसदेत केलेल्या भाषणात असे म्हटले की मी भारतभर फिरलो आणि कोठेही मला एकही भिकारी दिसला नाही, किंवा कोणतीही गुन्हेगारी दिसली नाही. येथे इतकी सुबत्ता आहे, इतकी उच्च नीतीमत्ता आहे, इथली माणसे इतक्या उच्च दर्जाची आहेत, की या राष्ट्राचा कणा असलेला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा मोडून काढल्याखेरीज आपण या समाजाला कधीही हरवू शकणार नाही. तेव्हा इथल्या प्राचीन शिक्षण पध्दतीला आणि संस्कृतीला पर्यायी व्यवस्था उभी करावी, असा मी प्रस्ताव मांडतो. जे काही परदेशी आहे, इंग्लिश आहे, ते चांगले आणि आपल्यापेक्षा वरच्या दर्जाचे आहे, असे जेव्हा भारतीय समजतील, तेव्हा त्यांचा आत्मसन्मान नाहीसा होईल, ते त्यांची संस्कृती गमावून बसतील, आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे भारत आपले सच्चे मांडलिक राष्ट्र बनेल. मकॅले हा पक्का वसाहतवादी आणि वंशश्रेष्ठत्ववादी विचारांचा माणूस होता. युरोपपलीकडच्या जगातल्या साऱ्या “गरीब बिचाऱ्या मागास लोकांचा उद्धार करण्याचे उदात्त कार्य ईश्वराने आपल्यावर सोपवले आहे, या विचारातून सारेच ब्रिटिश व इतरही युरोपीय आपल्या वसाहतवादाचे समर्थन करत होते आणि मकॅले त्यांचा सच्चा प्रतिनिधी होता. मकॅलेने जी शिक्षणव्यवस्था भारतात प्रस्थापित केली, ती मुख्यतः ब्रिटिश साम्राज्याचा गाडा हाकण्यासाठी लागणारे कुशल व निष्ठावान कामगार पुरवणे यासाठीच होती, हे वादातीत आहे. पण या शिक्षणपध्दतीमुळे ब्राम्हणतेरांना शिक्षणाची कवाडे उघडी झाली आणि याच गुलामीचा पुरस्कार करणाऱ्या शिक्षणातूनही काही लोकांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा जागी झाली, ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. मर्केलेचे जे लिखाण प्रसिध्द आहे, त्यातून त्याचा वंशश्रेष्ठत्ववादी विचार ठळकपणे पुढे येतो. त्यामुळे असा माणूस लंडनमध्ये संसदीय भाषणात भारतीय समाजव्यवस्था आणि संस्कृती थोर आहे, वगैरे म्हणेल हे अविश्वसनीय आहे. मकॅलेच्या तोंडी घातलेल्या या मजकुरात इतिहासाविषयीचे अज्ञान आणि गैरसमज ठासून भरलेले आहेत. १८३५ सालापर्यंत ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात आपला अंमल प्रस्थापित शैक्षणिक संदर्भ अंक - ११२ धट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now