छोटी खेलणी | LITTLE TOYS

LITTLE TOYS  by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAउल्हास टुमने - ULHAS TUMNEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

उल्हास टुमने - ULHAS TUMNE

No Information available about उल्हास टुमने - ULHAS TUMNE

Add Infomation AboutULHAS TUMNE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चढाईखोर फुलपाखरू या फुलपाखराच्या दोन दोऱ्या तुम्ही आलटून पालटून ओढल्यांत की हे फुलपाखरू आश्चर्यकारक रीतीने वर वर चढते. तुम्ही दोऱ्यांवरील ताण काढलांत की फुलपाखरू घसरत खाली येते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीम खाण्याच्या एका लाकडी चमच्याला छोट्या खाचांच्या तीन जोड्या पाडा. या आईस्क्रीम चमच्याच्या कडेच्या दोन्ही खाचांना सुमारे 10 सें.मी. लांबीचे दोन दोरे बांधा आणि मधल्या खाचेत दोऱ्याचे एक लूप बसवा (आ.1). एक टेट्रापॅक घेऊन ते प्रथम सपाट करा आणि त्याच्या मधल्या चौकोनी भागात एक फुलपाखरू रेखाटा. फुलपाखराच्या बाह्यकृतीवरून कापून घ्या (आ.2). प्रत्येकाच्या आतल्या बाजूला चांदी असलेली आणि बाहेरी बाजू रंगीत असलेली अशी दीन एक सारखी फुलपाखरे तुम्हाला मिळतील. एक जाड स्ट्रॉ घेऊन दोन तुकडे करा. आकृती 3मध्ये दाखविल्याप्रमाणे एका फुलपाखराच्या चंदेरी भागावर स्ट्रॉचे दोन तुकडे फ़ेविबॉण्डच्या सहाय्याने चिकटून टाका. ह्या स्ट्रॉ समांतर नकोत. चिकटबल्यानंतर त्या थोड्या निमुळत्या आकाराच्या असाव्यात. वरील बाजूस थोड्या जवळ आणि खालील बाजूस थोड्या लांब. आता दुसरे फुलपाखरू पहिल्या फुलपाखरावर तंतोतंत बसवून चिकटवून टाका. स्ट्रॉँची जी टोके जवळ आहेत त्या बाजूने दोन दोरे ओवून घ्या. दोर्‍यांच्या टोकाला दोन छोट्या मुठी बसवा (आ.4). आईसक्रीम चमच्यावरील मधले लूप एका खिळ्याला अडकवा,. आता तुम्ही जेव्हा दोन दोरे आलटून पालटून ओढता तेव्हा फुलपाखरू वर वर चढते. (आ.5). दोऱयांवरील ताण ढिला केला की फुलपाखरू घसरून खाली येते. अतिशय आनंददायी असलेले हे खेळणे घर्षण आणि गुरूत्वाकर्षणाच्या काही शास्त्रीय नियमांवर आधारलेले आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now