ए० पी० देशपांडे गौरवग्रंथ | A. P. DESPANDE GAURAV GRANTH

A. P. DESPANDE GAURAV GRANTH by पुस्तक समूह - Pustak Samuhविवेक पाटकर - VIVEK PATKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विवेक पाटकर - VIVEK PATKAR

No Information available about विवेक पाटकर - VIVEK PATKAR

Add Infomation AboutVIVEK PATKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अ.पां. - विज्ञान व समाज सांधणारा दुवा (२) र? डॉ. अनिल काकोडकर अ.पां. देशपांडे व माझी ओळख माझे बीएआरसीतील मित्र श्री. प्रकाश साऊरकर, जे नंतर नोसिलमध्ये गेले, त्यांच्यामुळे झाली. अ.पां.पण तेव्हा नोसिलमध्ये होते. नोसिल सोडून मराठी विज्ञान परिषदेच्या कामात पूर्ण वेळ झोकून देण्याचे त्यांनी ठरवल्याचे जेव्हा मला कळले, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले, पण त्यापेक्षा त्यांच्याबद्दल जो प्रचंड आदर निर्माण झाला, तो आजसुद्धा तसाच कायम आहे. आज मराठी विज्ञान परिषदेच्या कामाचा आवाका आणि महाराष्ट्रभर व त्याही पलीकडे असलेला विस्तार यांमागे अपांचे प्रदीर्घ योगदान हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. मानवी विकास विज्ञानाच्या माध्यमातून लावल्या गेलेल्या विविध शोधांमुळे साध्य झाला आहे. मानवी जिज्ञासा व जिज्ञासापूर्ती करता करता निर्माण झालेले विज्ञान व तंत्रज्ञान यांमुळे आज मानवाची क्षमता खूप वाढलेली आहे, तसेच अनेक सुखसोयी उपलब्ध झालेल्या आहेत. हे सर्व साध्य करतांना वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्ट सखोलपणे तपासून पाहण्याची वृत्ती, प्रयोगशीलता आदी वैज्ञानिकांनी अंगीकारलेल्या सवयींचे महत्त्व हळूहळू समाजाला समजू लागले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात या गोष्टी अंगीकारल्या तर समाजाला व देशाला पुढे जाण्यात मोठी मदत होऊ शकते, हेपण लक्षात येऊ लागले. आपले पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन (सायंटिफिक टेम्पर) समाजात रुजविण्याच्या दृष्टीने खूप पुढाकार घेतला. विज्ञान व समाज या दोहोंचा संबंध केवळ विज्ञानाद्वारे विकास साध्य करण्यापुरता किंवा वैज्ञानिक संकल्पना समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे या साठीदेखील असावा ही भावना मूळ धरू लागली. हे सर्व साध्य करायचे तर सर्वसामान्यांना जी भाषा समजते, त्या भाषेतूनच संपर्क विज्ञानप्रसाराच्या “अनंत? धारा शप




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now