कोण जिंकला कोण हरला | KON JINKLA, KON HARLA

KON JINKLA, KON HARLA by कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

No Information available about कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

Add Infomation AboutKRISHNA CHAITANYA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काही डोंगराळ भागहि आहेत आणि तिथे छोट्याच पण श्रीमंत वस्त्या आहेत. पण तिथे जायचे झाल्यास मुख्य मागं सोडून छोट्या पाऊलवाटांनी वर जावे लागेल. बेलगाड्या तिथे नक्कीच जाऊ शकणार नाहीत. त्यापेक्षा आपल्या काफल्यांत थोडेसे बकरे असले तर त्यांच्या पाठीवर थोडासा माल भरून या उंचावरील गावा-बहरांत पोहोचता येईल. बकऱ्यांना असे भाग चढता येतात. आणि आनंदची ही कल्पना खरोखरीच फारच चांगली असल्याचे मागाहून सिद्ध झाले. वजनांत हलका पण अधिक किमतीचा माल आपल्याबरोबर नेणे व्यापार्‍यांना साहजिकचं जास्त पसंत होते. उत्कृष्ट दर्ज्याच्या, वजनांत. हलक्या व रंगबिरंगी छपाई केलेल्या कापडास सर्वप्रथम प्राधान्य दिले जाई. कारण हा माल व्यापाऱ्यांच्या सर्वांत आवडीचा होता. बल्खच्या पलीकडील तीन रस्त्यांपैकी एक रस्ता थेट चीनला जात असे हे तुम्हाला या अगोदर सांगितलेच आहे. या रस्त्यावर अजुनहि अनेक बौद्ध मंदिरांचे व मठांचे अवशेष सापडतात आणि संद्योधकांना तर या उद्‌ध्वस्त अवद्षोषांत भारतीय बनावटीच्या छापील कापडाचे तुकडेहि मिळाले आहेत. मूल्यवान्‌ रत्ने, चंदनाचे लाकूड आणि सुगंधी द्रव्ये यांनाहि या व्यापारी तांड्यांकडून कापडाखालोखाल पसंती दिली जाई. याचे कारण, या मालाला जागा कमी लागे, तो वजनांत हलका असे नि त्याला त्या मानाने किमत मात्र खूपच मिळे. रंगीत कापड कापून, त्याच्या घडया करून अनेक पाकळया असलेल्या फुलाच्या आकारांत ताणले व विणले जाई नि त्याला खरोखरीच्याच फुलांचा सुबासहि दिला जाई--नंतर ते सुकविण्यांत येई. ही विविध कापडें वा फुलें खरोखरीचीच भासत व त्यांचा सुगंध कित्येक आठवडे टिकून राहत असे. रोमच्या श्रीमंत स्त्रियांना-श्रीमतीजींना-या सुगंधित पुष्पसद्द्य कापडाचा फार शौक असे व त्याची कितीहि किमत द्यावी लागली तरी त्या फिकीर करीत नसत. याचे कारण कापडास फुलाचा आकार देणें त्यांना अवघड नसले तरी त्यांस ज्या सुगंधाची जोड द्यावयाची, ती सुगंधी द्रव्ये मात्र भारताखेरीज इतरत्र मिळत नसत. आपल्या केसांत अशी फुलें माळलेल्या कांबोजमधील एका स्त्रीची शिल्पक्कति आजहि मथुरेच्या संग्रहालयांत पाहा- वयास मिळते. 'कांबोज' हे आजच्या ताजिकीस्तान या भूभागाचे प्राचीन नांव असून हा भाग संध्या रशियाचा हिस्सा आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतावर राज्य केलेल्या कुशान सम्राटांच्या आधिपत्याखाली म्हणजे कुशान साम्राज्याच्या अधिकाराखाली हा भाग त्यावेळी मोडत होता. आनंद दूरवरच्या प्रदेशांना जाण्याची तयारी करीत आहे, ही बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, तेव्हा दोन मुलगे त्यास भेटायला आले. त्यांची वये वीस वर्षापेक्षा जास्त नसावीत. ते ज्या कुळांत जन्माला आले होते त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पिढीत त्याने विद्वान्‌ माणसेच जन्मास घातली होती. त्या मुलांना या काफिल्यांत सामील होऊन आनंदवरोबर तंक्षशिलेपर्यंत जाण्याची इच्छा होती व त्यासाठीच ते आनंदची संमति घ्यायला आले होते. सध्या ही तक्षशीला नगरी पाकिस्तानांतील पठाणांच्या भूमीत आहे. पण प्राचीन काळी ते एक विद्यापीठ होते. नि तेथे बौद्धमताचे, त्याचप्रमाणे इतरहि अभ्यासाचे पाठ दिले जात. श्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now