फकीरमोहन सेनापती | FAKIRMOHAN SENAPATI

Book Image : फकीरमोहन सेनापती  - FAKIRMOHAN SENAPATI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मायाधर मानसिन्हा - MAYADHAR MANSINHA

No Information available about मायाधर मानसिन्हा - MAYADHAR MANSINHA

Add Infomation AboutMAYADHAR MANSINHA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
26 / फकीरमोहन सेनापती वयाच्या तेहतिसाव्या वर्षी फकीरमोहन दोमपाडा येथे दिवाण म्हणून रुजू झाले. त्या वेळी यजवाड्याची दुर्दशा पाहण्यासारखी होती. स॒जवाडा ठिकठिकाणी पडला होता, भोवताली जंगली झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले होते. राजा बहुधा गावात नसेच. स्वत:ची गुजराण तो कर्जाऊ रकमा काढून करत असे. त्याच्या राणीवज्ञातील स्त्रियांनी कटकच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे थोड्याशा अँलिममीसाठी अर्ज केला होता. श्री. जॉन बीम्स त्या वेळी कटक जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट म्हणून काम पाहत होते. त्यांच्याकडे दोन्ही पक्षांकडून वारंवार येणाऱ्या उलटसुलट अर्जांना तेही कंटाळून गेले होते. जमीनमालक राजा आणि त्याच्या विरोधात बंड करून उठलेली प्रजा यांच्यामध्ये समेट घडवुन आणण्याच्या कामासाठी त्यांनी जाणूनबुजून फकीरमोहनांची निवड केली होती. फकीरमोहन आपल्या अक्कलहुशारीने हा समेट घडवून आणतील असा त्यांना पूर्ण विश्वास होता. असहकारिता - एक जुनी उडिया पद्धती फकीरमोहन अशी काही तडजोड घडवून आणण्याच्या प्रयत्नाला लागलेही, पण झाले भलतेच! दबलेल्या ठिणग्यांनी पुन्हा ज्वाळांचे रूप धारण करावे तसे बंड पुन्हा उफाळून आले. तिथला माजी दिवाण अन्‌ एक स्थानिक धनाढ्य जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी एक समांतर अशी प्रशासन व्यवस्था सुरू केली. एक फर्मान काढून त्यांनी प्रत्येक गावातील सर्व जातीच्या लोकांना राजवाड्याशी असलेलं त्यांचे सर्वप्रकारचे सामाजिक आणि व्यावसायिक संबंध तोडण्यास बजावले. राजवाड्यातील नोकराचाकरांना देखील हे फर्मान लागू होते. त्यानुसार रोजच्या धोब्याने राजवाड्यातील कपडे धुण्याचे नाकारले. आता कपडे कटकसारख्या दूरच्या गावातून धुवून आणावे लागू लागले. कोळी, गवळी, पाणके यांनीसुद्धा राजवाड्याशी असलेला आपला पिढ्यान्‌पिढ्याचा संपर्क बंद केला. दोन्ही बाजूंना सुखकारक असा तोंडगा काढण्याचे फकीरमोहनांच्या मनात होते पण दोन्हीही बाजूंच्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास नव्हता. राजा त्यांना मॅजिस्ट्रेटचा माणूस समजत होता तर दिवाण असल्याने जमीनधारक त्यांना राजाचा माणूस समजत होते. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याच्या वाटेला येऊ नये अशा बिकट अवस्थेत फकीरमोहन सापडले होते. 1876 च्या डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष तपासणीसाठी श्री. बीम्स दोमपाड्याला आले. फकीरमोहनांनी केलेली विनंती मान्य करून कुठलीही नवीन करवाढ न करता नवीन करारपत्र तयार करण्याला त्यांनी संमती दिली होती. राजा तर दोन्ही गोष्टींसाठी हटन बसला होता. सरकारी वर्तुळात राजाची कीर्ती आधीच एक चक्रम गृहस्थ म्हणून पसरलेली होती. त्यातून आपल्या भाडेकरू जमीनधारकांशी संघर्ष करण्यात त्याला हिकमती प्रकाझञक / 27 - यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे तर त्याच्यावर सर्व इस्टेट गमावण्याची पाळी आली होती. पण दोमपाड्यासारखे ओरिसातील एखादे पुरातन संस्थान असे स्सातळाला जावे अन्‌ तेही आपल्या दिवाणगिरीच्या काळात हे फकीरमोहनांच्या मनाला पटणारे नव्हते. काहीही करून हे संस्थान वाचवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्याकाळी खेड्यापाड्यातील वेगवेगळ्या भागांत जेव्हा इंग्लिश्ष डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट दौऱ्यावर जात, तेव्हा त्यांच्याबरोबर शंभरेक लोकांचा ताफा असे. कितीही कडक सामाजिक आणि आर्थिक निर्बंध असले तरी या सर्वांना खूष ठेवण्याची, त्यांची मर्जी राखण्याची जबाबदारी दिवाणसाहेबांवर असे. फकीरमोहन यांनीही ही तयारी करून ठेवली होती. पन्नास मैलांवर असलेल्या कटक शहरातून त्यांनी अगदी भाजीपाल्यापर्यंतच्या सर्व वस्तू मागवून ठेवल्या होत्या. पण भरीस भर म्हणून दुर्दैवाने त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. पावसाने आणि वाढत्या गारठ्याने एकमेकांशी संपर्क करणेही कठीण होऊ लागले. बहिष्कार घालणारे लोक किंवा इस्टेटीतील सेवकमंडळी यांच्यापैकी कुणीच बाहेर पडेनासे झाले. बिचारे फकीरमोहन एकटेच पावसापाण्यात, वादळवाऱ्यात आणि चिखलात फिरत होते, मॅजिस्ट्रेटच्या स्वागताची तयारी नीट होते आहे ना हे पाहत धडपडत होते. हे सर्व करताना फकीरमोहनांच्या राजकीय पातळीवरच्या हालचालीदेखील चालू होत्या. कुठल्याही प्रकारच्या मार्गाचा अवलंब करून बंडखोर जमीनधारकांपैकी काहीजणांना तरी राजाच्या बाजूने वळवून घेण्याच्या प्रयत्नात ते होते. सरतेशेवटी थोड्याफार जणांना तरी असे वळविण्यात आपल्याला यश येते आहे असे त्यांना वाटू लागले. पण त्यांचा तो श्रम लवकरच दूर झाला. एक दिवस गावप्रमुख आणि जमीनधारकांचे नेते यांची दुपारी अडीच वाजता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटश्ी त्यांच्या कॅम्पवर भेट ठरली. ज्यांना आपण वळवून घेतले आहे असे फकीरमोहन समजत होते त्या लोकांना ते सकाळभर भेटत होते. साहेबांनी प्रश्न विचारले तर त्यांना काय उत्तरे द्यायची हे ते समजावून सांगत होते. दुपारी चारचा सुमार होता. वादळ आता थोडे शमले होते; पण पाऊस अद्यापही चालूच होता. ओरिसाच्या त्या धनदाट जंगलांनी वेढलेल्या गावात बीम्स कसाबसा आपला वेळ घालवत होता. मुळातच अभ्यासू वृत्तीचा असल्याने तो आपला वेळ भाषाशास्त्र या आपल्या आवडत्या विषयावर चिंतन करण्यात घालवत होता. गावातील दोन्ही गटांच्या तक्रारी, प्रतितक्रारी, त्यावरचे वादविवाद यांसारख्या कंटाळवाण्या गोष्टी ऐकण्यात त्याला अजिबातच रस नव्हता. फकीरमोहन आणि इतर भूमीधारक त्याला भेटायला आले तेव्हा तो मोठ्या अनिच्छेनेच बाहेर आला. अंगाभोवती त्याने एक जाडसर ब्लँकेट लपेटले होते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now