हा विंचवाला उतारा | HA VINCHWALA UTARA

Book Image : हा विंचवाला उतारा  - HA VINCHWALA UTARA

More Information About Authors :

अनिल अवचट - ANIL AWACHAT

No Information available about अनिल अवचट - ANIL AWACHAT

Add Infomation AboutANIL AWACHAT

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सांगितले की ही ख्रीची आहे. ते थक्कच झाले. विचारल, कशावरून १ बावस्करांनी एका पेशीच्या आत (स्रीचे क्रोमोसोम्स एक्स-एक्स असल्यामुळे दिसणारे) बार बॉडिज नावाचे अतिसूक्ष्म ठिपके दाखवले. डॉ. शर्मांनी सर्वांना बोलावून घेतलं आणि सांगितले, “ बघा हा अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचा मुलगा हे ओळखू शकलाय.*' पुस्तकं पाठ करायची. सर्व मनापासून शिकायचं. कष्टाकडे पाहायचे नाही; यामुळे त्यांना विषय पक्के माहीत होते. या विंचू चावल्याच्या केसेसचे त्यांनी असेच अतिशय कष्ट व काळजीपूर्वक रेकॉर्ड ठेवले. आल्या आल्या ज्या १७ केसेस आल्या. त्यातल्या ५ मृत्यू पावल्या. त्यांची थोडक्यात काय लक्षणे होती अशी माहिती हाफकिनच्या डॉ. गायतोंडेंना कळवली होती. त्यांनी थोडी भर घालून 'लॅन्सेट' या वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील जगप्रसिद्ध जर्नलसाठी पेपर पाठवला. तो गायतोंडे- जाधव- बावस्कर अशा नावाने १९७८ साली प्रसिद्ध झाला. 'लॅन्सेट'मधे ओळ छापून येणं परमभाग्याचं. तिथे साहित्य येतं. त्यातलं ९८ टक्के साहित्य संशोधनाच्या कसाला न उतरल्याने परत केलं जातं. तिथं याचे नावासहित अख्खे साडेतीन इंच लांबीचं पत्र छापून आले. तिथं बावस्करांना संशोधनाची चव कळली. बास्तविक पाहता डॉ. गायतोंड्यांसारख्या सिनियर माणसाने बावस्करांचे नाव पहिले टाकायला काही हरकत नव्हती. कारण मूळ काम बावस्करांनी केलेले होते. तिथून पुढे मात्र त्यांनी संशोधन एकट्याच्या जिवावर आणि नावावर केल. नंतर ८२ साळी, ५१ पेशंटचे रेकॉर्ड समोर ठेवून त्यांनी दुसरा पेपर लिहिला. विंचवाच्या दंशामुळे काय काय आणि कसं कसं होत जातं याचा उलगडा करणारा तो लेख होता. तो स्वतंत्रपणे बावस्कर या नावाने 'लॅन्सेट मध्ये छापून आला. तो अख्खं दीड पान होता. त्यात यांनी काढलेल्या पल्मनरी इडिमा झालेल्या फुप्फुसाचा एक्स-रेही छापला होता. सुरुवातीला चौदा ओळीत सर्व लेखाचा सारांश द्यावा लागतो, तसा दिलेला होता. चार टेबल्स देऊन वय, ख्त्री- पुरुष, त्यांची लक्षणं -चिन्हं, ज्या केसेस गेल्या त्यांचे तपशील असं व्यवस्थित दिलेलं होतं. शेवटी निरीक्षणं मांडल्यावर त्यांची चर्चा केलेली होती. मधल्या काळात प्राझोसिनचा उपाय सापडल्यावर त्यांनी ८४ साली दाखल झालेल्या १२६ केसेसवर प्राझोसिन उपचारांचा सज्जड पुरावा दाखल केला. हा पेपर “लॅन्सेट'मधे मार्च ८६ मधे छापून आला. जवळपास पाऊण पानाचा हा पेपर होता. यावेळी त्यांच्या नावाखाली आणखी एक नाव होतं, ते त्यांच्या घरी नव्याने दाखल झालेल्या प्रमोदिनीताईंचे, पी. एच. बावस्कर असे. जागतिक पातळीवरच्या 'टॉक्सिकॉलॉजी'च्या क्षेत्रात या पाऊण पानाने प्रचंड खळबळ उडवून दिली. इय्रायलच्या डॉ. एम. गुश्यिन या तज्ज्ञाचे लगेच पत्र आले. आम्ही तुमच्याशी संपूर्ण सहमत आहोत. आता यापुढे अँटिव्हेनॉम द्यायच्या ऐवजी तुमची पद्धत (प्राझोसिन) वापरणार आहोत. बावस्करांनी मला त्यांना आलेल्या पत्रांच्या फाइल्स दाखवल्या. परदेशातनं निरनिराळी विद्यापीठं, संशोधन सस्था, संशोधक यानी तुमच्या सर्व पेपर्सच्या प्रती पाठविण्याची' विनंती करणारी शे-दोनशे तरी पत्र होती. त्या कार्डपाकिटांवरचे स्टँप काढले तरी तिकिटांचा मोठा जागतिक संग्रह होईल. मी विचारले, 'मग तुम्ही पाठवण्याचे काही चार्जेस घ्यायचे का ?'' “नो, नो, नो, नो, इटस्‌ ऑनर. त्याना तर पाठवायचोच. पण इथल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेस, संस्था, संबंधित डॉक्टर्स सगळ्यांना मी प्रती पाठवल्या. त्यापायी आतापर्यंत माझा लाखभर तरी खर्च झाला असेल. ती फाईल पाहताना भारतातून आलेले एकही पत्र दिसले नाही. त्याविषयी विचारले. बावस्कर म्हणाले, ' हीच दुःखाची गोष्ट आहे. भारतातून मला अद्याप असं एकही पत्र आलेलं नाही. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक पेपर मागवतात, ट्रीटमेंटचा फायदा करून घेतात. तसं इथं लोकांना दाटतच नाही. भारतातील संशोधन क्षेत्रातील सर्वोच्य अशी आय्‌. सी. एम्‌. आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ही सरकारपुरस्कृत मोठी संस्था. त्यांना मी माझे पेपर्स स्वतःच पाठवले. म्हणजे त्यांच्याकडे कुणी विचारणा केली, तर ते पेपर उपलब्ध करून देतील. दोन वर्षांनी मी ८.2 म्हणून त्यांना पत्र लिहिलं 'विंचू दंशावर काही साहित्य तुमच्याकडे आहे का ?' त्यावर उत्तर बघा काय आलय. त्यांनी दाखवलेल्या आय्‌. सी. एम्‌. आर. च्या उत्तरात लिहिलं होतं, की 'आमच्याकडे या विषयावरचं साहित्य माही. ' बावस्कर म्हणाले, म्हणजे मी पाठवलेले माझे पेपर्स फेकूनच दिले असणार. बावस्करांचे जवळजवळ ३६ पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आले. पण त्यांनी आय्‌. सी. एम्‌. आर. च्या ए. सी. आय. या जर्नलसाठी पाठवलेला पेपर इंग्लिश चांगले नाही' या कारणासाठी नाकारला गेला. बावस्कर म्हणाले, ''मी इंटरनॅशनल जर्नल्सकडे इतके लेख पाठवले, तर कुणी माझ्या इंग्लिशविषयी तक्रार केली नाही. ती माणसं फार वेगळी आहेत. ओरिजिनल रिसर्च असेल ना, तर दे जंप ऑन इट. इंग्लिश सुधारून घेतात. पण तसं करताना पोलाइटली 'तुमची भाषा थोडी अँडजस्ट केली तर चालेल ना,' असं विचारतात, प्रूफ अँप्रूव्हलसाठी पाठवतात. सि लॅन्सेटच्या संपादकांचं पत्र होतं, 'प्रतिकूल वातावशणात तुम्ही केलेल्या । आमच्याकडे खूप कौतुक होत आहे. डी. ए. वॉरेल नावाचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रोफेसर आहेत. त्यांनी
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now