कबीर | KABIR

KABIR  by पुस्तक समूह - Pustak Samuhप्रभाकर माचवे - PRABHAKAR MACHVE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रभाकर माचवे - Prabhakar Maachve

No Information available about प्रभाकर माचवे - Prabhakar Maachve

Add Infomation AboutPrabhakar Maachve

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
24 ' _ कबीर 'तू ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला ब्राह्मण मुलगा आहेस, तर तू अन्य मार्गाने का नाही आलास ? र 'तू कोणाचा ब्राह्मण? मी कोणाचा शूद्र ? मी कोणाचे रक्त ? तू कोणाचे दूध? कबीर म्हणतात, जो ब्रह्माचा विचार करतो त्यालाच मी ब्राह्मण मानतो. 'पाणी मलिन आहे, पृथ्वी मलिन आहे, जन्मवेळ मलिन आहे, मृत्यूची वेळ मलिन आहे, सारा विनाश मलिन आहे. 'दृष्टी मलिन, वाणी मलिन, कान मलिन, उठता बसता माणसाला मालिन्य चिकटलेले असते. ते अन्नातही पडत राहते. 'जाळ्यात अडकवणे सर्वांना माहीत असते पण त्यातून सुटका करून घेण्याचे मार्ग फार थोडे लोक जाणतात. कबिराच्या अनेक उक्त्या व पदे यांचा ' आदिग्रंथ या शीखांच्या पत्रित्र ग्रंथात साखीं च्या रूपात समावेश झाला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मॅकॉलिफच्या द सिख रिलिजन (दोन खंड) आणि साहित्य अकादेमी व युनेस्को यांनी प्रकाशित केलेल्या सिलेक्शन्स फ्रॉम द सेक्रेड बुक ऑफ सिखू्‌स या ग्रंथामध्येही असे अनेक उतारे आढळतात. कबीर हा काही जनसामान्यांच्या कोलाहलापासून दूर, आपल्या आध्यात्मिक गिरिकं दरात राहणारा, असा गूढवादी नव्हता. जिथे तो राहिला त्या त्याच्या बनारसमधील साध्या झोपडीपासून, तर जिथे त्याचे निधन झाले असे मानले जाते त्या असिघाटापर्यंत, त्याने धर्माच्या नावावर चालवलेल्या लुबाडणूक -ढोंग-खोटेपणा यांसारख्या गोष्टी पाहिल्या. हे सर्व पाहून एखाद्या मुक्याबहिऱ्यासारखे गप्प राहायचे नाही, असे त्याने ठरवले. तो स्पष्टपणे सत्य सांगत राहिला. याला धैर्याची आवश्यकता होती. विशेषकरून बुद्धिप्रामाण्यवाद दुर्मीळ असण्याच्या आणि प्रस्थापित धर्माला विरोध हे घोर पातक समजण्याच्या त्या काळात. पण कबिराने हे कार्य एवढ्या धीरोदात्तपणे ब परिणामकारकरीत्या केले की, हिंदूंना त्याला संत म्हणून मान देण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याच्या मार्गाला कबीर -पंथ म्हणून आदराचे स्थान मिळाले. या प्रकरणाचा शेवट आपण अशा एका कवितेने करू या, जिच्यात कबिराच्या तत्त्वज्ञानाचे सारच काव्यरूपाने आले आहे. रवीन्द्रनाथ टागोरांच्या अनुवादात जिंचा समावेश आहे ती ही कविता : र तीर्थस्थानी केवळ पाणी, व्यर्थ आहे न्हाऊन पाहिले मूर्ती सर्व निष्प्राण बंधू, नाही बोलत बोलून पाहिले कुराण पुराण साऱ्या गप्पा, दूर करून पडदा पाहिले गोष्टी अनुभवाच्या सांगे कबीर, फोल सर्व डोलारा हे पाहिले ' 1६1. 1. तीरथ मे तो सब पानी है... 1 - कबीर: हजारीप्रसाद द्विवेदी पृ. 262 ( मूळ पदासाठी पहा : परिशिष्ट, पद क्र. 8) काव्य शब्दाचा शोध घे, जाण तू शब्दाला, शब्द नि शब्दच तू आहेस रे भाई शब्द आकाश असे, शब्दचि पाताळ, शब्दातच पिंड नि ब्रह्मांड रही. उक्तीत शब्द असे, श्रवणीही शब्द, मूर्ती बनवती शब्दांत कल्पुनी शब्द ते वेद, शब्दचि नांद, शब्दचि शास्त्रे बिविधरूपे गायनी शब्दचि यंत्र, शब्द ते मंत्र, गुरूही शिष्याला शब्दचि ऐकवी शब्दचि सार, शब्द असार, शब्द आकार, शब्द निरांकारही शब्द पुरूष असे, शब्दचि स्त्री, शब्द स्थापती तिन्ही लोकही शब्द दृष्ट नि अदृष्ट ओंकार, शब्दचि सकल ब्रह्मांड होई कबीर म्हणे तू पारखून घेई शब्द, शब्दचि अपुला ईश्वर रे भाई 1 गूढेवादी कवितेचे मूल्यमापन करतानाही शुद्ध कवितेचे मापदंड वापरायला हवेत का, हा संस्कृत अलंकारशास्त्री आणि पाश्चिमात्य सौ दर्यमीमांसक यांच्यातील एक दीर्घकालीन चर्चेचा विषय आहे. अंशत: हा, उदात्त आणि सुंदर, यांमधला खूप जुनाच भेद आहे. संस्कृत भाषेत काव्यशास्त्रावर लिहिणाऱ्या सर्वसमावेशक वृत्तीच्या समीक्षकांनी यातून मार्ग काढताना दोहोंना 'जुळे' संबोधत, काव्यातून मिळणाऱ्या आनंदाला ब्रह्मानंद सहोदर' असे नाव दिले. दुसरीकडे हिंदीतील अनेक रूढिप्रिय व परंपरानिष्ठ समीक्षक कबिराला कवी मानत नाहीत. अगदी आजही असे लोक आहेत. ते कबिरला ओबडधोबड पद्यरचना करणाऱ्या भक्ताच्या व संतांच्या पंक्तीत बसवतात. असले समीक्षक तंत्राची सफाई आणि शैलीची परिपूर्णता यांसारख्या गोष्टींवर अवाजवी भर देतात. पण व्यक्तित्व हे जर कवीचे एक लक्षण मानले, तर कबीर नि:संशय एक महान कवी आहे. उ कबीर काही वेळा दुर्बोध वाटणाऱ्या प्रतिमा व प्रतीके वापरतो. अर्थात आधुनिक कवींच्या व्यक्तिनिष्ठ प्रतिमासूष्टीच्या मानाने ही दुर्बोंधता कमीच आहे. ब्लेक किंवा रिल्केच्या काव्याप्रमाणेच कबिराच्या कवितेत अशा अनेक जागा येतात की ज्या वरकरणी साध्या भासल्यातरी गहन अशा आध्यात्मिक अर्थपूर्णतेने त्या भारलेल्या असतात. खरे म्हणजे कबीर निव्वळ कवी नव्हताच. तो त्याहून बरेच काहीतरी होता. एकाचवेळी कबीर दोन मितींमध्ये जगत होता. ईश्वराची जाणीव व काब्य या त्याच्यासाठी भेद असलेल्या अशा दोन वेगवेगळ्या 1. 'शब्द को खोजि ले...' कबीर वचनावली : (सं. ) अयोचघ्यासिंह उपाध्याय हिरिऔध , पृ. 198 (मूळ पदासाठी पहा : परिशिष्ट, पद क्र. 1)
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now