राजा राम मोहन राय | RAJA RAMMOHAN ROY

RAJA RAMMOHAN ROY by पुस्तक समूह - Pustak Samuhसौम्येन्द्रनाथ टैगोर - SOUMENDRANATH TAGORE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सौम्येन्द्रनाथ टैगोर - SOUMENDRANATH TAGORE

No Information available about सौम्येन्द्रनाथ टैगोर - SOUMENDRANATH TAGORE

Add Infomation AboutSOUMENDRANATH TAGORE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
0 बंगाली गद्याचे जनक एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी असलेले बंगाली गद्यलेखन हे जवळपास संस्कृत- प्रचुर असे होते. बंगाली गद्य हे त्या वेळी अत्यंत ठिसूळ आणि दयनीय अवस्थेत होते. जास्तीत जास्त संस्कृत शब्द घुसवून लेखन करणाऱ्या संस्कृत पंडितांच्या दयेवरच बंगाली भाषेतील लिखाण तग धरून होते. 19व्या शतकाच्या प्रारंभी आपल्याला बंगाली गद्य- लेखन इतक संस्कृतमय झालेले दिसेल, की त्यात अपवादाने वापर झालेल्या काही बंगाली शब्दांमुळेच “*बंगाली' हे विशेषण त्याला लावता येईल. बंगाली भाषेतील लिखाणाला सर्वप्रथम श्रीरामपूरचे मिशनरी व फोर्ट विल्यम्‌ कॉलेजच्या विद्वानांनी प्रोत्साहन दिले. बंगाली जनतेमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मिज्ञानऱ्यांना हे लिखाण आवश्यक होते तर दुसरीकडे फोर्ट विल्यम्‌ कॉलेज हे सरकारने चालवलेले असल्यामुळे कॉलेजला प्रशासनिक दृष्टिकोनातून बंगाली गद्याची आव्यकता होती. बंगाली लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधता यावा म्हणून तरुण ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंगाली भाषेचे शिक्षण दिले जाऊ लागले. उ उ 1778 मध्ये श्री. हालहेड यांनी इंग्रजी भाषेत “बंगालीचे व्याकरण' हे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या मुखपृष्ठावरच असे स्पष्टपणे छापले आहे की, हे व्याकरण फिरंग्यांच्या उपयोगासाठी आहे. (फिरंगीनाम्‌ उपकारार्थ) यानंतर श्रीरामपूरचे प्रसिद्ध मिशनरी डॉ. कॅरींनी बंगाली व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न केला व 1801 मध्ये ते पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. हेदेखील इंग्रजीमध्ये असून नवनियुक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांना लवकरात लवकर एतद्देशीय जनतेबरोबर एतद्देशीय भाषेत संपर्क साधण्यासाठी उपयोग व्हावा हाच प्रमुख उद्देश होता. पण बंगाली लोकांसाठी बंगाली भाषेचे व्याकरण बंगालीमध्येच लिहिण्याचा पहिला प्रयत्न राममोहन यांनी केला. इंग्लंडला जाण्यापूर्वी यममोहन यांनी “गौडीय व्याकरण' हे बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहिले. 1933 मध्ये याचे प्रकाशन कलकत्ता स्कूल बुक सोसायटीतर्फे करण्यात आले. अकरा प्रकरणांच्या ह्या पुस्तकात अड्सष्ट विषयांवर विस्तृत लिखाण केलेले होते. यात सुरुवातीला व्याकरणाची गरज, तर शेवटी यमक योजनेबद्दल लिहिलेले होते. राजा राममीहन रॉय / 27 बंगाली गद्याचे पहिले पुस्तक 1801 मध्ये प्रकाशित झाले. विदेशी लोकांच्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक श्री. रामराम बसू यांनी लिहिले होते. 1802 मध्ये पं. मृत्युंजय विद्यालंकार यांनी “सिंहासन बत्तीसी' प्रकाशित केले. रामराम बसू यांच्या “प्रतापादित्यचरित्रा'पेक्षा हे पुस्तक निश्‍चितच सरस होते. विद्यालंकारांचे पुस्तक हे “क्रमिक' पुस्तक असल्यासारखे असून त्यात संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर वापर होता. अशा प्रकारे, ह्या कालखंडातील बंगाली लिखाण हे केवळ क्रमिक पुस्तकांच्या लिखाणापुरतेच मर्यादित होते. राममोहन यांच्या प्रवेशानंतर आपणाला बंगाली साहित्य लेखनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल पाहावयास मिळतो. रममोहन यांचे पहिले गधलेखन 1815 मध्ये “वेदांत ग्रंथ' या नावाने प्रसिद्ध झाले. हे लिखाण प्रचलित बंगाली लिखाणापेक्षा संपूर्णत: भिन्न होते. ते संपूर्णत: बंगालीमध्ये होते आणि ते नेहमीसारखे क्रमिक पुस्तक नव्हते. क्लिष्ट अनाकलनीय संस्कृत शब्दांचा वापर करून यात पुस्तकाची दुबोंधता वाढवलेली नव्हती. हे पुस्तक खऱ्या अर्थाने पूर्णपणे *बंगाली' होते. राममोहन यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बंगाली कसे वाचावे, याबद्दल वाचकांना सुचना दिल्या. बंगाली वाक्यरचना कशी असावी याबद्दलचे नियमही सांगितले. ही प्रस्तावना म्हणजे राममोहन यांच्या स्पष्ट आणि मूलगामी विचारांचे लक्षणीय उदाहरण आहे. राममोहन यांनीच रचलेल्या बंगाली गद्यलेखनाच्याच भक्कम पायांवर पुढे बंकिमचंद्र चटजीं व रवैंद्रनाथ टागोर यांनी उच्चकोटीच्या गद्यलेखनाचे मजले चढविले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now