भारतातील प्राथमिक शिक्षण | BHARTATEEL PRATHMIK SHIKSHAN

Book Image : भारतातील प्राथमिक शिक्षण  - BHARTATEEL PRATHMIK SHIKSHAN

More Information About Authors :

जे० पी० नाइक - J. P. NAIK

No Information available about जे० पी० नाइक - J. P. NAIK

Add Infomation AboutJ. P. NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१) उच्चवर्गीयांना विक्षण दिले की ते हळुहळू जनसामान्यांपर्यंत झिरपत जाईल या सिद्धांताच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष जनतेलाच शिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घ्यायची खरोखरच काही गरज आहे काय १ आणि (२) सक्तीच्या शिक्षणासाठी करावा लागणारा खर्य सहन करणे सरकारला शक्य आहे काय! गोखले यांना आपले सारे लक्ष पहिल्या प्रश्नावर केंद्रित करावे लागले. कारण परंपरावादी मताच्या लोकांचा हाच मुख्य आक्षिप होता. त्यामुळे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने पुढची पावले टाकण्यापूर्वी हा युक्तिवाद निरर्थक ठरविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी दुसऱ्या प्रश्नासंबंधीही काही उपयुक्त सूचना केल्या. साचे उद्दिष्ट ( सार्वत्रिक साक्षरता ) हा गोखले यांनी सुचविलेल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीचा एक गमतीदार विशेष होता. आर्थिक सबबींचा विचार करून गोखले यांनी आपल्या विघेयका'चे उद्दिष्ट मुद्दामच साधे ठेवले होते. आपण जर प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे आणखी वर नेली तर त्याचा काळावधी वाढवावा लागेल आणि साहजिकच प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरवर्षी कराव्या लागणाऱ्या खर्चातही वाढ होईल, हे त्यांना माहीत होते. भारतात जीवनाच्या इतर अनेक क्षेत्राप्रमाणे, * अधिक 'चांगले ? हे * चांगल्या *बे दतू होईल, याची त्यांना जाणीव होती. म्हणून मुद्दामच त्यांनी आपले उद्दिष्ट मर्यादित ठेवले. 'चार वर्षात मुलाला साक्षर केले पाहिजे एवढेच त्यांनी म्हटले, (६-१० वयोगटावर या बाबतीत सक्ती केली पाहिजे, असेही त्यांचे सांगणे होते.) त्यामुळे हा 'चार वर्षाचा अभ्यासक्रम सोपा राहील आणि मुलाला लिहिणे, वाचणे आणि अंकज्ञान एवढ्यापुरताच मुख्यतः तो मर्यादित असेल, असे गोखले यांचे प्रतिपादन होते. आपल्या मागणीच्या एृष्ट्य गोखले यांनी तीन प्रमुख कारणे दिली १: ( १) आपल्या जनते'ची निरक्षरता नाहीशी झाली तर ती देखील मोठी कामगिरी ठरेल, असे राष्ट्रीय उद्दिष्टाच्या संदर्भात गोखले यांचे म्हणणे होते. ते म्हणाले, * प्राथमिक शिक्षणामुळे केवळ लिहायला आणि वाचायलाच येणार असले तरी साक्षरतेचा सार्वत्रिक प्रसार होणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. कारण नेरक्षरतेपेक्षा साक्षरता केव्हाही निस्संशय चांगलीच असते. म्हणून सर्व लोकांची निरक्षरता नाहीशी करणे हे फलित सामान्य म्हणता येणार नाही? (२) जे दर्ज्यावर भर देत होते आणि “अधिक 'चांगले * चांगल्याचा शत टखू पहात होते त्यांना गोखले यांनी उत्तर दिले, * आपल्या देशातून निरक्षरतेचे लेख (इंग्रजी ), आदिया पब्लिशिंग हाऊस, मुंबई, खंड ३, एष्ठ ९२. २६ निम्लन करणे हा जनदिक्षणाचा मूलभूत हेतू आहे. शिक्षणाची गुणवत्ता हा प्रश्न निश्चितच महत्त्वाचा आहे; पण तो निरक्षरता नाहीशी झाल्यानंतरचा आहे.!' (३) केबळ छोकांची निरक्षरता नाहीशी करून फारसे काही साध्य होणार नाही, द्दे गोखले यांनाही मान्य होते. पण त्यांचे म्हणणे असे होते की निरक्षरता नाहीशी झाल्याशिवाय राष्ट्रीय विकासाची कोणतीही योजना यशसवी होणार नाही. ते म्हणाले : “ सार्वत्रिक शिक्षण द्यायला सुरवात झाली की आपले सर्व प्रश्न सुटून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल, असे मानण्याइतका कोणीच भाबडा नाही. शिक्षणप्रसारा- बरोबर अन्याय आणि अडचणी, स्वार्थ आणि संघर्ष नाहीसे होणार नाहीत. त्यासाठी स्त्री-पुरुषांना आपल्या सर्व शक्तिनिशी लढावे लागणारच आहे. निर- क्षरता नाहीशी होतार्‍च गरिबीही दूर होईल असे कोणीच मानत नाही. त्यासाठी सामाजिक वा सावजनिक कार्य करावेच लागेल. परंतु सार्वत्रिक शिक्षणाचा लाभ . झाल्यामुळे आपल्या देशबांधवांना जीवनाविषयी पांगली समज येईल, सार्वत्रिक शिक्षणामुळे लोकांची आर्थिक प्रगती, नैतिक विकास आणि आर्थिक सुधारणा करण्याचे सरकारी वा ब्रिनसरकारी प्रयत्न यशस्वी होण्याची अधिक शक्‍यता आहे. लोक साक्षर झाले की पिळवणूक करणारे सावकार आणि छळणूक करणारे छोटे अधिकारी यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याची लोकांमध्ये क्षमता येईल. ** आपण लोकांच्या निरक्षरता-निर्मूलनाचे कार्य हाती घेऊन लवकर पुरे केले तर आपली द्रुतगतीने शिक्षणातील अंतिम प्रगती आणि जीवनमानात सुधारणा होईल, यावर श्री. गौखले यांनी भर दिला. ते म्हणाले : उ या देशातील लोकांमध्ये शिक्षणाचा ग्रसार करण्याइतके दुसरे कोणतेही मोठे राष्ट्रीय कार्य नाही. या कार्यात सरकार आणि लोक यांनी परस्परांशी सहकार्य केले तर ते दोघांनाही उपकारक ठरेल. शिक्षणप्रसाराने आपण लोकांच्या जीवनात . प्रकाद्याचा एखादा किरण निर्माण करू शकू, त्यांच्या जीवनाला सुसंस्कृततेचा एखादा स्पर्श लामेल, त्यांच्या जीवनात आहो'ची एखादी झळाळी चमकून जाईल. या सर्व गोष्टींची लोकांना अत्यंत आवश्यकता आहे. हे कार्य संथ गतीने होईल, याची मला कल्पना आहे. आणि म्हणूनच ते ताबडतोब हाती घेण्याची गरज आहे. आपण जर या कार्याला लगेच प्रारंभ केला, लोक आणि सरकार यांनी त्याचा पाठपुरावा केल्य तर आपली जागा घ्यायला पुढची पिढी यायच्या आत आपण ही समस्या सोडवू शकू. हे असे घडले तर पुढची पिढी तिच्यावरील खास जबाब- २. तत्रेव, पृष्ठ १२७५. २. तत्रेव, पृष्ठ १३०-१ २७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now