गोष्टी गांधीजींच्या | GOSHTHI GANDHIJINCHA

GOSHTHI GANDHIJINCHA  by पुस्तक समूह - Pustak Samuhवासंती सोर - VASANTI SOR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वासंती सोर - VASANTI SOR

No Information available about वासंती सोर - VASANTI SOR

Add Infomation AboutVASANTI SOR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
परवानगी देणार नाहीत असं भय त्याला वाटत होतं. समुद्र प्रवास करून इंग्लंडला शिकायला जाणं ही कल्पनाच त्यांना पटणार नाही आणि ते परवानगी देणार नाहीत, या चितेनं मोहन निराश होत होता. वडिलांच्या मृत्युनंतर काकाच कुटुंबात मोठे होते. त्यांनी परवानगी दिली नाही तर जाणं शक्यच होणार नव्हतं. काकांची परवानगी घ्यायला मोहननेच काकांच्या गावाला जायचं असं ठरलं. त्या काळी गुजरातमध्ये आगगाडी, बसेस ही प्रवासाची साधनं नव्हती. बैलगाडी किंवा उंटाने प्रवास करावा लागायचा. मोहन तसा खूप भित्रा. उंटावर बसायची त्याला खूप भीती वाटायची. पण इंग्लंडला शिकायला जायचं या कल्पनेने तो हुरळून गेला होता. आनंदाच्या सागरात पोहत होता. काकांच्याकडे लवकर पोहचून परवानगी मिळवण्याची घाई त्याला झाली होती. आनंद, उत्सुकता, घाई यामुळे त्याचा भित्रेपणा पार कुठल्याकुठे पळून गेला. बैलगाडीने तर त्याने प्रवास केलाच, पण भित्र्या मोहनने उंटावरुनही प्रवास केला. हा सारा चारपाच दिवसांचा प्रवास त्याने एकट्याने केला. आश्चर्य म्हणजे काकांची परवानगी लगेचच मिळाली. आनंदावर तरंगतच तो घरी आला. आता फक्त आईच्या परवानगीचा प्रश्‍न होता मोहननं इंग्लंडला शिकायला जायचं याची चर्चा घरात सुरू झाल्यापासून आई खूप काळजीत पडली होती. आपल्या मैत्रिणींकडे, ओळखीच्या लोकांकडे इंग्लंडविषयी बारीक चौकशी करत होती. तिला जशा एकेक गोष्टी कळायला लागल्या तशी तिची चिंता आणखीनच वाढली. कोणी तिला सांगितलं तिथं आपल्या धर्माचं पालन करता येत नाही. तिथं गेलं की सर्व मांसमच्छी खातात. कोणी सांगितलं तिथे जाऊन सर्वच दारू पितात. कोणी म्हणालं तिथे गेलं की मुलं स्वत:च्या बायकोला विसरतात. इतर बायकांच्या नादी लागतात. हे सर्व ऐकल्यावर मोहनला परवानगी देण्याची तिची हिम्मतच होईना. आईची परवानगी मिळेपर्यंत जाणं शक्यच नव्हतं. हा पेच सुटणार कसा? मोहनच्या घरी नेहमी एक जैन साधू यायचे. त्यांच्यावर आई-वडिलांची खूप श्रध्दा होती . वडिलांनंतर घरगुती अडचणींवरही आई त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायची. त्यांच्या समोर आईने मोहनच्या शिकायला जाण्याचा प्रश्‍न आणि आपली चिता मांडली. त्यांनी हा पेच सोडवला. त्यांनी मोहनला तीन प्रतिज्ञा घ्यायला लावल्या. १) मांस खाणार नाही २) दारू पिणार नाही ३) परक्या स्त्रीशी संबंध ठेवणार नाही. मोहनने या तीन प्रतिज्ञा घेतल्यावर आईची चिंता दूर झाली. आपला मुलगा देवासमोर घेतलेल्या प्रतिज्ञांचं १८ । भित्रेपणा पळाला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now