धोका शाला | DHOKA SCHOOL
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
77
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पाउलो फ्रिएरे - PAULO FRIERE
No Information available about पाउलो फ्रिएरे - PAULO FRIERE
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
हेमलता होनवाड - Hemlata Honwad
No Information available about हेमलता होनवाड - Hemlata Honwad
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भे
सभ्य शाळा
मध्ययुगात युरोपमध्ये झालेल्या घडामोडींमुळे शिक्षण' हे शालेय
व्यवस्थापनाचं उत्पादन बनलं.
ज्याप्रमाणे आपल्या देशात समाजातील एक वर्ग - ब्राह्मण वर्ग, प्राचीन
काळी ज्ञानाचं भांडार मानला जात होता, त्याप्रमाणेच युरोपमधील
समाजातही एक शिकविणारा ' वर्ग उभा राहिला. या वर्गात जास्त
करून पाद्री होते. हे लोक ज्ञान' एका आभासात्मक वातावरणात
पसरवण्यात तरबेज झाले. हे वातावरण रोजचं जीवन आणि प्रौढांपासून
दूर गेलं. हीच 'शाळा' या व्यवस्थेची सुरुवात होती. जसजशी
वर्षांमागून वर्षे गेली तसतशा या शाळा उच्चभ्रूंसाठी राखीव होत
गेल्या. बाकीची माणसं शेतकरी, मजूर किंवा इतर कामकरी-
आपआपल्या जीवन-संघर्षातूनच शिकत राहिली.
सभ्य लोकांच्या या शाळांमध्ये जुन्या परंपरा आणि नैतिक मूल्यांवर
खूपच भर दिला जात असे. काही प्रमाणात बोलण्यातील कौशल्य
आणि तत्त्वज्ञानावरपण भर दिला जात असे. वैज्ञानिक दृष्टिकोन
(जाणीव), ज्यामुळे परिवर्तन होण्याची शक्यता होती, हा भाषणबाजी
आणि लॅटिन भाषेपेक्षा कमी महत्त्वाचा होता. शेवटी याच दोन गोष्टी
त्या परंपरेच्या प्रतीक होत्या, जिच्यामध्ये जग आणि जगातील समाज
याना अपरिवर्तनीय मानलं जात असे.
या सभ्य वर्गांसाठी लिहिणं-वाचणं हे आपली तथाकथित सभ्यता
कायम ठेवण्यासाठी आवश्यक असं हत्यार बनलं.
User Reviews
No Reviews | Add Yours...