आमचे घर | AAMCHE GHAR

Book Image : आमचे घर  - AAMCHE GHAR

More Information About Authors :

ताराबाई मोडक - TARABAI MODAK

No Information available about ताराबाई मोडक - TARABAI MODAK

Add Infomation AboutTARABAI MODAK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पाहिजे. आपले शिवणाचे तुकडेतोकडे तेवढे कामाचे व लहान छोट्याने फाडलेले कागद किंवा गोळा केलेले दगड बिनकामाचे, आपण लिहिलेले किंवा काढलेले चित्र कामाचे व बंड्याने काढलेल्या रेघोट्या निरर्थक समजून कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यासारख्या समजता कामा नये. उद्योग रोज उठून काय द्यायचा असे पुष्कळदा वाटते. वर उद्योगाची थोडी यादी दिलीच आहे. मुलांना लहान लहान गोष्टी पुरतात. मात्र त्यांचे काय करायचे त्याबद्दल त्यांना पूर्ण मुभा असली पाहिजे. प्रत्येक काम मोठ्यांच्या सूचनेने व त्यांच्या देखरेखीखाली करण्याचा त्यांना कंटाळा येतो. थोडे चुकलेमाकले याकडे आपण लक्ष न देता त्यांच्यावर जबाबदारी सोडली तर ती पुष्कळ शांतपणे कामे करीत बसतात. र उद्योगासंबंधी एक दोन गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे मूल दुरुद्योगात गुंतले आहे किंवा काय, हे पाहिले पाहिजे. दुसऱ्याचे नुकसान होईल, त्रास होईल अशा प्रकारच्या उद्योगापासून त्यांना परावृत्त केले पाहिजे. पण ते नुसते नाकाराने भागायचे नाही. त्याऐवजी काय करायचे ते दाखवून दिले म्हणजे मूल दुरुद्योग करण्याचे स्वाभाविकपणेच थांबते. कारण दुरुद्योग बहुधा उद्योग न मिळल्यामुळे उपस्थित झालेला असतो. म्हणजे मुलांच्या मनात काही फोडायचे, तोडायचे, दुसऱ्याचे नुकसान करायचे, दुसऱ्यास त्रास देण्याचे नसून सहजगत्या ते काहीतरी करते व ते दुरुद्योगात गणले जाते. मात्र कधीकधी मुले जाणूनबुजून विनाशक प्रवृत्ती दाखवितात व चांगल्या गोष्टीं बिघडवण्याच्या कामास लागतात. कोणी चित्र काढीत असेल ती पायाने पुसून टाकायची, वगैरे अनेक प्रकार दिसून येतात. या विनाशक प्रवृत्तीचे मूळ शोधून काढून त्यावर उपाययोजना होईपर्यंत ती विनाशक कामे चालवून घेता कामा नये; ती तर थांबवलीच पाहिजेत. उ दुसरी गोष्ट म्हणजे, कधीकधी मूल दिसायला उद्योगात दिसते, शांत असते, काही तरी करीत असते; परंतु खऱ्या उद्योगात नसते. नुसते वेळ काढण्यासाठी काही तरी करावयाचे म्हणून करीत असते. बालशाळेत असे पुष्कळदा घडते व शिक्षकांना या बाबतीत फार सावध असावे लागते. आमचे घर : २८ शिक्षक तसे सावध नसले तर मूल दिसायला कामात असून, कोणत्याही प्रकारची गडबड, देंगाधोपा वगैरे करीत नंसूनं प्रगती पाहावी तर काही नाही. याला अनुद्योग म्हणता येईल. त्याची अनेक कारणे असू शकतील. एक तर खरे आवडीचे काम हाती आलेलेच नसते तोपर्यंत कसातरी वेळ काढायलाच हवा असतो म्हणून मुले काही तरी करीत असतात. . दुसरे, पुढचे-काही सुचत -नाही, शिक्षक--किंवा दुसरे कोणी काही दाखवीत नाही, तेव्हा काय करायचे? येत आहे तेवढे तरी करीत बसा असे होते. पण ते करण्याने मुलांना गंमत किंवा आनंद वाटत नाही. ती कंटाळलेली व काम सोडण्यास एका पायावर तयार अशी असतात. कधीकधी प्रकृतीस बरे नसल्यामुळे अथवा 'मन खट्टू असल्यामुळे मुले अशी काही तरी करीत बसतात. मन फुलून उद्योग करण्याचे तर्‌ सुचत नाही, तेव्हा कसा तरी वेळ घालविण्याचे साधन म्हणून काही तरी हातात घेऊन बसतात. अशा वेळी त्यास विश्रांती देणे अथवा त्याच्या वाटेस न जाणे हेच बरे असते. कधीकधी अधिक कठीण कामे शिकण्याचा काही काही मुलांत आळस असतो. येत आहे त्यापेक्षा अधिकाधिक कठीण घ्यावे, नवेनवे शिकावे अशी सर्वसामान्यांची प्रवृत्ती असते. पण काही अशी भेटतात की, आठ वर्षाचे झाले, दहा वर्षाचे झाले, तरी आपले साधे मणीच ओवीत बसणे किंवा कागद घेऊन निहेतुकपणे तुकडेच करीत बसणे त्यांना आवहते. अशी मुले तत्कालिक किंवा नेहमीच्या मंदबुद्धी बालकांत जमा होतात. त्यांना जरा कठीण, जरा झरझर, जरा निराळे असे मुद्दाम करायला लावून पुढे नेले पाहिजे. दुरुद्योग व अनुद्योग यासंबंधी विवेचन करीत बसले तर पुष्कळ आहे. कारण दोन्ही प्रकार पुष्कळ अंशी मानसिक व्यंगांमध्ये अथवा रोगी अवस्थेत येतात. एकंदरीत उद्योगाचे महत्व लक्षात घेऊन मुलांना घरामध्ये निरनिराळे उद्योग देण्याची व्यवस्था केली तर॒मुलांचे जीवन तर आनंदमय होईलच, परंतु घरच्या वडील मंडळींच्या पाठचा किती त्रास कमी होईल. मुलांमुळे गांजून जाणे वगैरे सर्व बंद होईल. त्यांना आपल्या कामालाही हवी तितकी फुरसत मिळेल. आमचे घा : २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now