भारतातील प्राथमिक शिक्षण | BHARTATEEL PRATHMIK SHIKSHAN

Book Image : भारतातील प्राथमिक शिक्षण - BHARTATEEL PRATHMIK SHIKSHAN

More Information About Authors :

जे० पी० नाइक - J. P. NAIK

No Information available about जे० पी० नाइक - J. P. NAIK

Add Infomation AboutJ. P. NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्याख्यान दुसरे संरव्यात्मक वाढ आणि गुणवत्ता आज जनतेचे मन व्यग्र करणारी कोणती हौक्षणिक्‌ समस्या असेल, तर अत्यंत ' वशाने होत जाणारा शिक्षणाचा प्रसार आणि त्याबरोबर होत चाललेला गुणवत्तेचा ऱ्हास हीच होय. युणवत्तेविषयी सर्वांना चिन्ता वाटू लागली आहे, या घटनेचे मी स्वागत करतो; पण शिक्षणाचा-विरोषतः प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याबद्दल जे जे म्हटले जाते, त्या सर्वांशी मी सहमत नाही. संख्यात्मक विस्तार आणि गुणवत्ता यांविषयी चर्ची करताना सामान्यतः असे ग्रहीत घरून बोलण्यात येते की, या दोन्ही गोष्टी एकत्र नांदणाऱ्या नाहीत, त्या परस्पर व्यावर्तक आहेत. तुम्हांला संख्यात्मक वाढ तरी साधता येईल किंवा गुणवत्ता तरी टिकवता येईल; या विचाराबाबतही मी साशंक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात संख्या व युणवत्ता यांच्यात आंतरिक असा परस्पर- विरोध काहीच नाही. सर्व प्रगत राष्ट्रे दर्जेदार शिक्षण मोठ्या प्रमाणात देऊ शकली आहेत. आणि जर आवश्यक ते द्रव्यबल उपलब्ध करून दिले, तर भारतातही ते शक्‍य होईल. तेव्हा या विरोधाचे मूळ केवळ आर्थिक परिस्थितीत आहे. जेव्हा संख्यात्मक व गुणात्मक विकास असे दोन्ही साधण्याइतके द्रव्यल आपल्यापाशी नसते, तेव्हा दोहॉ- पैकी एकाची निवड करणे आपणास अगतिक ठरवून भाग पडते. आज तरी भारतात शिक्षणाच्या वाट्याला आलेला पैसा अतिशय मर्यादित आहे आणि आणखी काही वर्षे तरी ही परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे संख्या की गुणवत्ता असा जो संघर्षात्मक प्रश्न आहे, तो दोहोंचा समन्वय साधून कसा सोडवावयाचा ह्याच समस्येला आपल्याला प्रथम तोंड द्यावे लागणार आहे. दिक्षणाच्या सर्वच अवस्थांत हा प्रश्‍न २४ | उद्‌भवतो आणि तो वाटतो तितका सोपा नाही, हेही मान्य करायला हवे; पण म्हणून तो सोडविणे अशक्य आहे. असे मला वाटत नाही. प्राथमिक शिक्षणापुरती तरी या प्रश्नाची तात्पुरती उकल करता येईल. याची चर्चा या व्याख्यानात मी करणार आहे. प्रथम मला आपले लक्ष एका गोष्टीकडे आग्रहपूर्वक वेधावयाचे आहे आणि ती म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात तरी संख्या की गुणवत्ता हा मुद्दा उपस्थितच होत नाही. प्रत्येक मूल शाळेत गेलेच पाहिज आणि त्याला चांगले शिक्षण मिळालेच पाहिजे, या दोन्ही गोष्टी साधल्या गेल्याच पाहिजेत. तेव्हा येथे अंतिम उद्दिष्टाबद्दल निवडीला वावच नाही. पण हे उद्दिष्ट गाठण्याचे विविध मार्ग असू शकतील. एक मार्ग असा की, गुणवत्तेबद्दल प्रखर आग्रह धरावयाचा, आज अस्तित्वात असलेल्या शाळांनी काह्दी किमान नेमून दिलेला द््जा गाठण्याचा प्रयत्न करावयाचा आणि नवीन शाळा उघडताना वा नवीन विद्यार्थी भरती करताना हा अपेक्षित दजा कोणत्याही कारणाने खालावणार तर नाहीच, उलट वेळोवेळी शक्‍य तेवढा उंचावतच जाईल असा प्रयत्न करीत रहावयाचे, या मार्गाचा अवलंब करावयाचा म्हणजे दरडोई शिक्षणाच्या खर्चाचे प्रमाण उच्च ठेवायला हवे; आणि जसजसे अधिक द्रव्यबल उपलब्ध होईल, तसतसा संख्यात्मक विस्तार करीत रहावयाचा. दुसरा मार्ग असा की, दर्जाबाबत तडजोडीची वृत्ती स्वीकारावयाची; दरडोई खर्चाचे प्रमाण खाली आणावयाचे आणि प्रत्येक मुलाला शक्‍य तितक्या लवकर शाळेत दाखल करून घ्यावयाचे, या गोष्टीला पहिला अग्रक्रम द्यावयाचा. जेव्हा हे उ'देष्ट संपूर्णपणे नसले तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात साध्य होईल, तेव्हा गुणात्मक दर्जा वाढावण्याचे कार्य- क्रम हाती घ्यावयाचे आणि जसजसा पैसा हाती येईल, तसतसा शिक्षणाचा खच दर- डोई वाढवीत जावयाचा. तिसरा मार्ग असा की, या दोन्ही एकांतिक मार्गात तडजोड करून सुबणेमध्य साधावयाचा. उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीची संख्यात्मक विकास व गुणात्मक विकास या दोहोंमध्ये योग्य प्रमाणात वाटणी करून दोन्ही उद्दिष्टे एकसमयावच्छेदे गाठण्यासाठी प्रयत्न करावयाचा. या तिन्ही मार्गापैकी प्राथमिक शिक्षणासाठी आपण कोणत्या मार्गांचा अवलंब करणार आहोत, हा आपल्यापुढील प्रश्न आहे. माझे स्वतःचे असे मत आहे की, शक्‍य तितक्या तडाखेबंद गतीने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करून मग त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केन्द्रित करावयाचे, हा जो दुसरा पयाय आहे तो भारतीय परिस्थितीला जास्तीत जास्त उपयुक्त ठरण्याचा संभव आहे. पाश्चात्य देशांत प्राथमिक शिक्षणाचा विकास ज्या पद्धतीने झाला, त्या पद्धतीच्या अनुषंगाने माझ्या म्हणण्याचे स्पष्टीकरण चांगले होऊ शकेल. त्या देशांतही पहिला टप्पा संख्यात्मक विकासाचाच होता. शिक्षकांचे तुटपुंजे पगार, विद्यार्थी व शिक्षक यांचे मोठे प्रमाण, इमारती, साहित्य इत्यादींवर कमी खे, आणि शालेय भोजन, मोफत पाठ्यपुस्तके, लेखनसाहित्य इत्यादी पूरक सेवाकार्यांचा संपूण अभाव यांमुळे प्रतिछात्र खर्चाचे प्रमाण बरेच कमी होते. प्राथमिक शिक्षणाचे उद्दि्टही बुद्धिपुरस्सर कमी ठेवण्यात आले होते. केवळ साक्षरतेपुरतेंच ते मर्यादित भारतातील प्राथमिक [शिक्षण | २५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now