डॉ० सालिम अली | DR. SALIM ALI

Book Image : डॉ० सालिम अली  - DR. SALIM ALI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वीणा गवाणकर - VEENA GAWANKAR

No Information available about वीणा गवाणकर - VEENA GAWANKAR

Add Infomation AboutVEENA GAWANKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
% प्रदीर्घ लेख सोसायटीच्या जर्नलमधून प्रकाशित केला. पक्षिविज्ञान जगतानेही त्याची यथोचित दखल घेतली. या अनुभवाने सालिम अलींना सावध केलं. शहाणं केलं. कोणी काय लिहून ठेवलंय यावर विसंबून न राहता प्रत्यक्ष अवलोकनाने सारं तपासून घ्यायला हवं याची खूणगाठ त्यांनी बांधली. अशा पद्धतीने अभ्यास करून त्याचे निष्कर्ष जगापुढे मांडण्याचं काम आपलंच आहे असा निश्चय आपल्या मनाशी केला. संग्रहालयात बसून मृत पक्ष्यांचे नमुने पुढ्यात ठेवून, पक्षिशास्त्राचा अभ्यास खूप केला गेलाय. आता निसर्गात वावरणाऱ्या जिवंत पक्ष्यांचा, त्यांच्या जीवनक्रमांचा, जीवननाट्याचा अभ्यास करायचा. भारतीय पक्ष्यांचा मागोवा घ्यायचा. त्यांची सूचीकरण करायचं. भारतीय पक्षिशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध नि मजबूत पायावर करायची आणि जागतिक पक्षिविज्ञानाच्या फलकावर त्याला स्थान मिळवून द्यायचं या दृढ निश्चयाने ते पुढच्या तयारीला लागले. श्र उ ट्र 2 [8 स पक्षियात्रा १९२४-२५ सालापासूनच सालिम अलींनी बंदूक, दुर्बीण, कॅमेरा यांच्या बरोबरीने लेखणीही हाती धरली. तेव्हापासूनच त्यांची पक्षिनिरीक्षणे सोसायटीच्या जर्नलमधून होत होती. क वि १९२६ सालच्या एका अंकात त्यांनी 'मुघल एम्पर्स ऑफ इंडिया अँज नॅचरॅलिस्टस्‌” या शीर्षकाचा प्रदीर्घ लेख लिहिला. बाबरापासून औरंगजेबपर्यंतच्या बखरींतन आणि तत्कालीन अन्य साहित्यातून पशू, पक्षी, वनस्पतीविषयीचे आढळणारे त्या सम्राटांचे अनुभव, विचार यांचा त्यांनी शोध घेतला. क आ जर्नलच्या १ मार्च १९२७ च्या अंकात त्यांनी द मेटिंग ऑफ्‌ पॅराकिट्स' हे निरीक्षण प्रसिद्ध केले. ते किती बारकाव्याने निरीक्षणे करत आणि नोंदी घेत याचं प्रत्यंतर या लेखात येतं. पक्ष्यांच्या वर्तनशास्त्राच्या अभ्यासाने त्यांना झपाटलंच होतं. नि १९२८ सालात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एका निरीक्षणाने तर पक्षितज्जञ च वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली. त्या साली जर्नलमधून 'द क ऑफ्‌ इंडियन बर्डस्‌' ही लेखमाला चालू होती. त्यातील एका लेखात ब्रिटिश पक्षितज्ज्ञ ह्यू पक्षियात्रा / १५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now