जीवनानंद दास | JIVANAND DAS

JIVANAND DAS by चिदानंद दास गुप्ता - CHIDANAND DAS GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

चिदानन्द दास गुप्ता - Chidanand Das Gupta

No Information available about चिदानन्द दास गुप्ता - Chidanand Das Gupta

Add Infomation AboutChidanand Das Gupta

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवनानंद दास वनलता सेन हजारी वर्षांपासून या पृथ्वीच्या वाटेवर चाल्थोय सिंहल समुद्रापासून ते मालय * समुद्रधुनीपर्यंत य॒त्रीच्या अंधारात खूप भटकलो; बिंबिसार अशोकाच्या धूसर विश्वात होतो मी; आणखी दूरच्या विदर्भ नगरीच्या अंधारात; थकलेला जीव माझा; चहुकडे फेसाळ जीवनसिंधूंचे थैमान मला घटकाभर विसावा देणारी नाटोरची वनलता सेन. तिचा केशसंभार जसा अंधार कधीकाळच्या विदिशेच्या रात्रीचा चेहरा श्रावस्तीचे नक्षीकाम, दूरवर समुद्रापार वल्हे तुटून ज्या नाविकाने हरवली दिशा त्याला जसा गवती हिरवागार प्रदेश दिसावा दालचिनी-बेटावर तेशीचे दिसली ती अंधारात; पाखराच्या घरट्यासारखे डोळे उचलून म्हणाली इतके दिवस कुठे होतास?' तीच, नाटोरची वनलता सेन दिवस ढळला की दवबिंदूंचा नाद यावा तशी संध्याकाळ येते; पंखांवरील उन्हाचा वास निपटून टाकते घार पृथ्वीवरचे सर्व रंग मावळले की मग हस्तलिखिताचे आयोजन प्रत्येक कहाणीभोवती काजव्यांच्या रंगाची झिळमिळ; सगळी पाखरं घरी येतात-सर्व नद्याही-फिटतं जीवनातलं सारं देणं-घेणं; उरतो फक्ते अंधार, समोर घेऊन बसायला वनलता सेन. /* ('वनलता सेन - बनलता सेन शीर्षकाच्या संग्रहातून) अनुवाद 25 संत्रे एकदा या देहातून बाहेर पडल्यावर, पुन्हा परतणारच नाही का मी या पृथ्वीवर? वाटतं, पुन्हा परत याव एकाद्या हिवाळी हिमरात्री र एकाद्या थंड संत्र्यासारखं आपलं कोवळं मांस असावं ह कुठल्यातरी परिचित मृत्युमुखी व्यक्तीच्या बिछान्यापाशी ठेवाव. ८2० (कमलालेबू' - बनलता सेन या संग्रहातून) * मलाया, मलंशिया-बंगालीत मालद्रीप, या शब्दांपासून जीवनानंदांनी 'मालय” असे : विशेषरूप तयार केले आहे. हे रूप त्यांच्या या एकाच नव्हे तर अनेक कवितांमध्ये पुन्हापुन्हा आलेले आहे, ते मराठी अनुवादात जसेच्या तसे ठेवलें आहे - अनुवादिका




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now