उंदीर | UNDIR
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
236 KB
Total Pages :
7
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE
No Information available about जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शेवटी जॅकने प्रयत्न केला . त्याच्या युक्तीसाठी भरपूर पैसे लागत होते . आणि वडिलांकडून त्याने ३० पौंड घेतले
असले तरी ते पुरेसे नव्हते . पण त्याने काही पेसे माझ्याकडून घेतले आणि स्वत$ बनविलेले काही बिनतारी यंत्रे
विकली . आणि अखेरीस त्याच्याकडे पुरेसे पैसे जमले . त्याने नेहमीच्या लोखंडाच्या चु -यापेक्षा अतिशय बारीक असा
चुरा आणला . तो भाजला . आणि बिस्कीटांमध्ये मिसळला . ती बिस्कीटे गोदीत विखुरली . प्रथम उंदीर त्यांना हात
लावायला देखील तयार नव्हते . पण नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यापासून त्यांना काही इजा होत नाही तेव्हा त्यांनी
खायला सुरूवात केली . मधल्या काळात जॅकने प्रभावशाली ७ विदयुतचुंबक आणले आणि विविध ठिकाणी गोदीमध्ये
ठेवले . प्रत्येक एक व्यवस्थित कडा असलेल्या खोल खड्डयात ठेवले होते . आणि शहर रेल्वे आणि पूर्व लंडन रेल्वे
मधून विदयुतप्रवाह सोडता येईल अशा प्रकारे तारा टाकल्या होत्या .
योगायोगाने जॅक जमिनीखालील रेल्वेच्या प्रमुख इलेक्ट्रिकल अभियंत्याला ओळखत होता कारण दोघांनाही बिनतारी
या विषयात फार रूची होती . त्यामुळे त्याला विदयुतप्रवाह उसना घेणे सोपे गेले . उंदरांनी पुरेसा लोखंडाचा चुरा
खाल्ला असे लक्षात आल्याबरोबर त्याने चुंबकातून प्रवाह जाईल अशी व्यवस्था केली . सर्व लोखंड , स्टील , निकेल
च्या वस्तू वेगळया बांधून ठेवल्या गेल्या . आणि जहाजे स्टील आणि लोखंडाची असल्यामुळे तीही बांधून ठेवावी
लागली . आणि गोदीतल्या माणसांना त्या रात्री विशेष प्रकारचे खिळे नसलेले बूट घालावे लागले . अर्थात ...उपाध्यक्ष
सोडून कारण ते राजघराण्यातील होते आणि ल्यांच्या बूटाला सोन्याचे खिळे होते .
रात्री दीड वाजता शेवटची भुयारी रेल्वे थांबली . आणि रेल्वेला लागणारा सर्व विदयुतप्रवाह त्यांनी पहिल्या
विदयुतचुंबकात सोडला . काही गंजलेले खिळे आणि पृत्रयाचे डवे ओढले गेले . आणि उंदीर देखील , पण जास्त
सावकाशीने . उंदरामध्ये लोखंडाचा चुरा पूर्णपणे भरलेला होता . आणि चुंबक त्यांना सहज ओढून घेत
होते . लवकरच चुंबकाभोवतीचा खड्डा उंदरांनी भरून गेला . मग त्यांनी प्रवाह पुढच्या चुंबकाकडे नेला . नंतर ते
तिस-या चुंबकाकडे वळले . अर्थात फक्त जमिनीवर असलेले उंदीर खड्डयांमध्ये चुंबकाकडे आकर्षित होत होते . पण
ते परत परत विदयुतप्रवाह सोडत होते आणि बिळातून बाहेर पडून जास्तीत जास्त उंदीर चुंबकाच्या खड्डयात पडत
होते .
राजा उंदराच्या लक्षात आले की काहीतरी चुकते आहे आणि त्याला स्वतःला विळाच्या एका बाजूला खेचले
गेल्यासारखे वाटले . त्याने खब-यांना पाठविले पण ते परत आलिच नाहीत . शेवटी तो स्वतः गेला आणि एका
खड्डयातील चुंबकाकडे ओढला गेला . सकाळ झाल्यावर त्यांनी पाण्याचे नळ चालू केले आणि चुंबकाकडे आकर्षित
झलिले सर्व उंदीर पाण्यात बुडून मेले . या उंदरांचे वजन १५० टन भरले . कोणी ते मोजले नाहीत पण त्यांनी अंदाज
केला की एक लाखाच्या पाऊण पट असावेत .
यात काही दुर्धर प्रसंग सुद्धा ओढवले . रात्रपाळीचा टिमिन्स नावाचा राखणदार खिळ्यांशिवायचे बूट घालायचे
विसरला . चुंबकाने प्रथम त्याचे पाय ओढले . उंदरांसाठी खोदलेल्या एका खड्डयात तो खरे तर पडायचाच . . पण
तेवढयात बूट काढण्यात तो यशस्वी झाला . पण त्याच्या दोन्ही पायांच्या बोटांवर एकेक उंदीर लटकला आणि ते
User Reviews
No Reviews | Add Yours...