प्रेमचंद | PREMCHAND

PREMCHAND  by अमृत राय - Amrit Raiपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अमृत राय - Amrit Rai

No Information available about अमृत राय - Amrit Rai

Add Infomation AboutAmrit Rai

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पण प्रेमचंदांनी ती पुरी केली नाही. “काहीतरीच!” ते म्हणाले. “मी काय म्हणून असं करीन? शाळा संपल्यावर माझा मी मालक आहे!” हे सर्व त्यांना नकोसे झाले होते. यातून त्यांना बाहेर पडायचे होते. पण तसा निश्चय करणे सोपी गोष्ट नव्हती. त्यांची प्रकृती आता पुर्वीपेक्षाही खराब झाली होती. त्यातून नुकताच एक मुलगा देवींनी दगावल्यामुळे त्यांच्या मनावर औदासीन्य आले होते. काहीही पैसे शिलकीत नव्हते. भविष्यकाळ काळोखाचा नि भेडसावणारा होता. बायको आणि दोन मुले असलेला कुटुंबवत्सल माणूस नोकरीवाचून कसा राहू शकणार? असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. त्यांनी सबंध आठवडा खूप विचार करण्यात घालवला पण अखेरीस ती एकवीस वर्षांची जुनी नोकरी अन्‌ भावी पेन्शन यावर पाणी सोडण्याचे त्यांनी ठरवले. त्यांची पत्नी बेडर खंबीर मनाची शेतकरी स्त्री होती. तिने पतीला धीर दिला आणि त्यामुळेच मनाची डगमग थांबुन ते निर्णय घेऊ शकले. अशा रीतीने संसारपट उधळला गेला अन्‌ नवा डाव मांडणे भाग पडले. दर खेपेस पुढल्या जेवणाची भ्रांत पडू लागली. काही दिवस प्रेमचंदानी एक खादी केंद्र चालवले. पण मग त्यांच्या लक्षात आले की हा आपला प्रांत नाही. एका स्थानिक मासिकात संपादकीय काम मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण तेही मिळाले नाही. तेव्हा गोरखपूर सोडुन बनारसला जायचे त्यांनी ठरविले. तिथे गेल्यावर मर्यादा नावाच्या हिंदी मासिकाचे ते काही महिने संपादक होते. त्यानंतर काशी विद्यापीठाच्या शाळा विभागात त्यांनी शिक्षकाची नौकरी पत्करली. पण तीही फार दिवस टिकली नाही आणि ते कानपूरला तिथल्या मारवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून गेले. पण ते कामही एका टर्मपुरतेच ठरले. 1923 साल उजाडले तेव्हा प्रेमचंद आपल्या खेड्यातल्या घरी शांतपणे राहण्याचे योजित होते. चार मैलांवर शहरात एक छापखाना टाकावा आणि एक लहानशी प्रकाशन संस्थाही काढावी असा त्यांचा बेत होता. 1916 साली ते गणेश शंकर विद्यार्थीच्या सहवासात आले, तेव्हापासूनच या विचाराने त्यांच्या मनाची पकड घेतली होती. विद्यार्थी हा फार थोर माणूस-हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी तो हुतात्मा बनला. या एका गोष्टीखेरीज त्यांच्याबद्दल लोकांना काही माहिती नसावी ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वातंत्र्य चळवळीने वर फेकलेले ते एक रत्न होते. विलक्षण धैर्य नि सचोटी यांचा तो एक पुतळा होता. मनुष्यरूपी एक 'डायनंमो' 28 मुशी प्रेमचंद---1924
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now