डेनिस ची गोष्ट - भाग 3 | DENNIS CHI GOSHT - PART 3
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
45
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY
No Information available about विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ल“ पपया ायामधजयळ ग
न ल
ह
बाबा बसतील आणि हळूच आईला म्हणतील :
“ कशी आहेस तू?”
तीसुद्धा हळू आवाजात म्हणेल :
“ठीक आहे.”
आणि मी ताबडतोब गर्जेन :
'* टेबलापाशी बडबड बंद ! जेवताना वटवट करायची नाही ! कायम लक्षात ठेवा . कडक
नियम ! बाबा! ते हातातलं वर्तमानपत्र ताबडतोब खाली ठेवा ! तुम्ही म्हणजे मला एक
शिक्षा आहात ! ”
मग ते दोघे माझ्यासमोर उंदरांसारखे चुपचाप बसतील आणि जेव्हा आजी येईल, तेव्हा
मी कपाळाला आठ्या घालून हातवारे करीत मोठ्या आवाजात ओरडेन :
“बाबा ! आई! जरा आपल्या आजीवर नजर टाका ! काय तिचा अवतार ! कोटाची
बटणं सुटलेली, टोपी वाकडी ! गाल लाल झालेत , मानेवर घामाचं थारोळं ! वा, वा, कौतुक
करावं तेवढं थोडंच ! कबूल कर, परत हॉकी खेळत होतीस ना? काय ही घाणेरडी काठी?
कशाला घरात मिरवत आणलीस ? काय? ही हॉकी खेळायची स्टिक आहे ? ताबडतोब माझ्या
डोळ्यांसमोरून तिला बाजूला कर - बोळात फेकून दे ! ”
मग खोलीत येरझाऱ्या घालत मी त्या तिघांना सांगीन :
“ जेवणानंतर सर्वांनी अभ्यासाला बसायचं आणि मी सिनेमाला जाईन ! ”
अर्थातच त्यांची रडारड आणि आरडाओरड सुरू होईल: “आम्ही पण तुझ्याबरोबर
येणार ! आम्हालासुद्धा सिनेमा बघायचाय ! “
मी त्यांना म्हणेन:
“ मुळीच नाही ! काल वाढदिवसाच्या पार्टीला गेला होतात, रविवारी मी तुम्हाला
सर्कसला नेलं होतं ! वा! रोजच्या रोज मनोरंजनाची चटक लागलीय ! बसा घरात! हे घ्या
तीस कोपेक आईस्क्रीमसाठी ! बास्स ! ”
तेव्हा आजी कळवळून विनवणी करील :
'* निदान मला तरी घेऊन जा! प्रत्येक लहान मुलाला स्वतःबरोबर एक मोठं माणूस
फुकट नेता येतं! !”' स
पण मी म्हणेन:
“हा चित्रपट सत्तर वर्षांवरील लोकांना ' बघायला बंदी आहे . बैस घरात , भटकी
कुठली ! *
मग मी मुद्दाम टाचा आपटत त्यांच्यासमोरून जाईन, त्यांचे डोळे पाणावले आहेत इकडे
जणू लक्ष नसल्याचा बहाणा करीन , आरक्षासमोर खूप वेळ नखरे करत, गाणे गुणगुणत कपडे
घालीन . ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांचा आणखी छळ होईल आणि मग जिन्याचे दार उघडत मी
म्हणेन ”
११३
User Reviews
No Reviews | Add Yours...