सदाको आणि हज़ार बगले | SADAKO ANI HAZAR BAGULE

Book Image : सदाको आणि हज़ार बगले  - SADAKO ANI HAZAR BAGULE

More Information About Authors :

एलिनोर कोयर - ELEANOR COERR

No Information available about एलिनोर कोयर - ELEANOR COERR

Add Infomation AboutELEANOR COERR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्याने नर्सकडून दोरा आणि चिकटपट्टी मागवून घेतली आणि ते दहाही पक्षी छताला लटकावून टाकले . तो सोनेरी पक्षी मात्र सादाकोच्या टेबलावर राहू दिला . सायंकाळी आईसोबत मित्सुई आणि ईजी सादाकोला भेटायला आले . कागदाचे ते पक्षी बघून प्रत्येकजण चकीत होत होता . आईला सगळ्यात लहान हिरवा बगळा सर्वात जास्त आवडला ,. तिनं सांगितलं की लहान कागद दुमडणं तर फार अवघड असतं . सगळे लोक जेव्हा घरी गेले तेव्हा सादाकोच्या त्या खोलीत पुन्हा भयंकर एकाकीपणा जाणवू लागला . त्या उदास वातावरणातून बाहेर येण्यासाठी सादाको पुन्हा कागदाचे बगळे बनवू लागली . अकरा . . . . मी लवकरच ठीक होऊन जाईन! बारा... मी लवकरच ठीक होऊन जाईन!!! केनजी कागदाचे ते बगळे एक शुश्न पवित्र प्रतिक होते . तिच्या परिचयातील सर्वजण सादाकोच्या बगळ्यांसाठी कागद जमा करू लागले . चुजूकीनं आपल्या शाळेतून काही रंगीत कागद मागून आणले , वडील आपल्या केस कापायच्या द्ुुकानात कागदाचे तुकडे सांभाळून ठेवत . नर्ससुद्धा औषधांच्या पाकीटांचे कागद सादाकोसाठी सांभाळून ठेवत असे ,. आणि मासाहीरो आपल्या दिलेल्या वचनानुसार प्रत्येक पक्षी छताशी छानपैकी लोंबता ठेवून देत असे . कधी-कधी तो अनेक बगळे एकाच दोऱ्याशी लटकवून देई . काही मोठे पक्षी मात्र स्वतंत्र एकटे बांधले जात . पुढील काही महिने असे गेले की सादाको एकदम ठणठणीत झाली आहेस वाटले . तरीही डॉक्टर नुमाटा यांच्या मते तिचं हॉस्पिटलमध्ये राहणंच उचित होतं. आतापर्यंत सादाकोला हे माहीत झालं होतं की, तिला ल्यूकेमिया अर्थात रक्ताचा कॅन्सर झाला आहे . पण तिला हेही ठाऊक होतं की काही योगी या आजारातूनही बरे होतात . तिनं बरं होण्याची आशा सोडली नव्हती . आपण एक दिवस पूर्ण बरे होऊ याची तिला खात्री होती. जेव्हा तिला बरे वाटत असे तेव्हा ती वेगवेगळ्या कामात ग्रुंतलेली असे . ती शाळेचा अभ्यास करीत असे, मित्रमैत्रिणींना पत्र लिहित असे , आणि भेटायला आलेल्यांशी गप्पा गोष्टी, कोडी, गाणी, खेळ, अशाप्रकारे मजेत वेळ घालवी . सायंकाळच्या वेळी ती चौकोनी कागद दुमडून त्याचे पक्षी बनवत असे . आत्तापर्यंन्त तिनं तीनशे पक्ष्यांचे थवे बनवले होते ,. आता पक्षी बनवण्यात तिचा हात चांगलाच बसला होता . सराईतपणे तिची बोटं पटापट ट्ुुमड घालीत असत . आता सगळे पक्षी सुंदर तर बनतच, पण ते सजीवही वाटत होते. परंतु त्या भयंकर विषारी अँटम बॉम्बचा आजार सादाकोच्या शरिरात पसरत गेला . तिचं डोक कधी तिला असं वाटे, जणू तिच्या हाडात आग भडकली आहे आणि ती वितळत चालली आहे ,. अशा मरणप्राय यातनांच्या वेळी तिच्या डोळ्यासमारे अंधारी येई . या अत्यंत अशक्त अवस्थेत ती काहीही करू शकत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now