आमोदर शान्तिनिकेतन | AAMODAR SHANTINIKETAN

AAMODAR SHANTINIKETAN by आशा साठे - AASHA SATHEपुस्तक समूह - Pustak Samuhशिवानी - SHIWANI

More Information About Authors :

आशा साठे - AASHA SATHE

No Information available about आशा साठे - AASHA SATHE

Add Infomation AboutAASHA SATHE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शिवानी - SHIWANI

No Information available about शिवानी - SHIWANI

Add Infomation AboutSHIWANI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आणि इकडे अचानक आपल्या धोतराचा सोगा सांभाळत आलू दा उठलेच. पटकन्‌ गुरुदेवांना प्रणाम करून जायला लागले. “का, तू कुठे निघालास?” गुरुदेवांनी विचारले. त्या जन्मजात अभिनेत्यांचे फक्त डोळेच भरून आले असे नाही, दोन अश्रुबिंदू गालावरून ओघळत ठेऊन दाटून आलेल्या गळ्याने त्यांनी म्हटलं, “महाराज, पाहता आहातच आपण! आता काय मी इथे अधिक राहू शकतो? “परवल”ला घेऊन आता आश्रमातूनच जातो कसा!” आमची फिर्याद आमच्याच हास्याच्या स्फोटात वाहून गेली. आलूदांचे हात धरून आम्ही त्यांची क्षमा मागितली आणि आदरपूर्वक त्यांना आमच्यामध्ये बसायला लावलं. पटलदा आलूदांचेच लहान भाऊ होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि एक विझलेला कंदिल घेऊन मध्यरात्रीचे विचित्र हुंकार काढत ते आश्रमभर चक्कर मारत. आमचं शिष्टमंडळ आपली सारी गाऱ्हाणी आपल्याच कंठात गिळून परतलं. पण त्या दिवशी पहिल्यांदाच रात्रीच्या जेवणात शोधूनही आलू किंवा परवरचा तुकडाही सापडला नाही. विश्वविख्यात कवीवर्य रवींद्रनाथ हे संगीत, साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे महान शिल्पकार होते पण आश्रमवासियांसाठी मात्र ते होते केवळ गुरुदेव, प्रेमळ पितामह. कविता, नाटक, कादंबरी, चित्रकला, संगीत, नाटकांचं दिग्दर्शन या सगळ्यांपेक्षा त्यांना अधिक काळजी होती आपल्या प्रिय आश्रमाची. कुणी कल्पना तरी करू शकेल का की आज ज्याच्या यशाची पताका दिशा-दिशातून फडकली आहे, त्याने कधी आपल्या वेड्या विद्यार्थ्यासाठी आलू--परवरसारख्या सामान्य समस्येत जातीने लक्ष घातलं होतं. १६ / आमादेर शान्तिनिकेतन
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now