शालेपासून मुक्ती- वर्षापुरती | FREE FROM SCHOOL

FREE FROM SCHOOL by पुस्तक समूह - Pustak Samuhराहुल अल्वारेज़ - RAHUL ALVAREZ

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राहुल अल्वारेज़ - RAHUL ALVAREZ

No Information available about राहुल अल्वारेज़ - RAHUL ALVAREZ

Add Infomation AboutRAHUL ALVAREZ

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण ५ केरळची सहल ऑगस्ट महिना संपत आला होता आणि पावसाळाही. माझ्या कार्यक्रम पत्रिकेतील बर्‍याच जागांना मला भेट द्यायची होती. गोव्यातून बाहेर पडायला मी उत्सुक होतो. गोव्यात एकट्यान मी अगदी सहजतेने वावरू शकत होतो. (कारण इथे भाषा एकच असल्यामुळे मी कुणाशी ही बोलू शकत होतो) मार्ग विचारणं, खायचे पदार्थ विकत घेणे, आणि लहान रक्कमा हाताळणं हे सगळं आता मी करू शकत होतो. आता गोव्या बाहेर जाण्यासाठी मी उताविळ झालो होतो. मी बाहेर प्रवासाला निघालो होतो त्याचं आणखी एक कारण होतं. दहावीनंतर मी कॉलेजमध्ये का नाही गेलो आणि मी करतोय तरी काय या, माझ्या मित्रांच्या आणि शेजारांच्या प्रश्‍नांनी मी अगदी भंडावून गेलो होतो. आवडत्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे शिकण्यात मला खूप आनंद होतो, गंमत येते या गोष्टीवर काही कुणाचा विश्‍वास बसत नव्हता. इथून आपण बाहेर पडलो तर या सगळ्या प्रश्‍नांपासून आपली सुटका होईल असं मला वाटलं. त्याचं झालं असं की माझे बाबा सेंद्रिय शेतीवरील एका चर्चासत्राला उपस्थित राहण्यासाठी कोट्टायमला जायचे होते आणि त्याच वेळी ते अन्य काही ठिकाणी सेंद्रिय शेतीला भेट देणार होते. त्यांना वाटलं मी त्यांच्या बरोबर आलो तर बरच! भेटीमध्ये आम्ही केरळलाही जाणार होतो. १९९५ सालच्या ३० ऑगस्टला बाबांनी आणि मी गोवा सोडला. पणजीहून सकाळी सहाला बस सुटली आणि संध्याकाळी ४ वाजता बँगलोरला पोहचलो. वाटेत आम्हाला कारवार, अंकोला, कुंमठा, होनावर, कुंदापूर आणि उड्ुप्पी ही ठिकाणे लागली. बेंगलोर हे आमच्या पूर्वजांच घर. माझ्या बाबांचा जन्म मुंबईत झाला. तिथेच ते मोठे झाले. आणि लग्नानंतर ते गोव्यात राहत असले तरी मूळचे ते बेंगलोरचे. बंगलोरला आता आमच घर नाहीये. पण आमचे पुष्कळ नातेवाईक तिथे आहेत. आम्ही आमच्या चुलत आजोबांच्या घरी राहिलो. बसस्टॅण्डला हे जवळ होतं. बेंगलोरशहराच्या मध्यभागी ही दोन मजली इमारत आहे. आणि माझी चुलत ३० / शाळेपासून मुक्ती - वर्षापुरती आजी मोनिका आपल्या तिन मुलांसह तिथे राहते. रेगी, पेट्रीक, लँबर्ट ही तिच्या मुलांची नावे, आणि त्यांचे कुंटुंबिय एकत्र कुटुंबाप्रमाणे तिथे राहतात. जे. एस. अल्वारिस कोंकणी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक होते. काही वर्षांपूर्वी ते निवर्तले, ते माझे चुलत आजोबा. माझ्या काकाकाकूला आणि चुलत भावंडाना मी पहिल्यांदाच भेटणार होतो. त्यांच्या घरी आगत स्वागत झाल्यावर आम्ही चहा घेतला आणि खाल्लं आणि मग बाबांनी मला शहरात हिडवलं. कोट्टायमचं चर्चासत्र संपल्यानंतर गोव्याला परताना मी एकटाच असणार होतो. त्यामुळे शहरातल्या प्रत्येक खाणाखुणा मी पाहून घेतल्या, लक्षात ठेवल्या. परतीच्या प्रवासात माझ्या वाटा चुकू नयेत म्हणून मी अगदी काळजी घेत होतो. रेल्वे स्टेशनची जागा, बगलोरचे मध्यवर्ती हंप्पन कट्टा, जुना बस स्टॅण्ड, आणि मोनिका काकूंच्या घराचा रस्ता मी नीट पाहून घेतला. आल्यावर आम्ही रात्री मस्त जेवलो आणि लवकर झोपून गेलो. पुढच्या प्रवासासाठी आम्हाला पहाटे तीनला उठायच होतं. आमच्या गाडीनं सव्वाचार वाजता बेंगलोर सोडलं. प्रवास करत हिरवीगार शेत पाहतं. कन्चू,, कालिकत, त्रिचूर, एर्नाकुलम ही स्टेशनं घेत आम्ही कोट्टायमला दुपारी पावणेचारला पोहोचलो. हॉटेल पऐश्वर्या मध्ये बुकिंग होतं. आंघोळ करून मी ताजा तवाना झालो आणि मग शहरात भटकायला बाहेर पडलो. पण पावसाला सुरुवात झाली आणि आम्हाला लवकर परताव लागलं. हॉटेल ग्रीन पार्क इथं चर्चासत्र होतं. त्यासाठी सकाळीच आम्ही बाहेर पडलो. आमची नोंदणी आधीच झाली होती. आम्हाला कापडी पिशवी, पेन, नोटबुक चर्चासत्राच्या सुरुवातीला दिल गेलं.तिथं विकायला किती तरी वस्तू होत्या. अगदी सेंद्रिय चहा, लोणची इथं पासून ते पुस्तकं, पुस्तिका आणि मॅन्युअल्स्‌ इथपर्यंत. भोवताली फारसं बघता आलं नाही कारण संयोजक उद्घाटनासाठी सर्वांना बसून घ्या असं सांगत होते. दिवसभर भाषणं, तीही बहुतेक वेळा शासरज्ञांची होती. हे सत्र संध्याकाळ पर्यंत चाललं. फक्त मध्ये शाकाहारी भोजन झालं. सर्व भाषणांमध्ये माझं लक्ष वेधून घेतलं, ते डॉक्टर इस्माईल यांच्या गांडुळावरील भाषणाने. त्यांचा भाषणांचा गोषवारा द्यायचा मोह आत्ता टाळतो कारण त्यांच्या संर्पकात राहून त्यांच्या कामाविषयी घेतलेल्या माहितीविषयी स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात नंतर आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी असाच कार्यक्रम होता. मात्र त्या मध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असलेलं एक सत्र होतं. त्याचे अध्यक्ष माझे वडिल होते. पुष्कळ शेतकरी सेंद्रिय शेतीच्या त्यांच्या अनुभवाविषयी बोलले. मला ते फारच रंजक वाटले. दुपारच्या शाळेपासून मुक्ती - वर्षापुरती / ३१
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now