बहुरूपी गांधी | BAHUROOP GANDHI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
936 KB
Total Pages :
180
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनु बंदोपाध्याय - ANU BANDOPADHYAYA
No Information available about अनु बंदोपाध्याय - ANU BANDOPADHYAYA
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ध् बहुरूप गांधी
आहेत. याच गुणांवर पुरेसे पैसेही मिळवता येतात” यामुळे गांधीजींना हुरूप आला.
कायद्याचा तीन-चतुर्थांश भाग तर सत्य घटनांनी व्यापलेला असतो. खटल्यात या
भागाकडे लक्ष दिलं की, बाकीचं कायदा पाहून घेतो. त्या ब्रिटिश वकिलांनी असंही
सांगितलं की त्यांनी इतिहास आणि सामान्य ज्ञानाची पुस्तकं वाचावीत. गांधीजींनी हा
सल्ला मानला.
इंग्लंडमध्ये थोडा काळ गांधीजींनी स्मार्ट 'इंग्रजी सद्गृहस्थ' बनण्याचा प्रयत्न
केला. त्यांनी योग्य प्रकारे उच्चार करणं, भाषण करणं, नृत्य करणं, व्हायोलिन
वाजवणं आणि सूटबूट घालणं याचा सराव केला. लंडनमधल्या सर्वात फॅशनेबल
दुकानातून त्यांनी महागातला सूट खरेदी केला आणि सोन्याची घड्याळाची साखळीही
घेतली. ते उंच टोप्या आणि टायही वापरायचे. तरुण स्त्रियांबरोबर ते मैत्रीही करायचे.
हळूहळू त्यांचं जीवन आरामाकडे आणि चैनीकडे झुकू लागलं. काही महिन्यांनी
त्यांच्या लक्षात आलं की आपण फारच वेडेपणा करत होतो. या महागड्या सवयींमुळे
ते आपल्या मोठ्या भावावर पैशांचं ओझं टाकत होते. ते इंग्लंडला कायदा शिकायला
आले होते, ब्रिटिश माणसासारखी राहणी शिकायला नाही. ताबडतोब त्यांनी आपली
राहणी बदलली. त्यांनी एक कमी भाड्याची खोली घेतली. स्टोव्ह घेतला आणि
स्वतःच स्वतःचा नाश्ता, रात्रीचं जेवण तयार करायला सुरुवात केली. दुपारचं जेवण
ते स्वस्त शाकाहारी उपहारगृहात घ्यायला लागले आणि वाहनांचा खर्चही त्यांनी बंद
केला. गांधींजी रोज आठ ते दहा मैल चालत असत.
इंग्लंडमध्ये ३२ महिने राहिल्यावर, योग्यवेळी ते बॅरिस्टर झाले. दोन दिवसांनी ते
भारतात बोटीनं परत जायला निघाले.
भारतात पोचल्यावर त्यांनी मुंबईत भाड्याचं घर घेतलं आणि स्वयंपाकी ठेवला.
आता ते हायकोर्टात नियमितपणे जात आणि खटले कसे चालतात त्याचं निरीक्षण
करत. कोर्टाच्या वाचनालयात ते बराच वेळ बसत. भारतीय कायद्याची पुस्तकं त्यांनी
वाचली.
User Reviews
No Reviews | Add Yours...