जोनाथन लिविन्गस्टन सीगल | JONNATHAN LIVINGSTON SEAGULL

Book Image : जोनाथन लिविन्गस्टन सीगल  - JONNATHAN LIVINGSTON SEAGULL

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रिचर्ड बी० - RICHAR B.

No Information available about रिचर्ड बी० - RICHAR B.

Add Infomation AboutRICHAR B.

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“प्रत्यक्षात स्वर्ग नावाची कोणतीही जागा नाहीये जोनाथन . स्वर्ग म्हणजे कोणतीही जागा नाही आणि कोणतीही वेळ नाही . स्वर्गाचा अर्थ आहे परिपूर्ण होणं . चांग बोलता बोलता क्षणभर थांबला . . तू खूप जलद उडतोस ना ?” “मला जलद उडायला खूप आवडतं जोनाथन म्हणाला . “ज्या क्षणी तू परिपूर्ण गतीने उडशील व्या क्षणी स्वर्गात असशील . आणि ही गती ताशी हजार . . करोड मेल नाही किंवा प्रकाशाच्या गतीइतकी पण नाही . कारण प्रत्येक संख्येला एक मर्यादा आहे . . आणि परिपूर्णतेला कोणतीच सीमा नाही . परिपूर्ण गती म्हणजे बस्‌ . . त्या गतीने उडणं . कोणत्याही पूर्वयूचनेशिवाय चांग क्षणात तिथून लुप्त झाला आणि पाण्याजवळ पन्नास फूटांवर जाऊन उभा राहिला . क्षणभरातच तो तिथूनही दिसेनासा झाला आणि जोनाथनच्या खांदयापाशी दिसू लागला . “यात फार मजा येते . तो म्हणाला . जोनाथन स्तब्ध झाला . स्वर्गाबद्दल विचारायचे विसरून गेला . “तुम्ही हे कसे करता ? असे करताना नक्की काय वाटते ? यामुळे तुम्ही किती दूरपर्यंत जाऊ शकता ?” “तुम्ही यामुळे हवे तेव्हा हवे तिथे जाऊ शकता .वृद्ध पक्ष्याने सांगितले . “मी सर्व ठिकाणी फिरून आलो आहे . सर्वा त आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की जे प्रवासाच्या मोहाने पूर्णत्वाला नाकारतात ते कुठेच जाऊ शकत नाहीत . आणि जे परिपूर्णतेसाठी झगडतात ते सर्व ठिकाणी जाऊन येतात . “तुम्ही मला असे उडणे शिकवाल का ?” जोनाथनने विचारले . त्याला आता या अपरिचित रस्त्यावर चालणे भीतीदायक वाटत होते . “वाटल्यास तू आत्ता लगेच शिकणे सुरू करू शकतोस . चांग म्हणाला . चांग धीम्या गतीने बोलत होता व आपल्या शिष्याकडे अभिमानाने पाहात होता . “जर तुला विचारांच्या गतीने उडायचे असेल तर हे मनात आधी ठसव की तू तिथे पोहोचला आहेस . चांगच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, जोनाथन , तू स्वतश्ला तुझे बेचाळीस इंच पंख असलेले शरीर समजू नकोस . तुझे अस्तित्व स्थलकालाच्या बंधनातून मुकत आहे .




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now