मुलांचे सृजनात्मक लिखाण | MULANCHE SRUJNATMAK LIKHAN

MULANCHE SRUJNATMAK LIKHAN by पुस्तक समूह - Pustak Samuhमंजिरी निमकर - MANJIRI NIMBKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मंजिरी निमकर - MANJIRI NIMBKAR

No Information available about मंजिरी निमकर - MANJIRI NIMBKAR

Add Infomation AboutMANJIRI NIMBKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महेशने चारोळ्या केल्या होत्या - कल्यना म्हणजे याव्यकरचं गवत नाही केव्हाही डोक्यात यावला विचारांची खात वर्षे जावी लागतात कल्यनेची एक कारवी फूलायला प्रत्येकाने वेगळे लिहा, आपापले लिहा, असे आशाताई कायम मुलांच्या मनावर ठसवत, वाचनानंतर एकेका विद्यार्थ्याजवळ बसून त्याच्या कवितेची चर्चा करत, पुनर्लेखन करायला लावत आणि झालेल्या कविता स्केच पेनने कोऱ्या कागदावर लिहून फलकावर लावत. वर्गात वर्षभर काही ना काही लिखाण चालूच असे. वाचन आणि लेखन भाषेच्या सराईत वापरासाठी भरपूर, चौफेर आणि सकस वाचन फार महत्त्वाचे असते. पण कधी कधी मुले एखाद्या लेखकाने अथवा त्याच्या शैलीने इतकी भारावून जातात की, स्वतःच्याही नकळत त्या लेखकाची, त्याच्या शैलीची नक्कल करू लागतात. कधी कधी तर त्याच्या लेखनातील भावलेले परिच्छेदच्या परिच्छेद उचलतात. हा एक मर्यादित टप्पा असेल तर त्याला हरकत नाही. परंतु मूल त्यातून बाहेर पडते आहे ना यासाठी त्याच्या लिखाणावर नीट नजर ठेवली पाहिजे. सृजनशील लेखनाचे मोजमाप सृजनशील लेखनाचे मोजमाप करायचे का व केले तर ते कसे, हे दोन प्रश्‍न आपल्यासमोर आहेत. मला वाटते मोजमाप झाले पाहिजे. मग प्रश्‍न राहतो, कसे? एक गोष्ट पहिल्यांदाच स्पष्ट करायची आहे. ती म्हणजे कुठल्याच सृजनशील लेखनाचे मोजमाप गुण किंवा श्रेणींनी करू नये. मोजमाप करताना सर्वप्रथम मुलाच्या अनुभवाकडे पाह्यवे. या ठिकाणी शिक्षकांची पार्श्वभुमी, आवडनिवड यांसारख्या वैयक्तिक गोष्टींचा प्रभाव ३० / मुलांचे सुजनात्मक लिखाण पडतो. पण शक्‍य तितकी वस्तुनिष्ठता येण्यासाठी मुलाचे वय व पार्श्वभूमी लक्षात घेऊन अनुभवातील अस्सलपणा जोखावा. खेड्यात राहणारा कमलेश रानातले म्हव काढायला जातो, हा इतका वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आहे की एखाद्या शहरी शिक्षकाला तो न भावण्याची शक्‍यता आहे. परंतु अनुभव आपल्या ओळखीचा नसला तरी त्याचा जिवंतपणा जोखण्याइतपत जाण भाषाशिक्षकाला हवी. यानंतर निबंधाच्या मांडणीकडे पाहायला हवे. बहुतेक वेळा मुले साधी सरळ सुरुवात करतात, जसे की 'उन्हाळ्याच्या सुट्या होत्या....' पण कधी कधी ती फ्लॅशबॅकचा उपयोग करतात व वर्तमानातील. एखाद्या प्रसंगातून सुरुवात करतात. “आमचा भैय्या' (नवनीत २००८) या लेखात या पद्धतीचा सुजितने उपयोग केला आहे - मी, आरडे आणि भैय्या संध्याकाळच्या वेळी असेच निवांवपणे बघलो होतो. गप्पा रग्रात आलेल्या आणि का कणाच ाऊक आईई अचानक स्तन्ध झाली. मी पाहिले तर ती थॅय्याकडे एकटक पहात होती. तिचे डोळे पाणावल्याचेही बला जाणवले. आई अचानक धावविक्श का झाली सयजेना. यी तिला विचारू लागलो. मात्र काहीच न बोलता ती माझ्याकडे व भ्रैय्याकडे एह्मयची. श्रेक्ट यी तिच्या गव्यी हात घालून विला बोलते करण्याचा प्रवत्न करू लागलो. तेव्हा तिने तो! प्रश सागितिला. मूल शाळेत येते तेव्हा आपल्या घर आणि परिसरातून भाषेची आणि अनुभवांची घसघशीत शिदोरी घेऊन आलेले असते. ते सर्व टयकाऊ आहे असे आपण म्हणू शकत नाही. तेव्हा मुलांची भाषा आहे तशीच स्वीकारली पाहिजे. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांची भाषा प्रमाण-भाषेपेक्षा थोडी वेगळी असेल. परप्रांतातून येणाऱ्या मुलांची भाषा प्रादेशिक भाषेत त्यांच्या मातृभाषेची सरमिसळ असलेली असेल. तेव्हा प्राथमिक शाळेत प्रमाण- भाषेचा आग्रह धरणे मला चुकीचे वाटते. मुलाची भाषा स्वीकारून त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडसर प्रथम दूर करून नंतर हळू हळू त्याला प्रमाण-भाषेकडे वळवणे यीग्य ठरेल. आमच्या शाळेत मुले ग्रामीण भागातून मुलांचे सृजनात्मक लिखाण / ३६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now