अर्थाच्या शोधात | MAN'S SEARCH FOR MEANING
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
31 MB
Total Pages :
73
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विक्टर फ्रेन्कल - VICTOR FRANKYL
No Information available about विक्टर फ्रेन्कल - VICTOR FRANKYL
विजया बापट - VIJAYA BAPAT
No Information available about विजया बापट - VIJAYA BAPAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आहे. अत्ता!!”
घाईघाईत सारे जण अंगावरचे कपडे ओरबाडून काढू लागले. जसजसा वेळ
जाऊ लागला तसतसे सारे चिंताग्रस्त झाले. त्यांच्या हालचालीत गलथानपणा येऊ
लागला. आमच्या उघड्या अंगावर सपासप चाबकांचा मारा सुरू झाला. फटकाऱ्यांचे
आवाज ऐकू येऊ लागले.
त्यानंतेर आम्हाला आणखी एका कक्षात नेऊन आमची पूर्ण हजामत करण्यात
आली. नुसत्या डोक्यावरच नव्हे तर संपूर्ण अंगावर एकही केस शिल्लक राहिला
नाही. एकमेकांना ओळखणेही आम्हाला कठीण होत होते. पुन्हा रांगेत उभे करून
आम्हाला पाण्याच्या फवाऱ्याखाली ढकलण्यात आले. तशा परिस्थितीतही फवार््यातून
व वायू न पडता पाणीच पडते आहे हे पाहून काही जणांनी सुटकेचा श्वास
न
आम्हाला जोडे राहू द्या म्हणून सांगण्यात आले होते खरे, पण प्रत्यक्षात
ज्यांच्याजवळ चांगले जोडे होते त्यांच्याजवळून ते हिसकावून घेण्यात आले होते.
बदल्यात त्यांना जुने, नीट न होणारे जोडे दिले गेले. स्नानगृहाबाहेर असताना काही
जुन्या कैद्यांनी (बहुधा दयाबुद्धीने असावे), ज्यांच्याजवळ हिवाळ्याचे लांब बूट होते
त्यांना, “तुम्ही जोड्याचा वरचा भाग कापा व तेथे साबण लेपून कापलेले दिसू देऊ
नका.”” असा सल्ला दिला होता. एस.एस. जणू चुका पकडायला टपूनच बसले
होते. ज्यांची ही 'चोरी' उघडकीला आली, त्यांना बाहेरील लगतच्या खोलीत नेले
गेले. लवकरच आम्हाला चाबकांच्या फटकाऱ्यांचा आवाज परत एकदा ऐकू येऊ
लागला. ह्या बेळी चाबकाचे सपकारे आणखी जास्त वेळ चालू होते. किंकाळ्यांनी
आसमंत भरून गेले.
अशा! तऱ्हेने एक एक करत आमच्या साऱया आशा विरल्या, आ्रांती फिटल्या.
अन् अनपेक्षितपणे तशा नग्न अवस्थेत आम्हाला अभद्र विनोद सुचू लागले.
केसविरहित शरीराशिवाय हिरावून घेण्यासारखे आता आमच्याजवळ काहीएक
उरले नव्हते. त्या दिगंबर अवस्थेत आपल्यापाशी आता काहीही नाही, ह्याची
तीव्रतेने जाणीव होत होती. फवारे सुरू झाले तशी आम्ही स्वत:ची, एकमेकांची
टिंगल करू लागलो. निदान फवाऱ्यातून विषारी वायू न येता पाणी आले होते ना!
पूर्वांयुष्यास जोडणारा कुठला दुवा होता आता जवळ? नाही म्हणायला माझ्याजवळ
माझा चष्मा नि पट्टा होता. लवकरच पट्टादेखील मला पावाच्या तुकड्याच्या
बदल्यात विकावा लागला.
ज्यांना ट्रस घालावा लागत होता त्यांच्यासमोर आणखी एक भय लवकरच
उभे राहिले. एक कापो आम्हाला नेमून दिलेल्या खोपटात आमचे 'स्वागत' करायला
आला. त्याने आपल्या भाषणात एका धमकीची भर घातली. “जर कोणी आपल्या
१४ 1 अर्थाच्या शोधात
ट्रसमध्ये पैसे किंवा मौल्यवान खडे लपविलेले सापडले तर त्यांना मी त्या वरच्या
तुळईवर लंगोटानेच बांधून फाशी देईन.” गर्वाने छाती फुगवीत तो पुढे बोलला,
“सिनियर कैदी म्हणून मला तो अधिकार तळावरील कायद्याने बह्यल करण्यात
आला आहे.”
साऱ्या स्वप्नभंगाबरोबर अनपेक्षित स्थळकाळात विनोद कसा प्रकटला ते मी
तुम्हाला सांगितलेच आहे. विनोदाचा हात धरून अकस्मात उत्सुकता देखील आली
होती. पूर्वी एकदा गिर्यारोहण करताना मला अपघात झाला होता, तेव्हाही असाच
अनुभव आल्याचे आठवले. त्या वेळी उंचावरून पडता पडता आता आपण यातून
जिवंत बाहेर पडू का? आपली कवटी फुटणार आहे की इतर कुठल्याप्रकारची इजा
होणार आहे? अशा विचारचक्रात माझे मन गुंतले होते. तसाच अनुभव ऑशविट्झच्या
कॅम्पमध्ये पुन्हा आला. मनाने स्वत:ला भोवतालच्या वातावरणापासून अलग केले.
पुढे काय होणार ह्याची भीती वाटत असतानादेखील केव्हतरी, तटस्थ उत्सुकतेने
मनावर मायेचे पांघरूण घातले. पोलंडमधील गारठ्यात संपूर्ण विवस्त्र नि बर्फाळ
पाण्याने ओलेते, उघड्यावर उभे असलेले आम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला ती
थंडी बाधली कशी नाही, ह्या आश्चर्यात बुडालेले होतो. असे अनेक विस्मयकारक
अनुभव नव्याने ऑशकिट्झसारख्या छ्मवण्यांमध्ये आलेल्या आमच्यासारख्या लोकांसमोर
वाढून ठेवलेले होते. माझ्यासारख्या वैद्यकीय शास्त्र शिकलेल्यांना “पुस्तकात
लिहिलेले सारे खरे नसते' हा धडा मिळाला. उदाहरणार्थ : आतापर्यंत वैद्यकीय
पुस्तकांत वाचत आलो होतो, की अमुक इतक्या तासांच्या झोपेशिवाय माणूस जगू
शकत नाही. साफ चूक. अमुक एका गोष्टीशिवाय आपण झोपू शकणार नाही
असेही मला वाटत होते. ऑशविट्झमध्ये पहिल्या रात्री सहा फूट लांब व आठ फूट
रुंदीच्या, अंथरूण नसलेल्या एकेका फळकुटावर, दोन पांघरुणात नऊ माणसे असे
आम्ही झोपलो होतो. अर्थातच प्रत्येकाला जेमतेम, कुशीवर, एक दुसऱ्याला खेटून
झोपता येईल एवढीच जागा होती. गारठ्यात एकमेकांच्या शरीराची थोडी ऊब मात्र
मिळाली. जोडे बिछान्यात न्यायची परवानगी नसूनही काही जणांनी चिखलानी
माखलेल्या जोड्यांचा उशीसारखा उपयोग केला. काही इतर, एकाचे डोके दुसऱ्याच्या
जवळ, जवळ व असलेल्याच्या निखळलेल्या बगलेचा उशीसारखा उपयोग करून
झोपले आणि तरीही आधीच्या दु:खावर विस्मृतीची फुंकर घालीत काही तासांसाठी
निद्रा जवळ आली.
माणसाच्या सहनशक्तीची सीमा किंती लवचीक असते याचे इतर अनेक
प्रत्यय आले. छळछावणीत आम्हाला दात घासायची काही सोय नव्हती. जेवणही
अपुरे नि सत्वहीन असे. तरीसुद्धा आमच्या हिरड्या मजबूत राहिल्या. अंगावरचे
कपडे सहा सहा महिने बदलता येत नसत. पाण्याचे पाईप गोठले असल्याने
अर्थाच्या शोधात । १५
User Reviews
No Reviews | Add Yours...