राज समाज और शिक्षा | RAJ SAMAJ AUR SHIKSHA

RAJ SAMAJ AUR SHIKSHA by कृष्ण कुमार - Krishna Kumarपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कृष्ण कुमार - Krishna Kumar

No Information available about कृष्ण कुमार - Krishna Kumar

Add Infomation AboutKrishna Kumar

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुलं ज्या सौहार्दाने आणि सहजतेनं वावरतात तसंच शाळेत असायला हवं. जगण्यातले लहान-मोठे अनुभव आणि अडचणींना सामोरे जाताना मोठ्या मित्राच्या मदतीनं मूळ सुलमतेनं शिकू शकतं. आपल्याहून मोठ्या आणि लहान मुलासोबत राहणं खरं तर एरवीच एक शिकण्याचा चांगळा अनुभव असू शकतो. तरुण आणि वयस्कर शिक्षकांना एकमेकांसोबत काम करताना असाच अनुभव मिळतो. “वर्ग'व्यवस्था असा अनुभवच अशक्य बनवून टाकते. ही व्यवस्था मुलांना त्यांच्यापेक्षा लहान आणि मोठ्या मुळांपासून वेगळं तर करतेच, पण जे त्यांना शिकवतं नाहीत त्या शिक्षकांपासूनही तोडून टाकते. मोठ्यांशी ओळख आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव असणं मुलांसाठी खूप आवश्यक आहे. सध्याच्या सामाजिक व्यवस्थेत फक्त पाळक असणाऱ्या वयस्कर मंडरळीशीच मुलांचा संबंध येतो. वर्गात एका शिक्षकाशी बांधले गेल्यानं शाळेत असलेल्या इतरांशी ओळखीच्या शक्‍यता संपून जातात. देशात जवळपास सगळीकडच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये एकेका शिक्षकाकडे एका वर्गाची जबाबदारी दिली जाते. मुल त्याच त्या व्यक्तीच्या सहवासात कंटाळतात, त्या व्यक्तीकडून नव काही शिकण्याचा उत्साह हरवून बसतात. त्यांच्यामधळा पूल म्हणजे पुस्तकं. ती एरवीही काही फारशी जिवंत नसतात. काही बिनसरकारी शाळांमध्ये प्राथमिक शाळेत वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षकही असतात. मुलं एकाच व्यक्तीशी बांधली गेलेली नसतात पण त्यांचा परीघ सीमितच राहतो. या वर्ग-इयत्ता व्यवस्थेचा आणखी एक परिणाम अभ्यासक्रमावरही पडतो. खरं तर मुलं आणि शिक्षकांची परिस्थिती आणि समाजात शिक्षणाच्या निश्चित ध्येय धोरणांच्या आधारावर अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केला पाहिजे. “अभ्यासक्रमा'चा अर्थ भारतात फक्त सरकारी धोरणं किंवा आदेश असाच छळावला जातो. आपल्याकडे अभ्यासक्रमाचा मुलांच्या आणि शिक्षकाच्या परिस्थितीशी काही संबंध नसतो. शिक्षण-विषयक कुठल्यातरी केंद्रावर हा अभ्यासक्रम बनवला जातो आणि दूरदूरच्या जिल्ह्यांतील गावा-गावांतल्या शाळेतल्या मुलांवर लादला जातो. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ दोन दशकं अभ्यासक्रमांच्या बाबतीत फारच थोडे असे बदल झाले. यानंतर राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभूतपूर्व ओोधांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात कैली आणि बघता बघता देशभरातल्या राज्यांतले अभ्यासक्रम बदलू छागले. काही ठिकाणी हे बदल एवढ्या भयावह गतीनं झाले की मोठ्या प्रमाणावर छापलेली पुस्तकं वाया गेली. नव्या पुस्तकांची छपाई आणि वितरण एक समस्या बनली. याहून एक विचित्र गोष्ट अशी घडली की अभ्यासक्रम खाळच्या इयत्तांकडे सरकू लागला. म्हणजे वरच्या वर्गाचा अभ्यासक्रम खालच्या वर्गासाठी द्यायला सुरूवात झाली. हे १९६४-६६ च्या शिक्षण आयोगाच्या एका शिफारशीनुसार झाल. त्यात असं म्हटल गेल की विसाव्या शतकात ज्ञानाचे एकूण प्रमाण अचानक वाढलं आहे”. ज्ञान म्हणजे एक साठा किंवा ढीग आहे अशी उघड समजूत यामागे दिसते. शिक्षण आयोगाच्या अहवालातून स्पष्ट दिसतं, की आयोगाचे सदस्य पाश्‍चिमात्य देशांतील अभ्यासक्रमांमुळे प्रभावित झालेले होते आणि त्यांच्या शिफारसींमागे त्यांची इच्छा हीच होती की भारतीय अभ्यासक्रमात माहितीचं प्रमाण पाश्‍चिमात्य अभ्यासक्रमाच्या आधारावर ठरवलं जावं. अशा तऱ्हेची समजूत राजकीयदृष्ट्या वसाहतवादी आणि शैक्षणिकदृष्ट्या पुरातनवादी आहे. या समजुतीनुसार शिक्षणाचं केंद्र मुलं नसून माहिती हे आहे. मुळांना केंद्र मानलं तर आपल्याला दिसेल की अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी मुलांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या क्षमता आणि त्यांच्या सामाजिक संदर्भात शिक्षणाची उपयुक्तता जोखणं आवश्यक आहे. त्यांच्या डोक्यावर माहितीच्या भेंडोळ्यांचं ओझं ठेवणं नव्हे, गेल्या आठ-दहा वर्षांत पाठ्यपुस्तकांतल्या व अभ्यासक्रमातल्या बदलांसंबंधी देशातल्या विविध भागांतल्या शिक्षकांशी वा पालकांश्ली विचारविनिमय जवळपास केला गेलाच नाही. नवीन अभ्यासक्रम थोडाबहुत शहरांतल्या मुलांना शिकवून विकसित केला गेळा आणि ही समजूत करवून घेतली गेली की हा वाढलेला अभ्यासक्रम दूरदूरच्या गावांमध्ये शिकणारी मुलंही सहज स्वीकारू शकतील. पण याउलट नवीन अभ्यासक्रमाची सामग्री खेड्यांतल्या, गावांतल्या शिक्षकांना आणि मुलांना कठीणच वाटली, विशेषत: गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासक्रमातले बदल या शाळांसाठी कठीण झाले. याप्रकारे शहराच्या संपन्न आणि खेड्यातल्या गरीब शाळेतले आधीच असलेलं अंतर यामुळे आणखी वाढलं. इयत्तेनुसार अभ्यासक्रम नवीन करण्याच्या प्रयत्नांमुळे हे घडल, अभ्यासक्रमाची अशाप्रकारे इयत्तावार विभागणी केल्यामुळे मुळांचा विकास ही एक सततची प्रक्रिया न बनता तो कृत्रिम तुकड्यात वाटला जातो. असा स्थितीशील अभ्यासक्रम मुलाच्या व्यक्तिगत आवडीनिवडी, त्याच्या क्षमतांमध्ये उपयुक्त न ठरता, “नाईलाज ठरतो आणि मूल आणि शिक्षक त्याचा निरूपायानं स्वीकार करतात. एखाद्या मुलाला एखाद्या विषयात त्याच्या वर्गमित्रापैक्षा अधिक आवड असली तरी मौठ्या शिक्षकाकडून नवीन पुस्तकातून जास्तीची माहिती मिळेतो अभ्यासक्रमामुळे त्याला अख्खं एक वर्ष वाट पहावी लागते. श्री अरविंद आश्रमातल्या शिक्षणकेंद्रात अभ्यासक्रम असा स्थिर आणि निश्चित नाही. तिथे मुळांना आपल्या आवडी आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now