साधना - जनवरी 2018 | SADHANA - JAN 2018

Book Image : साधना - जनवरी 2018 - SADHANA - JAN 2018

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनोद एस० - VINOD SHIRSATH

No Information available about विनोद एस० - VINOD SHIRSATH

Add Infomation AboutVINOD SHIRSATH

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लढ्यात सहभागी झालो ! प्रश्न - असे असूनसुद्धा तुम्ही तुमचा स्वतंत्र मार्ग कसा चोखाळला? - त्याची अनेक कारणे आहेत. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण वसमतला झाले. वडिलांना मी शिकावे असे फार वाटायचे, पण शिक्षणाच्या सुविधा आतासारख्या नव्हत्या. हायस्कूलसुद्धा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असायचे. दळणवळणही आजच्या एवढे सोपे नव्हते. बाहेरगावी राहण्यासाठी कुणातरी नातलागाचे घर असावे लागे. यातून मार्ग काढण्यासाठी माझ्या वडिलांना एक युक्ती सुचली. पुढील शिक्षणासाठी नातेवाईकाचा शोध घेण्यापेक्षा माझे लग्न करावे, म्हणजे आपोआपच हा प्रश्न सुटेल व मला शिक्षणासाठी तिथे राहता येईल व त्याप्रमाणे घडलेही ! प्रश्न - म्हणजे शिक्षण आणि लग्न याबाबत तुमच्या संदर्भात उलट घडल्यासारखे दिसते. मध्यमवर्गीयांमध्ये शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय सहसा लग्नाचा विचार कुणी करत नाही. लग्नानंतर शिक्षण घेणे शक्‍य होत नाही, असाच समज रूढ आहे. मग तुम्ही लग्नाला संमती कशी दिली? - माझी संमती घेण्याचा प्रश्नच आला नाही आणि घेतली तरी अज्ञान वयातील संमतीला फारसा अर्थ नसतो. एकीकडे मला पुढचे शिक्षण मिळावे ही वडिलांची तीव्र इच्छा व दुसरीकडे त्यासाठी मला एकटे कुठे न ठेवण्याचा आग्रह. यामुळे ते विचित्र परिस्थितीत सापडले. शेवटी माझ्या पुढील शिक्षणासाठी माझे लग्न करणे, हाच तोडगा त्यांना योग्य वाटला व त्यांनी जालन्याच्या एका गरीब कुटुंबातील मुलीशी माझा विवाह केला. शिक्षणासाठी सासुरवाडीला राहण्याचा योग मला वाटते कुणाच्या जीवनात येत नसावा किंवा आला असेल तर फार थोड्यांच्या नशिबी ते भाग्य येत असावे. पण का, कोण जाणे एक वर्षापेक्षा अधिक काळ माझे मन तिथे रमले नाही. आठवीचे एक वर्ष मी कसेबसे काढले व अन्यत्र कोठेतरी चांगल्या ठिकाणी सोय व्हावी, असे वाटत असतानाच अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नाव समोर आले आणि मी तिथे राहू लागलो. प्रश्न - अंबाजोगाईला राहण्याचे कसे ठरले? तिथे राहण्याचा योग कुणामुळे आला? त्याचा तपशील आपण सांगू शकाल काय? - तपशिल फारसा विस्ताराने सांगता येणार नाही, पण साधना । २० जानेवारी २०१८ ।। १६ । 1)86 07 एप्रभिाटक्षांञ - 13-01-2018 आठवेल तेवढा सांगतो. कारण त्या गोष्टीला आता सुमारे साठ-पासष्ट वर्षे झाली आहेत. माझी सोय अंबाजोगाईला कशी झाली, त्यापूर्वी त्या वेळची राजकीय व सामाजिक परिस्थिती कशी होती, हा संदर्भही थोडासा लक्षात घेणे जरूर आहे. देशाच्या पातळीवर स्वातंत्र्याचा लढा ऐन भरात होता. ठिकठिकाणी सत्याग्रहाचे लढे सुरू होते. गांधीजींनी आपले आंदोलन तीव्र केले होते. हैदराबाद राज्यातही काँग्रेसशिवाय इतर संघटनांतर्फे सत्याग्रह चालूच होते. त्यात आर्य समाज, हिंदू महासभासारख्या संघटना अग्रेसर होत्या. अशा पार्श्वभूमीवरच अंबाजोगाईची शाळा स्थापन झाली होती. तो काळ १९३८-३९ चा होता. संबंध देशाचे वातावरण स्फोटक होते. स्वातंत्र्य आंदोलन म्हणजे काय याची तोंडओळख मला खऱ्या अर्थाने अंबाजोगाई येथे झाली. ब्रिटिशांची सत्ता झुगारली पाहिजे आणि त्यासाठी गांधीजींनी सुरू केलेल्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. अशा विचाराची रुजवात माझ्या मनात याच काळात झाली. प्रश्न - आतापर्यंत आपण जे सांगितले त्यावरून अंबाजोगाईच्या वास्तव्यात तुमच्या विचाराला काही बैठक मिळण्यात आणि आकलनाच्या कक्षा रुंदावण्याला मदत झाली असे दिसते. अंबाजोगाईचे दिवस म्हणजे तुमच्या विद्यार्थी जीवनातले मंतरलेले दिवस म्हणायला हरकत नाही, असेच ना? - होय. ते मंतरलेले दिवस होते आणि आत्मपरीक्षणाचेही दिवस होते. बाबासाहेब परांजपे यांचे भाषण ऐकले आणि माझ्या जीवनाला त्यामुळे एक कलाटणीच मिळाली. यांचे वक्तृत्व प्रभावी होते. त्या वेळी त्यांची वाणी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आग ओकीत होती. मराठवाडा तर दुहेरी पारतंत्र्यात होता. निझामाची राजवट जुलमी आणि धर्मांध होती. अशा परिस्थितीत माझा बाबासाहेबांशी संपर्क आला. ते त्या वेळी शिक्षण संस्थेचे काम अत्यंत नेटाने आणि निष्ठेने करत होते. खासगी शाळा चालवणे हे त्या वेळी मोठे व्रत होते. सरकारी शाळा त्यासुद्धा थोड्या होत्या. शिक्षकांत मुसलमानांचा भरणा अधिक असे. मुस्लिम सणांना सुट्टया असत. मोहरमची सुट्टी त्या वेळी दहा दिवसांची होती. शाळा तपासायला येणारे अधिकारी मुस्लिमच असत. शाळा तपासणीच्या दिवशी बाबासाहेब काळी शेरवानी घालून शाळेत यायचे. वेष आणि पेहरावाबाबतही मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now