ज्योतिष्याकड़े जाण्यापूर्वी | JYOTISHKADE JAANAPOORVI
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
927 KB
                  Total Pages : 
86
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

प्रकाश घाटपांडे - PRAKASH GHATPANDE
No Information available about प्रकाश घाटपांडे - PRAKASH GHATPANDE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अध्टेत्तरी महादशा :- चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहू १२ वर्षे, केतू - शुक्र २१
वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १०८ वर्षे
१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे कायी
सूर्य व चंद्र हेही ग्रहच आहेत असे हे शास्त्र मानते. या दोन ग्रह्लंचे भौतिक परिणाम सर्व सृष्टीवर होतात. बाकीच्या
ग्रहांचे भौतिक परिणाम होत असल्याचे आढळलेले नाही. राहू व केतू हे काल्पनिक बिंदू असल्याने त्यांचे भौतिक
परिणाम अशक्य आहेत. भौतिक परिणाम हे सामूहिक स्वरूपाचे असतात.
ग्रहांचे ज्योतिषीय स्वरूपाचे परिणाम मानवी जीवनावर होतात असे निश्चितपणे दाखवणारा पुरावा आजवर तरी
मिळालेला नाही. गॉकेलिनचा गाजलेला मार्स इफेक्ट वादग्रस्त पुरावा आहे. त्या पुराव्यात सिलेक्शन बायेस हा दोष
आहे असे कार्ल कोप्पेनशार नावाच्या एका शास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे. ( यूरो स्केप्टिक-९१ या नियतकालिकात
त्याचा लेख आला आहे )
या संदर्भात एका मुद्याचे विवेचन करणे आवश्यक आहे. गेली पन्नास-साठ वर्षे ज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक
यांच्यात वादाची जी रणधुमाळी चालली होती तिचा केंद्रबिंदू हा होता की माणसावर ग्रहताऱ्यांचे परिणाम होत असणे
शक्य आहे की नाही. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणामकारक असे प्रभाव
माणसावर पडणे शक्य नाही ।, अशी भूमिका विरोधकांची होती , आणि ''तसे प्रभाव पडणे शक्य आहे- नव्हे ते
पडतातच) , अशी भूमिका समर्थकांची होती. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनासाठी विद्युत्चुंबकीय प्रारणे म्हणजे ऊर्जालहरी ,
गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, भरती-आहोटी, सजीव सृष्टीवर होणारे सूर्य-चंद्राचे परिणाम इत्यादि प्राकृतिक तत्वांचा
उपयोग तर त्यांनी केलाच आणि वर 'भौतिक शास्त्रांना अद्याप न उलगडलेली अशी कितीतरी तत्वे या विश्वात आहेत,'
असे टोमणेही विज्ञान-मागध् लोकांना उद्देशून मारले , -जणू काही तसली काही तत्वे फलज्योतिषाच्या पाठीशी
खरोखरच उभी आहेत! डॉ. मिशेल गॉकेलिन यांनी प्रचंड संशोधन करून असे दाखवून दिले होते की अगदी सूक्ष्म
प्रमाणात का होईना पण ग्रह्रंचा माणसावर परिणाम होतो. ते संशोधन त्यांच्या मृत्यूनंतर वादग्रस्त ठरले तो भाग
वेगळा, पण कित्येक वर्षे त्या संशोधनाने शास्त्रीय जगतात धमाल उडवून दिली होती , आणि तिचा भरपूर फायदा
ज्योतिष-समर्थकांना मिळाला यात शंका नाही. त्यांच्या काही युक्तिवादात थोडेफार तथ्यही होते त्यामुळे सर्वसामान्य
माणसाला असे वाटू लागले की शास्त्रज्ञ मंडळींची टीका केवळ हृटवादीपणाची असून ज्योतिष-समर्थकांची बाजूच
बरोबर आहे.
ग्रह-नक्षत्रादिचे मानवी जीवनावर परिणाम होत असावे कि नाही हा बुद्धिमंतांना दीर्घकाळ पुरणारा विषय आहे.
२०) काही ज्योतिषी आयुष्यातील काही घटना अचूक सांगतात ते कसे
तुम्हाला स्वत:ला असा काही अनुभव आला आहे का ?की ऐकीव गोष्टींवरून तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात ?
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...