जादूगर लिकी व इतर कथा | MY FRIEND MISTER LEAKEY

Book Image : जादूगर लिकी व इतर कथा  - MY FRIEND MISTER LEAKEY

More Information About Authors :

जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE

No Information available about जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE

Add Infomation AboutJ. B. S. HALDANE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

श्रीनिवास पंडित - SHRINIWAS PANDIT

No Information available about श्रीनिवास पंडित - SHRINIWAS PANDIT

Add Infomation AboutSHRINIWAS PANDIT

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आजपर्यंत एवढं चविष्ट फळ मी खाल्लेलं नाही, पण मला त्याच्या चवीचं वर्णन करता येत नाही. मी मुद्दाम थोडा रस अंगावर सांडायचा प्रयत्न केला, पण तो उलट उडून माझ्या तोंडात गेला. बाकी पाच आंबे त्यांनी मला मेट दिले. पण घरी मला ते बाथटबमध्ये बसून खावे लागले, कारण त्यावर मंत्र घातलेला नव्हता. आम्ही कॉफी घेत असताना (ती लिकींनी अर्थात हॅटमधून मगात ओतली) त्यांनी टेबलावर छडी आपटली. त्याबरोबर तिथे गवताचे कोंब उगवू लागले. ते थोडं मोठं झाल्यावर लिकींनी फिलीस गाईला तिथं चरायला सोडलं. मग आणखी थोड्या गप्पा झाल्यावर, मला निघायला पाहिजे असं मी त्यांना म्हणालो. “चला, सोडतो मी तुम्हाला.'' लिकी म्हणाले. “पण वेळ असेल तेव्हा नक्की परत या तुम्ही. तुम्हाला मी काय काय करती ते बघता येईल. तुम्हाला सवड असेल, तेंव्हा आपण भारत वा इंडोनेशियातही चक्कर मारून येऊ, आता या गालीच्यावर उभे राहा, पण तुमचे डोळे मिटून घ्या. कारण पहिल्या दोन-तीन वेळा त्याच्यावर बसून उडताना लोकांना चक्कर येते.'' त्या खोलीकडे अखेरची नजर फिरवून मी डोळे मिटून गालिच्यावर उभा राहिलो. लिकींनी गालीच्याला माझा पत्ता सांगितला अन्‌ कानाच्या पाळ्या गालांवर आपटल्या. एकदम कुठून तरी गार वार्‍याचा झोत आला. मला किंचीत चक्कर आल्यासारखं वाटलं. लिकींमी मला डोळे उघडायला सांगितलं. बघतो, तर मी पाच मैलांवरच्या माझ्या घरामध्ये होतो. माझा दिवाणखाना छोटा आहे अन्‌ जमिनीवर सगळीकडे भरपूर पुस्तकं पसरलेली होती, त्यामुळे गालीचा हवेत फूटभर ७ उंचीवर तरंगत होता. ० माझा निरोप घेऊन लिकींनी परत कानाच्या पाळ्या गालावर आपटल्या, तसे ते व गालीचा अद्दश्य झाले. माझ्या हातात ते आंबे नसते, तर एवढा वेळ मी स्वप्नातच आहे असं मला बाटलं असतं. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर त्यांच्या आणखी काही गोष्टी मी नंतर सांगीन. १० / जादूगार लिकी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now