विपुलाच सृष्टी | VIPULACH SHRISTI

VIPULACH SHRISTI by पुस्तक समूह - Pustak Samuhश्री ए० दाभोलकर - SRI A. DABHOLKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

श्री ए० दाभोलकर - SRI A. DABHOLKAR

No Information available about श्री ए० दाभोलकर - SRI A. DABHOLKAR

Add Infomation AboutSRI A. DABHOLKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ड्0 चारा निर्माण करण्यास आपण वापरू शकलो तर त्या शेण-मूत्रावाटे त्या म्हशीसाठीचे पुन्हा एक दिवसाचे अन्न बनवून देण्यास निसर्ग तयार असतो. हीच गोष्ट जरा सोपी करून प्रयोग पद्धतीने समजून घ्यावयाची तर आपण मका पेरून तो साठ दिवसांत रसरशीत असताना म्हशीला द्यावयाचे ठरवले तर एका दिवसासाठी म्हशीला जेवढ्या पेंढ्या मका लागेल तेवढ्या पेंढ्या मका देणाऱ्या जागेत म्हशीचे एक दिवसाचे शेण मूत्र साठ दिवसांत योजनापूर्वक आपण पुरवले की म्हशीच्या चाऱ्याचे घरगुती सुलभ चक्र आपण बसवू शकू. अर्थात असे चक्र उभे करताना मक्याच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात कमी जागा देऊन नंतर रोपांना पेरे सुटताना जादा जागा पुरविण्याची प्रयोग पद्धती बसविली तर फक्त ३० दिवसच ३० चौरस फुटात वाढणारा मका पुन्हा एक दिवसाचे चारा चक्र उभे करील व असे ३० वेळा लागोपाठ म्हणजे गुंठाभर जागेतच मका, शेवगा, उंबर इत्यादी मिश्र वनस्पतींना विशिष्ट रीतीने पुरवून आपण म्हशीच्या चाऱ्याचा प्रश्‍न कायमचा आपल्या आटोक्यात आणून ठेवू शकू. ' तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी * ही म्हण मग खऱ्या अर्थाने आपण समजून घेऊ शकू. ( अशा प्रयोग लागवड तंत्राची चर्चा या लेखमालेत यथाकाल येणार आहे. चालू लेखात म्हशीचे रोजचे शेण-मूत्र म्हणजेच म्हशीचे रोजचे चारा-वैरण, दाणा-काडी असा संदर्भ तेवढा स्पष्ट केला आहे. ) या लेखातील प्रमुख चर्चा ही अद्याप परिसरात उपलब्ध होऊ शकणाऱ्या अतिसूक्ष्म स्वरूपात लागणाऱ्या तांबे, लोह, जस्त, कोबाल्ट, मँगेनीज या व यांसारख्या मूळ घटकांबाबतची आहे. निसर्गामध्ये हे पदार्थ आज अमर्याद स्वरूपात उपलब्ध नाहीत. आज जगातील सर्व उपलब्ध तांबे सर्वत्र सारखे वाटून द्यावयाचे ठरवले तर आपल्या शेतातील एक किलो सुक्‍या मातीत ते एका तांदळाच्या वजनाइतकेच जेमतेम पुरवता येईल. असेच वाटप आयोडीनचे केले तर दर किलोमध्ये ते मोहरीएवढ्याच मात्रेने मिळू शकेल. अशा एक किलोत जस्त २ गहूभार, तर लोह एका किलोत ३४ ग्रॅम, कॅल्शियम, पोटॅशियम १३ ग्रॅम, मॅग्नेशियम ६ ग्रॅम, मँगेनीज दीड मोहरी भार या प्रमाणात वाटप करून देता येईल. गहूभार, मोहरीभार हे शब्द चालू शास्रीय परिभाषेत कसे मांडतात ती भाषा आपण आता समजून घेतली पाहिजे. अशा वैज्ञानिक साक्षरतेमुळेच आपल्या परिसरात आपली सर्व समृद्धी उभी करण्याचा नैसर्गिक प्रयोगरस्ता आपणास सापडणार आहे. ( यासाठी लेखांक ४ : चौकट १ नीट समजून घ्या ) २१ लेखांक ४ : चौकट १ नवी वैज्ञानिक साक्षरता : सोने आदी मोजताना तोळा, गुंजा, ग्रँम यांसारखी जुनी-नवी भाषा आपणास माहीत झालेली आहे. आपल्या खिशात असणारी अधेली ५ ग्रॅम असते तर पावली अडीच ग्रॅम असते. म्हणजे दुकानदाराने पावलीभार मोहरी आपल्याला दिली तर अडीच ग्रॅम मोहरी आपणाला दिली असे म्हणता येते. आता जरा खास प्रयोग करा. ओळखीच्या दुकानदाराकडे जाऊन पावलीभार तांदूळ, गहू, मोहरी मोजून आणा व त्या पावलीभारातील तांदूळ, गहू, मोहरी याची संख्या मोजा. शक्‍यतो एकसारखे, टुपटुपीत, न फुटके, न किडलेले दाणे प्रयोगात घ्यावेत हे सांगावयास नकोच. अशा पावलीभारात ५०० पर्यंत मोहरीचे दाणे भरतात. अडीच ग्रॅमचे लहान भाग मिलीग्रॅम आहेत. एका ग्रॅमचे हजार मिलीग्रॅम होतात. . म्हणजे अडीच ग्रॅम * पावलीभार 'चे २५०० मिलीग्रॅम होतात. याला ५०० मोहरीने भागले की ५ हा आकडा उरतो. म्हणजे एक मोहरीएवढे आयोडीन तीस दिवसात आपण वापरत असलो तर त्याचा अर्थ पाच मिलीग्रॅम वजनाचे आयोडीन तीस दिवसांत आपणास मिळाले पाहिजे. मोठ्या माणसाच्या शरीराचे वजन ६५ ते ७० किलो असते, म्हणजे एवढ्या वजनाच्या शरीराची रखवाली किती प्रमाणातील आयोडीन करते ते नेमके समजून येईल. ' एका पावलीभारात १२५ तांदळाचे दाणे बसतात; म्हणजे तांदळाच्या एका दाण्याचे वजन २५०० भागिले १२५ म्हणजे २० मिलीग्रॅम म्हणजेच चार मोहरी एवढे असते. गि नाचणी, वरी, मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, शेंगदाणा इत्यादींची वजने मिलीग्रॅम काढून त्यांचे कोष्टक बनवून तुलना करा. आता एक किलो म्हणजे हजार ग्रॅम याचे मिलीग्रॅम १०००, त्याने गुणिले की १०००००० > दहा लाख होतात. एक लिटर पाण्याचे वजन पण एक किलोच म्हणजे दहा लाख मिलीग्रॅम असते. आता एक लिटर पाण्यात जर एक मोहरी मापाचे * ५ मिलीग्रॅम * खत विरघळले असेल तर दहा लाखांत पाच मापे खत आहे असे क अ . इंग्रजीत दहा लाखाला मिलियन म्हणतात. दर दहा लाख म्हणजे . भाग म्हणजे पार्ट, पार्ट पर मिलियन. यांतील प्रत्येकाचे पहिले अक्षर इंग्रजीत घेतले तर पी. पी. एम. होते. ५ पी. पी. एम. जिब्रँलिक अँसिड वापरा. ५० पी. पी. एम; जी. एं. वापरा. हे सूत्र प्रत्येक द्राक्ष बागायतदार आता समजून वापरत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now