आई | MOTHER

MOTHER by पुस्तक समूह - Pustak Samuhमेक्सिम गोर्की - MAXIM GORKY

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मेक्सिम गोर्की - MAXIM GORKY

No Information available about मेक्सिम गोर्की - MAXIM GORKY

Add Infomation AboutMAXIM GORKY

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मी प्रथम स्वतः अभ्यास करणार , अन्‌ मग इतरांना शिकवणार . आम्ही कामगारांनी अभ्यास करायला हवा . आपले ज्लीवन इतके खडतर कां असते हे नौट समजून घ्यायला हबं.” त्याच्या निळ्या नेत्रांतील नेहमीचा कठौरपणा व ' गांभीर जाऊन त्याजागी मार्दव व प्रेमळपणाचे नवे तेज दिसू लागले ते पाहून ती हर्षित झाली. तिच्या ओठांवर स्मिताची रेखा उमटली . तिच्या अंतरंगात दोन परस्परविरोधी भावनांचा संघष सुरू होता. जीवनातील दु:खांची इतकी तीक्ष व स्पष्ट जाणीव आपल्या मुलाला झाली आहे हे पाहून तिला त्याच्याविषयी एकीकडे अभिमान वाटत होता, तर त्याचबरोबर दुसरीकडे त्याचे वथ अजन फार कोवळे आहे, आणि तो इतरांपेक्षा अजिबात निराळं बोलत आहे व तिच्या स्वत:सकट सर्वांनाच अटळ वाटणाऱ्या जीवनातील दुःखांविरुद्ध ब हालअपेष्टा- विरुद्ध एकाकीच लढण्याचा त्याचा निर्धार आहे, या विचाराने ती चिंताग्रस्त होत होती. तिला वाटले , आपण य्राला म्हणावे , “बेटा ! तू एकटा काय करणार ?” पण आपण असं म्हटलं तर त्याच्याविषयीचं वाटणार कौतुक व आदर यात काहीतरी कमीपणा यईल, अचानकपणे इतकी हशारी दाखविणाऱ्या व आपल्याला अगम्य असं काहीतरी नवंच बोलणाऱ्या आपल्या मुलाच्या मोठे- पणाला त्यामुळे बाधा येईल , असा विचार येऊन तिने ओठावर आलेले ते शब्द मागे परतवले . आपल्या आईच्या ओठांवरचे स्मित, आपलं वौलणं एंकण्यातील तिची एकाग्रता , तिच्या सेत्रांतील प्रेमळ भाव, हे सव पावेलने पाहिले आणि आपण प्रतिपादन करीत असलेले सत्य तिला पटवून देण्यात आपल्याला यश आले आहे असे त्याला वाटले , आपल्या शब्दांतील ही शक्‍ती प्रत्ययास येऊन त्याला युवकसुलभ अभिमान वाटला ब त्याथोगे त्याचा आत्मविश्‍वास दुणाव-* ला. तो आवेशाने बोलत होता . मधूनमधून त्याच्या चेहऱयावर स्मित दिसू लाग, तर क्षणात त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरे . मधूतमधन त्याच्या शब्दांत जळजळीत चीड व्यक्‍त होई व त्याचे शब्द इतके कठोर असत की ते ऐकून ती भयभीत होऊन जाई ब भस्तक हालवून त्याला मृदु स्वरात विचारी, “त्‌ म्हणतोस ते शक्‍य आहे, पाशा?” “ होय, शक्‍य आहे! तो निर्धाराने उत्तर देई, आणि मग बहुजन- ऱ्या (6 समाजाचे हित साधण्याची तळमळ असलेले काही लोक जनतेत सत्याचा प्रचार कसा करीत होते आणि त्यामुळे मानवजातीचे शत्रू त्यांना तुरुंगांत डांबून व सक्तमजरीची शिक्षा देऊन त्यांचा कसा छळ करीत होते, याचे वर्णन करू लागे. असा ज्यांचा छळ होत आहे असे लीक भाझ्या माहितीचे आहेत. ते खरोखर धरतीमातेचे सुपुत्र आहेत, * तो आवेगाने म्हणाला. त्या लोकांविषयीच्या विचाराने तिला अधिकच भय वाटू लागळं व॑ हे सार खरंच का म्हणन पुन:विचाराबंसं तिला वाटलं, पण तिला ते शब्द उच्चारण्याचा धीर झाला नाही. ज्या लोकांनी हे भयंकर विचार आपल्या मुलाच्या डोक्यात भरवले होते व ज्यांच्याविषयी तीट आकलन होणे तिच्या तकशक्‍्तीपलीकडचे होते, त्यांच्याबद्दल्च्या हकीकती ती श्‍वास रोखून एक लागली . अखेर ती त्याला म्हणाली, “पहाट होत आली आता. तू आता जाऊन थोडी तरी झोप घे पाहू.” “हो, झोपतोच मी आता,* तो तिच्याकडे वाकून म्हणाला . “पण मी सांगितल ते सार समजलं चा तुला?” ही,” ती उसासा टाकून म्हणाली . पुतः तिच्या नेत्रांतून अश्रू वाह लागळे व ती एकदम मोठ्याने म्हणाली , “अशानं तुझा सत्यानाश होईल, बेटा! * तो उठला व खोलीच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागला. ते काही असु दे, पण मी काय करतो, कुठे जातो, हे मी तुला सांगितलं आहे. आणि तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर तू माझ्या या कार्याच्या आड येऊ नकोस अशी मी तुझ्याजवळ भीक मागतो, ममी !” माझ्या लाडक्या बटा!” ती हंदके देत म्हणाली. “कदाचित्‌ तू मला हे सार सांगितलं नसतं तरच बरं झालं असतं रे?” त्याने आईजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन प्रेमभराने घट्ट दाबून धरला. त्याने ज्या सहुदयतेने ममी ' हा शब्द उच्चारला होता व ज्या विलिक्षण व नव्याच आवेगाने तिचा हात दाबळा होता त्याने ती भारावून गेली. ती अडखळत म्हणाली, नाही बेटा, मी तुझ्या आड येणार नाही. पण जपून राहा बर, जपून राहा बाळ ! '' कोणत्या संकटापासून त्याचा बचाव करायचा होता याची तिलाच स्पष्ट कल्पना नव्हती, म्हणून ती शोकार्कुलपणे त्व च्च
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now