शिक्षण आणि शान्ति | EDUCATION AND PEACE

Book Image : शिक्षण आणि शान्ति  - EDUCATION AND PEACE

More Information About Authors :

जेन साही - JANE SAHI

No Information available about जेन साही - JANE SAHI

Add Infomation AboutJANE SAHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT

No Information available about शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT

Add Infomation AboutSHOBHA BHAGWAT

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशी उत्कट इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तींच्या मनालाच ते हात घालतं. जे मुळातच समाजापासून दूर लोटलेले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहातल्या शाळेत गेल्यामुळे आणखी दूर ढकलले जाण्याचा धोका राहात नाही. शाळेच्या रचनेमध्येच एक शिस्त, अधिकारांची उतरंड, पिढ्यान्‌ पिढ्या लोकांनी वापरलेली पाठ्यपुस्तके, तयार उत्तरं पाठ करून परीक्षेत कशी लिहायची याबद्दलची स्पष्टता या सगळ्यांचं लोकांना आकर्षण आहे. अशा वेळी शाळेत काही कौशल्यं मिळतात म्ह्णून किंबा ज्ञान मिळतं म्हणून शाळेचं महत्त्व वाटत नाही; तर एक निश्चित हक्काची वाट मिळते जी वाट आजवरच्या नाकारलेपणातून बाहेर काढण्याचं आश्‍वासन देते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलं स्वत: शाळेच्या दडपणांबद्दल टीका करत नाहीत. शाळेतलं अपयश हे शाळेच्या अन्यायकारक पद्धतीमुळे आहे हे लक्षात घेत नाहीत. तो दोष मुलं देतात स्वत:च्याच अपुरेपणाला किंवा घरच्या परिस्थितीला. अभ्यासक्रमाचा अर्थ किंबा संदर्भ कळावा याची अपेक्षाही केली जात नाही. कारण शाळांच्या सर्वव्यापी यंत्रणेकडे 'समाजात स्थान मिळवण्याचा मार्ग आणि बहुधा नोकरी मिळवण्याचा परवाना' म्हणून पाहिलं जातं. हे कमी महत्त्वाचं नाही. बर्‍याच शाळांमधून सहकार्यातून उद्भवणारा परस्पर संबाद कमीत कमी दिसून येतो. व्यक्तीला तिथे कोणी ओळखतच नाही. ज्या ठरावीक आचारपद्धतींनी लोकांना एकत्र आणलं त्याच आता त्यांना एकमेकांपासून दूर करतात; जे विधी काही उद्देश साजरे करण्यासाठी, जीवनाला आणि मृत्यूला अर्थ देण्यासाठी निर्माण झाले होते, तेच आता काही निवडक लोकांच्या भौतिक प्रगतीचे मार्ग झाले आहेत. निसर्गापासून तुटणं, कामापासून तुटणं माणसांचं उखडलेपण याचा अर्थ स्वत:च्या बिचार करण्याच्या, कल्पना करण्याच्या, सहवेदना जाणवण्याच्या आणि कामाच्या, अशा अनेक प्रकारच्या साधनांपासून तुटणं असाही होतो. माणसामाणसांतले संबंध, कुटुंबांतले संबंध, कामावरचे आणि बाजारातले संबंध यांत नाट्यमय बदल झाले आहेत. झावळ्या जीवनापासून, कामापासून अधिकाधिक दूर जात आहेत. पूर्वी मुलं त्यांच्या पोटापाण्याची कौशल्यं शिकत. मुलं पूर्वी समाजात राहून, निरीक्षण करून, अनुकरण करून, कामं शिकायची; पारंपरिक आचारपद्धत शिकायची; नृत्य, संगीत शिकायची. आधुनिक शाळा जीवनाच्या या खोतापासून दूर झाल्यात. मुलं जगाबद्दल शिकतात, पण हे शिक्षण प्रत्यक्ष जीवनाच्या संपर्कातून, मानवी स्पर्शातून आलेलं नसतं. आजचं शिक्षण पुस्तकांच्या, नकाशांच्या, प्रयोगशाळेतल्या प्रयोगांच्या आणि २६ । शिक्षण आणि शांती संगणकांच्या मदतीनं होतं. पाठ करण्याची परंपरा तीच आहे; पण त्यातला धार्मिक ग्रंथातला ताल, काव्य, शाळेच्या चार भिंतींबाहेरच्या सांस्कृतिक जीवनाशी नातं, हे सगळंच तुटलं आहे. अशा प्रकारची शाळा रोजच्या जीवनाच्या अनेक अंगांपासून तुटत जाते. आपलं अन्न कुठून येतं, पाणी कुठून येतं, कपडे कुठून येतात या प्रश्‍नांशी शाळेचा काही संबंध नसतो. आपलं आरोग्य, स्वास्थ्य, निवारा यांच्याशी शाळेनं काडीमोड घेतला आहे. शिक्षक आज कृतिशील व्यक्‍ती किंवा ट्रश माणूस नाही, तर केवळ बोलणारा प्राणी झाला आहे. कृष्णकुमार म्हणतात त्याप्रमाणे शिक्षक “सौम्य हुकूमशहा' असतो. या प्रक्रियेत शिकणारं मूल माहितीचे कण जमवणारं भांडं झालं आहे. ग्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या शिक्षणाचं चित्र मुल्ला नसरुद्दीनच्या एका विनोदी गोष्टीत उभं केलं आहे : एक विद्वान आणि एक नावाडी यांची नदी ओलांडताना घडलेली ती गोष्ट आहे. विद्वान होड़ीमध्ये आरामशीर बसला होता आणि नावाडी होडी सुखरूपपणे तीराला लाबंण्यासाठी नदीच्या खळाळत्या पाण्यातून कष्टाने बल्हवत होता. विद्वानाने नावाडी किती शिकला आहे आणि त्याला व्याकरणाची मूलतत्त्वं तरी माहीत आहेत का? असं त्याला विचारलं. नावाडी म्हणाला, की तो साधा माणूस आहे, आणि त्याचं शिक्षण झालेलं नाही. विद्वान त्याला तिरस्कारानं म्हणाला, ''अरे मित्रा, मग तुझं अर्ध आयुष्य तर बायाच गेलं म्हणायचं.” नावाडी शांतपणे होडी वल्हवत राहिला. काही वेळानं नावाड्यानं बिद्ठानाला बिचारं, “आपल्याला पोहता येतं का?'' त्यावर विद्वान म्हणाला, *“मी पोहायला शिकल्ये नाही,'' त्यावर नावाडी म्हणाला, ''मग मित्रा, तुझं तर सगळंच आयुष्य वाया गेलं समज. होडीला भोक पडलं आहे पाणी होडीत येत आहे, आणि होडी आता बुडणार आहे.” शहाणपणापासून तुटण जीवनापासून तुटलेलं शिक्षण अनेक प्रकारचे परिणाम करतं. ते अति स्बातंत््यातून येतं. असं स्वातंत्र्य भूतकाळ विसरून केवळ भविष्याचा विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानातून येतं. सायमन देल (500107८ ७४८) याचं वर्णन असं करतात, की 'ज्या कृतीच्या मुळाशी हेतू नसेल अशी कोणतीही कृती भ्रामक ठरू शकते. एखाद्यानं दिव्यात तेल नसताना दिवा पेटवण्याचा प्रयत्न करावा तसं हे आहे. कडक रूींनी बांधलेलं असलं किंवा त्यावर कोणत्यातरी प्रचाराचं ओझं असलं, तर ते शिक्षणही संकुचित होतं. चुकीचे स्वातंत्र्य किंबा मर्यादा शिक्षणाला शिक्षण आणि शांती । २७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now