शिवाजी कोन होता ? | SHIVAJI KON HOTA?

SHIVAJI KON HOTA? by गोविन्द पानसरे - GOVIND PANSAREपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

गोविन्द पानसरे - GOVIND PANSARE

No Information available about गोविन्द पानसरे - GOVIND PANSARE

Add Infomation AboutGOVIND PANSARE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्यांची सतत चोरीच होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे, याच्याशी संबंधच काय? म्हणून राजा कोण आला किंवा कोण गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. दूर॒ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सनेसुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सला १४ जून १८५३ रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो, “जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबेसुद्धा शतकानुशतके सातत्य टिकवून आहेत. राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवाशी स्वत:ला कधीच लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते, याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही.” राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता. राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्ययंत्रणा ते राज्य राबवत होती व प्रजेला नागवत होती. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते, तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे. शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार- देशमुख-वतनदार-पाटील-कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत, असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now