निसर्गयात्रा | NISARG YATRA

NISARG YATRA  by पुस्तक समूह - Pustak Samuhप्रकाश गोले - PRAKASH GOLE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रकाश गोले - PRAKASH GOLE

No Information available about प्रकाश गोले - PRAKASH GOLE

Add Infomation AboutPRAKASH GOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२८ : तिसर्गयात्रा मी पाहिलेला पहिला गरुड आता अगदी पुसट आठवतो. गावा- बाहेरच्या आमराईत पक्षी पाहण्यासाठी मी गेलो होतो. आंब्याला आलेल्या मोहोरातील मध चाखीत बागडणारे सूर्यपक्षी पाहता पाहता माझी नजर सहज निळ्या आकाशाकडे गेली. गडद तपकिरी रंगाचा एक मोठा पक्षी पंख पसरून घिरट्या मारीत असलेला मी पाहिला. प्रथम वाटले ती घार असावी; पण लगेच माझी नजर त्या पक्ष्याच्या शेपटीकडे गेली. दोपटी त्रिकोणी नव्हती, घारीच्या शेपटीसारखी मध्ये दुभंगलेली नव्हती. त्याचा आकारही मला घारीपेक्षा मोठा वाटला आणि गिधाड म्हणावे, तर मानेवर भरपूर पिसे होती. हा गरुड तर नसावा ? माझ्या अंगावर रोमांच उठले. मी घाईघाईने हातातील पुस्तक उघडले. त्यात उडत्या गरुडाचे चित्र दिले होते. चित्रातील गरुडाचे होपूट आणि या पक्ष्याचे शेपूट यांत मुळीच फरक नव्हता. गरुडाची आणि माझी ही पहिलीच भेट. तो गरुड घिरट्या मारीत दूर गेला तरी मी कितीतरी वेळ आकाशात नजर लावून बसलो होतो. पण या वेळी मी गरुड पक्षी ओळखला तरी तो कोणत्या जातीचा गरुड होता. हे काही मला उलगडले नव्हते. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली होती, की गरुड हा पक्षी लोक समजतात तितका काही दुमिळ नाही. काही लोक समजतात की गरुड फक्त हिमालयातच पाहायला मिळतो, तर काही म्हणतात की तो पाहण्यास दुर्गम पहाडात जावे लागते. हिमालयात आणि पहाडात गरुड राहतो हे खरे आहे; पण पुष्कळदा तो पुण्या-मुंबईसारख्या गजबजलेल्या दहरांजवळही येती हेही खरे आहे. गरुडाची मला पूर्ण ओळख प्रथम पटली ती पुण्याजवळच. पुण्याच्या पहिचमेकडे पाषाणच्या तलावाभोवती पूर्वी बऱ्यापैकी झाडी होती. तिथल्या ज्या वडावर मी गरुड पाहिला तो वड अजनही तेथे आहे. वडाच्या घनदाट छायेत एक मीठा पक्षी बसलेला मी दुरून पाहिला. दुबिणीतून पाहिल्यावर त्याच्या मस्तकावरील आखड, पण गोलाकार तुरा, छातीवसैल' तांबुस मी पाहिलेले गरुड : २९ तपकिरी रंग व त्यावरील गडद ठिपके आणि रंद शेपूट दिसले. मी जवळ येण्याचा प्रयत्न करताच तो उडाला आणि मला त्याच्या पंखाखालील रुंद पांढरा पट्टा दिसला. मला या गरुडाची ओळख आता पटली. तुरेवाल्या सर्प-गरुडास मी पाहिले होते. सप हे या गरुडाचे आवडते भक्ष्य आहे. सप चावला तर त्याला त्याचे विष बाधत नाही असे नाही. तर सर्प पकडताना तो त्याला चावू देत नाही, हे त्याचे कौशल्य. हा गरुड आपल्याकडे डोंगरात आणि जंगलातून दिसतो. गड आणि किल्ले यांतून हिंडताना माथेरान-महाबळेश्‍वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी दुपारच्या वेळी आकाशात घिरट्या घालताना या गरुंडांची जोडी नेहमी दृष्टीस पडते. त्यांनी घातलेली लांब शीळ पहाडकपारी दुमदुमून सोडते. पंखांच्या खालच्या बाजूचा पांढरा पट्टा दुरूनही आपल्याला दिसतो आणि या गरुडाची ओळख पटते. सरडे, बारीक पक्षी यांचीही तो शिकार करतो आणि त्यांच्या शोधार्थ कधी कधी तो शहरांच्या आसपासही फेरफटका मारून जातो. मात्र भूरा किवा तपकिरी गरुड हा अधिक धीट आहे. तो आकाराने सर्प गरुडापेक्षा मोठा आहे-. जवळजवळ गिंधाडाएवढा मोठा आहे हा पक्षी. संद शेपूट, भव्य मस्तक, अतिशय तीक्ष्ण आणि बाकदार चोच वःभेदक नजर असलेला हा फिकट-तपकिरी अन्‌ भुरकट रंगाचा गरुड अतिशय रुबाबदार दिसतो. त्याचे पाय पिसांनी पूर्णपणे झाकलेले असतात. हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य! ' पण इतक्या सुंदर पक्ष्याच्या सवयी मात्र आपल्याला आवडण्या- सारख्या नाहीत. हा गरुड गिधाडांप्रमाणे मेलेल्या प्राण्याचे मास खातो, उकिरडे फुंकतो, टोळ, मुंग्या असले कीटक खातो आणि इतर पक्ष्यांच्या तोंडचा घास पळवायलाही कमी करीत नाही. घाण खाण्याच्या त्याच्या सवयीमुळेच तो मनृष्यवस्तीच्या आसपास पुष्कळदा दिसतो. पुण्याजवळ तर एका ठिकाणी या गरुडांनी वस्तीच केली होती. खाण्यासाठी मारण्यात येणाऱ्या कोंबड्यांची पिसे, हाडे वगरे भाग इथे टाकन दिलेले असत. त्यांना चिकटलेले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now