माय कंट्री स्कूल डायरी | MY COUNTRY SCHOOL DIARY
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
532 KB
                  Total Pages : 
148
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :
जूलिया वेबर गॉर्डन - JULIA WEBER GORDON
No Information available about जूलिया वेबर गॉर्डन - JULIA WEBER GORDON
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विद्या भागवत - VIDYA BHAGWAT
No Information available about विद्या भागवत - VIDYA BHAGWAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माय कंट्री स्कूल डायरी
पहिले वर्ष
मुलांची, इतर लोकांची, जागांची नावे काल्पनिक आहेत. पण ज्यांनी आम्हाला मदत केली अशा काही बाहेरच्या
लोकांची नांवे मात्र मी तीच ठेवली आहेत.
१) मी मुलांना समजून घ्यायला शिकते.
मी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी माझी तयारी केली.
शुक्रवार, ५ जून १९३६
येत्या पानगळतीच्या मोसमात मी जिथे शिकवायला सुरुवात करणार, त्या छोट्या शाळेला मी आज भेट दिली. माझ्या
मनामधे त्या स्वच्छ पांढऱ्या, पेटी सारख्या, उन्हात चमकणाऱ्या शाळेला भेट देताना उत्तेजित उत्सुकता होती. एक शिक्षकी
शाळेवर माझा खूप विश्वास आहे. त्यांना उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करुन ते विद्यार्थ्यांमधे सृजनशील, लोकशाही पद्धतीने
आयुष्य जगणे रुजवतात. त्यासाठी मुलांना तयार करतात. येथे अका विद्यार्थ्यांचा गटाबरोबर काम करण्याची व त्यांची
जवळून ओळख करुन घेण्याची एक संधी मला मिळणार आहे. सुंदर वातावरणामधे त्यांना वाढताना, क्षमतांचा विकास
होताना पहायचा पुरेसा मोठा काळ मला मिळणार आहे.
मी क्षणभर थबकून, त्या छोट्या शाळेच्या सभोवार असलेल्या जंगलाकडे नजर टाकली. नुकत्याच झालेल्या पावसाने
झाडांची पाने चमकत होती. त्यांचा जंगली सुगंध पसरला होता. माझ्या मनात आलं, हा सगळाच परिसर माझ्या
प्रयोगशाळेचा हिस्सा आहे.
मुले त्यांच्या वार्षिक संमेलनासाठी सर्कसची तयारी करत होती. मी खोलीत प्रवेश करताक्षणी काही लाजऱ्या
नजरांनी माझ्याकडे कटाक्ष टाकले व ते त्यांच्या कामाला लागले. त्यांना कामात गुंतलेले पाहून उपस्थित शिक्षकांनी मला
त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या क्षमता, त्यांचा भावनिक विकास इत्यांदी विषयी सांगायला सुरुवात केली. त्यातुनच मला मुलांची
नावे, त्यांचे वय, एवढाच पूर्वेतिहास मिळाला.
ग्रेड
महिने नाव वय-वर्ष महिने
८ अना ओल्सेयूस्की १३-५
टं ओल्गा प्रिन्लॅक १५-८
७ कॅथेरीन समॅटीस १३-२
७ रुथ थॉम्पसन १५-२
७ सोफिया समॅटीन १०-८
धु डोरीस अन्ड्र्यूज ११-३
ने मेरी ओल्सेयूस्की १०-१०
६ फ्रॅंक प्रिन्लॅक १४-८
५ मे अन्ड्र्यूज झन
0 वॉरन हिल ९-७
प् जॉर्ज प्रिन्लॅक १२-४
प् अओडवर्ड वेनिस्की १०-१०
झॅ हेलेन ऑल्सेयूस्की ८-०
झॅ अँन्झ्यू डुलिओ १२-२
३ अल्बर्ट हिल ८-३
३ पर्ल प्रिन्लॅक १०-१
रे मार्था जोन्स ८-९
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...